किशोरवयीन मुलांमध्ये लवचिकता पेरण्याचे महत्त्व

सायबरबुलिंग संशोधन केंद्र

समीर हिंदुजा आणि Justin W. Patchin

लवचिकता म्हणजे "पूर्ववत होण्याची, झालेल्या आघातास तोंड देण्‍याची, प्रतिकूल परिस्थितीत यशस्वीपणे जुळवून घेण्याची आणि गंभीर ताणतणाव…किंवा फक्त आजच्या जगाच्या तणावाला तोंड देत सामाजिक आणि शैक्षणिक पात्रता विकसित करण्याची क्षमता होय."1 किशोरवयीनांना मोठे होत असताना निःसंशयपणे त्यांच्या शालेय जीवनात, त्यांच्या आरोग्यासंबंधित आणि त्यांच्या सामाजिक जीवनात संकटांचा सामना करावा लागणार आहे. दुर्दैवाने, लवचिकतेचे महत्त्व बरेचदा दुर्लक्षित केले जाते. जीवन हे अनेक संघर्षांनी भरलेले आहे, त्यापैकी अनेक संघर्ष हे नातेसंबंधातील असतात. अनेक पालक त्यांच्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या वेदनेपासून संरक्षण देण्याचा विचार करतात, मुलांना बोलू देण्याऐवजी मुलांच्या वतीने स्वतः बोलतात आणि शिकण्याच्या कठीण परंतु महत्त्वाच्या प्रक्रियेच्या क्षणी हस्तक्षेप करतात. तथापि, प्रत्येक परिस्थितीत असे करणे तुमच्या किशोरवयीन मुलांसाठी अपायकारक असू शकते - आणि ते परिपक्व होऊ शकत नाहीत, प्रत्येक परिस्थितीत प्रत्येकजण त्यांच्यासाठी नेहमीच चांगले वागेल असे नाही.

लवचिकता आणि सायबर गुंडगिरीवरील संशोधन

आमच्या संशोधनात2 आम्हाला असे आढळले की जी किशोरवयीन मुले अधिक लवचिक असतात, ती सायबर गुंडगिरीमुळे कमी प्रभावित होतात. या व्यतिरिक्त, उच्च पातळीची लवचिकता असलेल्या किशोरवयीन मुलांनी चुकीच्या वागणुकीचा सामना करताना पालक आणि काळजीवाहकांना ज्या गोष्टी विद्यार्थ्यांनी कराव्यात अशी इच्छा आहे त्या सर्व गोष्टी केल्या. त्यांनी त्याची शाळेला तक्रार केली. त्यांनी त्याची साईट/ॲपवर तक्रार केली. त्यांनी त्यांचे स्क्रीननाव बदलले, आक्रमकांना ब्लॉक केले किंवा लॉग आऊट केले. दुसरीकडे, ज्यांच्यामध्ये लवचिकतेची पातळी कमी होती ते सायबर गुंडगिरी होत असताना काहीही न करण्याची शक्यता अधिक होती.

प्रतिकूलता व्यक्त करून लवचिकता निर्माण करणे

समजा तुमचे किशोरवयीन मूल त्याच्या सोशल मीडिया खात्यावर त्रासदायक कमेंटशी डील करत आहे. कदाचित डीफॉल्टनुसार, किशोरवयीन मूल एकटे पडू शकते, आणि ते स्वतःला सांगू लागतात की ते एक "पराभूत" आहेत, ज्यांच्यावर सतत टीका केली जावी, आणि गुंडगिरी ही त्यांच्या जीवनातील मोठी गोष्ट आहे आणि ते बहुतांश लोकांच्या त्यांच्याबद्दलच्या भावनांचे प्रतिनिधित्व करते. तद्वतच, जे घडले त्याचा विचार करणे आणि त्याचा सकारात्मक पद्धतीने विचार करणे त्यांच्यासाठी चांगले होईल. ते स्वत:ला सांगू शकतात की सायबर गुंडगिरी करणारी व्यक्ती, उदाहरणार्थ, तिच्या स्वत:च्या असुरक्षितता आणि वैयक्तिक समस्यांना सामोरे जात आहे, आणि इतरांना त्रास देऊन त्या व्यक्तीस जीवनात आनंद मिळू शकतो. आक्रमकाचे मत आणि कृतीने खरोखरच काही फरक पडत नाही याची ते स्वतःला आठवण करून देऊ शकतात, आणि त्यांचे डोके कधीही "मुक्त" राहू देऊ नका.

येथे पालक आणि काळजीवाहकांची भूमिका सुरू होते, आणि त्यावेळी सहेतू, त्यांच्या स्तरावर जाऊन केलेले संभाषण खरोखर उपयुक्त ठरू शकते. जेव्हा आम्ही किशोरवयीन मुलांना त्यांच्या कोणत्या समजुती वस्तुनिष्ठपणे पाहिल्यास त्यात योग्यतेचा अभाव आहे हे ओळखण्यात मदत करू शकलो, तेव्हा आम्ही त्यांच्या कौशल्य टूलबॉक्समध्ये अस्वस्थ करणाऱ्या विचारांपासून विचलित करण्यासाठी, त्यात व्यत्यय आणण्यासाठी आणि विवाद करण्यासाठी आणखी टूल जोडतो.3 यामुळे नंतर त्यांचे विचार सदृढ, फायदेशीर होऊ शकतात. यामुळे वर्तमान परिस्थितीत आणि भविष्यात त्यांच्या आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन आणि वृत्ती निर्माण होते.

काळजीवाहक चित्रपट आणि पुस्तकांद्वारे लवचिकता कशी प्रमोट करू शकतात

पालक आणि काळजीवाहक लवचिकता शिकवण्यासाठी चित्रपट आणि पुस्तके वापरू शकतात, विशेष करून पॉप संस्कृती आणि मीडिया हा तरुणाईचा जवळपास अविभाज्य भाग बनला आहे व त्यात ते गुंतून गेले आहेत. आपण कथेच्या रचनेशी आपोआपच जोडले जात असतो आणि आपण आयुष्यभर ऐकलेल्या, पाहिलेल्या किवा वाचलेल्या महान व्यक्तींमुळे मनापासून प्रभावित होत असतो. अनेक मुलांवर प्राथमिक शाळेतील परीकथा आणि ग्रीक पौराणिक कथा, पौगंडावस्थेतील आणि तारुण्यात येणारे सुपरहिरो, नंतरच्या आयुष्यात क्रीडा-थीम आणि युद्ध चित्रपटांचा प्रभाव पडला आहे आणि या प्रत्येक कथा त्यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात जगण्यासाठी प्रेरित करू शकतात. खाली वयोमानानुसार आपल्या काही आवडत्या गोष्टी विभाजित केल्या आहेत.

लवचिकता शिकवण्यासाठी चित्रपट आणि शो

माध्यमिक शाळा

  • फेसिंग द जाएंट्स
  • फाइंडिंग फॉरेस्टर
  • ग्रेटेस्ट शोमॅन
  • द 33
  • द फ्लोरिडा प्रोजेक्ट
  • द रेस्क्यू

उच्च माध्यमिक शाळा

  • 127 अवर्स
  • अटिपिकल
  • क्रीड
  • पेंग्वीन ब्लूम
  • रॅबिट-प्रूफ फेन्स
  • व्हेन दे सी अस

लवचिकता शिकवणारी पुस्तके:

माध्यमिक शाळा

  • एल डीफो
  • फिश इन अ ट्री
  • सॉर्टा लाइक अ रॉक स्टार
  • दि बॉय हू हार्नेस्ड दि विंड
  • दि डॉट
  • दि हंगर गेम्स

उच्च माध्यमिक शाळा

  • अ लाँग वॉक टू वॉटर
  • फास्ट टॉक ऑन अ स्लो ट्रॅक
  • हॅचेट
  • ऑफ ह्युमन बाँडेज
  • दि रूल्स ऑफ सर्व्हायव्हल
  • व्हरलिगिग

पालक आणि काळजीवाहकांनी किशोरवयीन मुलांना कोणत्याही ऑनलाईन (किंवा ऑफलाईन!) संकटांना अधिक सकारात्मकतेने तोंड देण्यासाठी मदत करून, आणि ज्यांनी त्यांच्या वृत्तीतून, कृतीतून जीवनावर मात केली आहे अशा व्यक्तींच्या जीवनकथा सांगून व माध्यमांचा वापर करून लवचिकता निर्माण करण्यास प्राधान्य देणे चांगले आहे. असे करण्याने ते त्यांचे ऑनलाईन अनुभवाचे नियंत्रण करण्यात सुसज्ज होतील, आणि त्यांचे नुकसान न होता ते सुरक्षित राहतील. या व्यतिरिक्त, लवचिकता जोपासण्यामुळे तुमच्या मुलाचा आत्मविश्‍वास, समस्या निवारण करण्‍याची क्षमता, स्वायत्तता आणि हेतूची भावना - हे सर्व वाढण्‍यास मदत होऊ शकते जे तरुणांच्या निकोप विकासासाठी महत्त्वाचे आहे.

1 Henderson, N., & Milstein, M. M. (2003). शाळेतील लवचिकता: विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हे घडवून आणणे.
Thousand Oaks, CA: सेज पब्लिकेशन (कोर्विन प्रेस)

2 हिंदुजा, S. & Patchin, J. W. (2017). गुंडगिरी आणि सायबर गुंडगिरीचे बळी रोखण्यासाठी तरुणाईतील लवचिकता जोपासणे. बाल शोषण आणि दुर्लक्ष, 73, 51-62.

3 अल्बर्ट एलिसच्या ABC (एडवर्सिटी, बिलिफ्‍स आणि कॉन्सिक्वेन्सेस) मॉडेलवर आधारित. कृपया Ellis, A पहा. (1991). सुधारित तर्कसंगत-भावनिक थेरपीचे ABC (RET). तर्कसंगत-भावनिक आणि संज्ञानात्मक-वर्तणूक उपचारपद्धती जर्नल, 9(3), 139-172.

संबंधित विषय

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला