तुमच्या Meta अवतारला स्टार बनवा

Rachel F Rodgers, PhD

12 नोव्हेंबर, 2024

परिचय: मेटाव्हर्ससाठी अस्सल ओळख अभिव्यक्ती

Ellysse Dick, Reality Labs धोरण व्यवस्थापक आणि Jacklyn Doig-Keys, सुरक्षा धोरण व्यवस्थापक

या वर्षी आम्ही लोकांना Facebook, Instagram, WhatsApp, Meta Horizon आणि इतर व्हर्च्युअल तसेच मिश्र वास्तविक अनुभवांवर त्यांचे प्रतिनिधत्व करता यावेत यासाठी आमचे Meta अवतार अपडेट केले. हे पुढील पिढीचे अवतार नवीन घराची स्टाईल सादर करतात आणि लोकांना स्वत:स व्यक्त करण्‍याची अधिक क्षमता देतात.

तुम्हाला कदाचित माहीत असेल की अवतार हे तुमच्या स्वत:चे डिजिटल प्रतिनिधी या रूपात ऑनलाईन कम्युनिकेट करण्‍यासाठी वापरले जातात. परंतु भविष्‍यातील मेटाव्हर्समध्‍ये, ते ॲप आणि अनुभवांवरील ओळखीचा मूलभूत भाग असतील. म्हणूनच आम्ही तुमच्या युनिक क्रिएटिव्हिटी, इंटरेस्ट आणि ओळख दर्शवणार्‍या अवतारांना डिझाइन करणे अधिक सोपे करू इच्छित होतो.

लोकांना त्यांचे अस्सल स्वत्व दर्शवणारे अवतार तयार करण्‍यासाठी गरजेचे असलेले टूल आम्ही लोकांना देऊ इच्छितो. परंतु वेगवेगळ्या आभासी जागांमध्‍ये ओळखीचे वेगवेगळे भाग त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षेस, गोपनीयतेस आणि एकंदर अनुभवास कसे प्रभावित करू शकतात याबाबत विचारशील असावे असेही आम्ही इच्छितो. ते करण्‍यात आम्हाला मदत करण्‍यासाठी, आम्ही डॉ. Rachel Rodgers यांच्यासोबत एकत्रितपणे कार्य करतो, हे एक शिक्षक असून त्यांनी तरुण आणि इतर डिजिटल सुरक्षा तसेच कल्याणासाठी कार्य करणार्‍या तज्ञांसोबतच्या सल्ल्याने हे मार्गदर्शक तयार केले आहे व यामध्ये मीडिया आणि तरुणांचे कल्याण यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्‍ये, तुम्हाला किशोरवयीन मुलांसाठी टिपा दिसतील आणि अवतारांद्वारे सुरक्षितपणे आणि आदरपूर्वक ओळख कशी एक्सप्लोर करता येईल याबाबत पालकांसाठी मार्गदर्शन मिळेल.

आम्हाला आशा आहे की या मार्गदर्शकामुळे तरुणांना आणि त्यांच्या पालकांना व्हर्च्युअल स्व- अभिव्यक्तीबद्दल शिकण्यात मदत होईल आणि त्यांना अवतार अनुभवांमध्‍ये सुरक्षितपणे एंगेज राहण्यासाठी टूल मिळतील. प्रत्येक अवतार एक स्टार असून तुमचे अस्सल स्वत्व त्यामुळे उजळून निघेल - प्रारंभ करण्‍यासाठी आणि तुमची कल्पनेची भरारी कुठपर्यंत जाते हे पाहण्यासाठी हे मार्गदर्शक वापरा!

Meta अवतारांद्वारे तुम्हाला स्वत:ला डिजिटल जगात नवीन आणि उत्साहपूर्ण पद्धतींनी व्यक्त करता येते.


तुमच्या Meta अवतारला एक स्टार बनवण्याबद्दल मिनिटभर विचार करू या: सुरक्षित, विचारशील, अस्सल आणि आदरपूर्वक.


स्टार अवतार का बनवावेत?

तुम्हाला कदाचित माहीत असेल की, आपले अवतार कसे दिसावेत याबद्दल लोकांचे काही उद्देश असतात. ते त्यांचे व्यक्तिमत्व दर्शवणारी किंवा त्यांचा अवतार शैलीपूर्ण प्रकारे दर्शवणारी रूपे बनवू शकतात

बहुतांश अवतार हे एखाद्या व्यक्तीच्या अंतर्गत स्वरूपाचे, शारीरिक वैशिष्‍ट्‍यांचे आणि काही अधिक आकांक्षांचे मिश्रण असतात. तुम्ही वास्तविक जगात स्वत:ला एखाद्या प्रकारे कदाचित व्यक्त करू शकत नसलात तरी, अवतार ही त्यासाठी एक उत्तम पद्धत असू शकते.

तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या तुमच्या व्यक्तिमत्वाच्या आणि ओळखीच्या भागांबद्दल अवतारच्या माध्‍यमातून विचार करणे यापासून तुम्ही प्रारंभ करू शकता! हे समजून घेणे काही वेळा अवघड असू शकते म्हणून, एखाद्या बाबतीत कशी सुरुवात करावी याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास नेहमी पालकांशी किंवा विश्‍वासू प्रौढ व्यक्तीशी बोला.

स्टार तपासणी:


  • माझ्‍यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या इतरांनी पाहाव्यात किंवा त्यांना माहीत व्हाव्‍यात असे मला वाटते? माझ्‍यासाठी त्या महत्त्वाच्या का आहेत?
  • स्वत:ला व्यक्त करण्‍यासाठी मला कशाची तडजोड करावीशी वाटते किंवा कशात बदल करावासा वाटतो आणि तसे का वाटते?
  • मला माझा अवतार प्रत्येकजणास दिसावा असे वाटते की लोकांच्या एका मर्यादित ग्रुपला दिसावा असे वाटते? कोणता अवतार यावर ते अवलंबून आहे का?

सुरक्षित

तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्‍याबद्दल तुम्ही बरेच विचारशील असू शकता. हीच गोष्ट स्टार अवतारवरही लागू होते! कार्टून-सारखा अवतार तुमचे प्रतिनिधित्व करणार्‍या फोटोऐवजी एक मजेशीर पर्याय असू शकतो.

आपण जेव्हा ऑनलाईन असतो तेव्हा, आपण आपल्याबद्दल बरेच काही शेअर करत असतो. आपण कोण आहोत, आपल्याला काय महत्त्वाचे वाटते, आपण कोणता प्रभाव पाडू इच्छितो आणि आपण कोणत्या कम्युनिटीमधील आहोत हे आपण दर्शवू शकतो.

अवतार ते देखील करू शकतात! आणि इतर लोकांचे अवतार त्यांच्याबद्दल आपल्याला सांगू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या आवडत्या संघासोबत किंवा बॅंडसोबत टीशर्ट घातल्यामुळे इतर लोकांना हे कळते की तुम्ही त्यांचे फॅन आहात. तुमचा अवतार तुमच्या ओळखाचे इतर महत्त्वाचे भागदेखील शेअर करू शकतो. तो कदाचित तुमचे कूळ, वंश आणि संस्कृती, वय, लिंग, अभिव्यक्ती किंवा धर्म याबद्दल इतरांना माहिती देऊ शकतो.

वास्तविक किंवा व्हर्च्युअल जगात स्वत:स सादर करणे हे अगदी तुमच्या आवाजासारखेच एक कम्युनिकेशन टूल आहे आणि तुम्ही ते अगदी काळजीपूर्वक वापरावे.

काही वेळा इतर लोक सामाजिक साच्यामध्‍ये रूजलेल्या पद्धतींनी, त्यांना ते जाणवत नसले तरी देखील, आपल्या अपिअरंसचे अवलोकन करत असतात. आपले मन जगाबाबत जलदतेने निष्कर्ष काढण्यासाठी असे शॉर्टकर्ट निवडते. परंतु ते कदाचित योग्य, अचूक किंवा नेहमीच उपयुक्त नसू शकतात. एखाद्याच्या म्हणण्‍याचा अर्थ काय आहे ते गृहित न धरता, त्यांच्या अवतार निवडींबद्दल त्यांना नक्की विचारा! आणि लक्षात असू द्या की इतर लोकांमध्‍ये तुमच्याबद्दलची गृहितके असू शकतात जी अगदी बरोबर नसतील.

तुमचे शरीर, चेहरा आणि कपड्यांनुसार, तुमचा अवतार जसा दिसतो, त्यानुसार तुम्ही इतरांना म्हातारपणी कसे दिसाल हे प्रभावित होऊ शकते. उदाहरणार्थ, काही निवडी तुम्ही वास्तविक रूपात जसे आहात त्यापेक्षा तुम्हाला अधिक वृद्ध किंवा अधिक तरुण दर्शवू शकतात.

तुम्ही तुमचा अवतार तयार करता तेव्हा, तुम्ही इतरांसोबत काय शेअर करू इच्छिता, तुम्ही कसे दिसू इच्छिता आणि तुम्ही कसे इंटरॅक्ट करू इच्छिता याबद्दल विचार करा.

स्टार तपासणी: सुरक्षित राहणे

ऑनलाईनसह, कोणत्याही जागेवर, तुमच्या अपिअरंसच्या आधारे तुमच्याबद्दल लोक काय गृहित धरू शकतात याबद्दल विचार करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचा अवतार कसा डिझाइन करता याच्या आधारे, तुम्ही आहात त्यापेक्षा अधिक वयाचे आहे असा विचार लोक करू शकतात किंवा वयानुसार योग्य नसलेल्या पद्धतींनी तुमच्यासोबत इंटरॅक्ट करू शकतात. हे अस्वस्थ करणारे असू शकते. तुम्ही स्वत:बद्दल काय शेअर करू इच्छिता आणि लोकांचे तुमच्याबद्दल काय “मत” असेल या दोन्हींचा विचार करा!

स्‍वत:ला विचारा:

  • विशिष्‍ट शारीरिक वैशिष्‍टये असलेल्या लोकांबद्दल माझी गृहितके आहेत का?
  • मी ज्याप्रकारे सादर होत आहे त्याबद्दल लोकांची गृहितके कोणती असू शकतील?
  • मी माझ्‍या अवतारद्वारे आणि त्याद्वारे होणार्‍या इंटरॅक्शनबद्दल काय उघड करत आहे?

स्वत:ला आणि तुमच्या मित्रांना ऑनलाईन सुरक्षित ठेवण्यासाठी बहुधा तुमच्याकडे आधीपासून योजना असतील! लक्षात असू द्या, एखादी व्यक्ती तुम्ही “खरोखर” कसे दिसता हे जाणून घेऊ इच्छित असेल तर, त्यांना फोटो पाठवण्‍यापूर्वी दोनदा विचार करा. तुम्ही ज्यांच्यासोबत कनेक्ट करत आहात त्याबद्दल विचारशील रहा आणि ऑनलाईन सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही शिकून घेतलेल्‍या योजना वापरा. तुम्हाला खात्री नसल्यास एखाद्या विश्‍वासू प्रौढ व्यक्तीला विचारा.


विचारशील

तुमचा अवतार तुमच्या बद्दलच्या विशिष्‍ट गोष्टी कशा कम्युनिकेट करू शकेल आणि तुम्हाला कोण पाहिल याबद्दल विचार करा.

आपण मजेसाठी, इतरांशी बोलण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील घडामोडी शेअर करण्‍यासाठी आभासी जागा वापरतो. ​शाळेेमध्ये, कुटुंबासोबत जेवण करताना, कार्यस्थानी किंवा हँग आऊट करताना, जशी तुमची भिन्न "रूपे" असतात तशीच ती या जागांवरही दर्शवा. एखाद्या विशिष्‍ट जागेवर तुम्ही स्वतःला कसे आणि का दर्शवू इच्छिता याबद्दल विचार करणे महत्त्वाचे आहे.

अवतार स्टाइलिंग निवडी विशिष्‍ट ठिकाणांनुसार कदाचित अधिक किंवा कमी प्रमाणात योग्य असतील. तुम्हाला गंभीर इंटरॅक्शनसाठी कदाचित अधिक व्यवस्थित किंवा गेमसाठी खेळकर अवतार हवा असू शकतो.

तुम्ही प्रत्येक जागेसाठी समान Meta अवतार ठेवण्याची किंवा भिन्न ॲपसाठी किंवा जागांसाठी युनिक अवतार ठेवण्याची निवड करू शकता. तुम्ही Facebook, Instagram, WhatsApp किंवा Meta Horizon वर कोणाशी इंटरॅक्ट करू इच्छिता याबद्दल विचार करा. तुम्ही त्या जागांवर स्वत:बद्दल लोकांशी काय शेअर करू इच्छिता? तुम्ही काय खाजगी ठेवू इच्छिता?

वेगवेगळ्या मन:स्थिती कॅप्चर करण्‍यासाठी किंवा तुमच्या ओळखीचे वेगवेगळे भाग हायलाईट करण्‍यासाठी एकाधिक अवतार तयार करा!

स्टार तपासणी: विचारशील असणे

स्‍वत:ला विचारा:

  • माझ्‍या अवतारची वैशिष्ट्‍ये, कपडे आणि साधने मी कोण आहे याबद्दल कसे कम्युनिकेट करतात?
  • मी या जागेवर कोणाशी इंटरॅक्ट करत आहे? माझे खाते खाजगी आहे का किंवा माझा अवतार कोणीही पाहू शकते का?
  • मी या संदर्भानुसार योग्य असणाऱ्या विचारशील निवडी करत आहे का?

तुम्ही अगदी सुरुवातीपासून अवतार तयार करण्‍याची निवड करू शकता किंवा तुमच्यासारखे जास्त दिसण्यात मदत होण्‍यासाठी एक सेल्फी घेऊन सुरुवात करू शकता!


अस्सल

अवतारांबद्दल असलेली सर्वात छान बाब ही आहे की त्यांच्यामुळे आपण कोणत्याही जागेवर लोकांनी आपल्याला कोणत्या रूपात पाहावे हे आपल्याला ठरवता येते. प्रत्येकजण चेहर्‍यांची वैशिष्‍ट्‍ये आणि केस, मेकअप आणि कपड्यांबद्दल प्रयोग करू शकतो. यामुळे अवतारांद्वारे वास्तविक जगात असू शकतात त्यापेक्षा अधिक प्रखरतेने तुमच्या भागांना उजळवता येते.

भिन्न स्वरूपे दर्शवण्‍यासाठी आणि आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाटते ते पाहण्यासाठी अवतार हा एक मजेशीर आणि सोपा मार्ग अस़ू शकतो. काही वेळा आपले शारीरिक अपिअरंस आपल्या “अस्सल स्वत्वाचे” चांगले प्रतिनिधित्व करत असल्यासारखे वाटते. परंतु काही वेळा आपले असे काही पैलू असतात जे वास्तविक जगात प्रखरतेने दिसून येतील असे वाटत नाही. तुम्हाला आतून कसे वाटते त्याच्याच जवळपासचा तुमचा अवतार दिसू शकतो!

तुम्ही स्वत:ला कसे पाहाता आणि इतरांना तुम्ही कसे दिसू द्यायचे आहे यानुसार अस्सलता भासवण्‍यासाठी तुम्ही तुमचा अवतार डिझाइन करू शकता. हे कदाचित वेगवेगळ्या जागांवर वेगवेगळे असू शकते! ते कालांतराने बदलू देखील शकते. एखाद्या दिवशी आपल्याला काहीतरी वेगळेपणा जाणवतो आणि, आपण सर्व बदलतो आणि प्रगती करतो. तुम्हाला अस्सल कशामुळे वाटते ते शोधण्यासाठी वेगवेगळे पर्याय वापरून पहा - ते कदाचित तुम्ही वास्तविक जीवनात जसे दिसता तसे किंवा पूर्णपणे भिन्न असू शकेल! याबाबत कोणतेही नियम नाहीत.

तुम्ही कदाचित वास्तविकता आणि मौजमस्ती याबाबत प्रयोग देखील करून पाहू इच्छित असाल. उदाहरणार्थ, केसांचे रंग इतर रंगांपेक्षा कदाचित कमी वास्तववादी दिसतील. हे निवडल्यामुळे वास्तविक चित्राऐवजी खेळकरपणाचे चि‍त्र रेखाटले जाऊ शकते. किंवा, तुम्ही स्वतःला विलक्षण अवतारात रूपांतरित करू शकता, जसे की रोबोट किंवा तुमचे फेव्हरेट चित्रपटातील कॅरेक्टर! पुन्हा, जिथे तुम्ही तुमचा अवतार वापरणार आहात त्या जागांचा संदर्भ नेहमी तपासा.

स्टार तपासणी: अस्सल असणे

तुम्ही आधीपासून वास्तविक जगात ज्यांना ओळखता ते लोक तुमच्या अतवाराबद्दल कशी प्रतिक्रिया देऊ शकतात याबद्दल विचाशील रहा. तुमचे वास्तविक प्रतिनिधित्व तुमच्या व्हर्च्युअल प्रतिनिधित्वापेक्षा भिन्न असल्यास त्यांना कदाचित आश्चर्य वाटेल. तुमच्या "वास्तविक" जीवनातील एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ऑनलाईन भिन्न स्वरूपात पाहिल्यानंतर त्यांचे तुमच्याशी होणार्‍या संभाषणाबाबत विचार करा.

याशिवाय, काही लोक केवळ तुम्हाला तुमच्या व्हर्च्युअल स्वरूपावरून ओळखत असतील आणि त्यांच्याकडे तुमच्या ओळखीचा इतर कोणताही संदर्भ नसेल. हे लोक तुमचे “अवलोकन” कसे करू शकतील याचा विचार करा. तुम्ही स्वतःला हवे तसे सादर करू शकता–परंतु विचारशील राहणे आणि तुम्ही भिन्न जागांवर प्रवेश करताना त्याबद्दल सज्ज राहणे महत्त्वाचे आहे.

महत्त्वाकांक्षी

A हे अक्षर ऑथेंटिकसाठी आहे परंतु त्याचबरोबर ते एस्पिरेशनल यासाठी देखील आहे. अवतार दोन्हीही असू शकते!

लोकांना त्यांचा अवतार त्यांच्या वास्तविक अपिअरंसपेक्षा भिन्न “छान” दिसावा असे वाटत असते. भिन्न स्वरूपे वापरून पाहण्‍याचा हा मजेशीर मार्ग आहे! परंतु लक्षात असू द्या की “छान दिसते” म्हणून आम्ही ज्याचा विचार करतो ते सहसा आपण प्रसिद्ध व्यक्तींची, व्यायामपटूंची किंवा प्रभावी व्यक्तींची जी चित्रे पाहतो त्यावर आधारित असते. त्या इमेजमध्‍ये सहसा अशी "आदर्श" वैशिष्‍ट्‍ये असतात जी वास्तविक जगात बहुतांश लोकांकडे नसतात.

यामुळे एक “साचेबद्ध आदर्श” स्वरूप तयार होते ज्याच्या पर्यंत वास्तविक जीवनात बहुधा कोणीही पोहोचू शकत नाही. लक्षात असू द्या की हे आदर्श स्वरूप वास्तववादी वाटत असले, तरीही ते वास्तववादी नसते! तुमच्या फेव्हरेट प्रसिद्ध व्यक्ती कॅमेर्‍यासमोर नसताना कदाचित वेगळ्या दिसत असतात. खरे तर, संपादन टूल आणखी प्रगत झाली असून, वास्तविक जगापेक्षा ऑनलाईन अपिअरंसमधील सत्यता कमी झाली आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीस ऑनलाईन पाहाता तेव्हा, ते तुम्हाला त्या जागेवर कसे पाहू इच्छितात त्याचे ते एक प्रतिनिधित्व असते. लक्षात असू द्या की ते प्रत्यक्षात जसे दिसतात तसे कदाचित नसू शकतात!

अनेक मार्गांनी तुम्ही तुमचा अवतार सानुकूल करू शकता! असा एक अवतार तयार करण्‍यासाठी वेगवेगळे पर्याय वापरून पहा ज्यामुळे तुमचे अस्सल स्वत्व उजळून निघेल.

तुम्ही तुमच्या अवतारच्या चेहर्‍याचा, डोळ्‍यांचा किंवा नाकाचा आकार आणि आकारमान बदलून पाहू शकता किंवा लहान किंवा मोठे शरीर बनवून पाहू शकता. हे माहीत असू द्या की, हे टूल एखादी व्यक्ती वास्तविकपणे जशी दिसते त्यात बदल करण्‍यासाठी आहेत आणि लक्षात असू द्या की “आदर्श” हे वास्तववादी नसतात. प्रत्येक आकार आणि वैशिष्ट्य सुंदर असते.

लक्षात असू द्या: प्रेरित करणार्‍या लोकांची शरीराची ठेवण ही सर्व प्रकारची असू शकते. आत्मविश्वास हा अंत:प्रेरित असतो.

स्टार तपासणी - महत्वाकांक्षी अवतार

सौंदर्याचे मूल्य कलेच्या आणि संस्कृतीच्या दृष्टीने शतकांपासून महत्त्वाचे ठरत आले आहे. परंतु तुम्ही स्वत:ला विचारा “मी “छान दिसण्याचा प्रयत्न का करत आहे”? मला खरोखरच असे वाटते का की या गोष्टींमुळे लोक आकर्षक दिसतात? काय आकर्षक आहे आणि अपिअरंस किती महत्त्वाचा आहे याबद्लच्या माझ्‍या धारणांबद्दल मी कोणते मेसेज पाठवत आहे?

एखाद्या मित्राला त्याच्या अपिअरंसबद्दल दु:खी वाटत असेल तर, त्यांना आठवण करून द्या की लोकांचे ऑनलाईन सादरीकरण त्यांच्या शारीरिक अपिअरंससारखे नसते. अनेक लोक फिल्टर आणि इतर टूलचा वापर करतात. त्यांना त्यांच्या प्रश्नांबद्दल मदतीसाठी एखाद्या विश्‍वासू प्रौढ व्यक्तीला विचारण्‍यास प्रेरित करा.

लक्षात असू द्या की, प्रेरित करणारे लोक विविध शारीरिक ठेवणीचे, आकारमानाचे, आकाराचे आणि वैशिष्‍ट्‍यांचे असतात)!

तुम्ही अवतार तयार करता तेव्हा तुमच्यासाठी महत्त्वाचे आणि सुंदर काय असते? काय सुंदर असते याबद्दलच्या तुमच्या दृष्टीकोनानुसार तुमचा अवतार खरा आहे का?

स्‍वत:ला विचारा:

  • तुमचा अवतार “आकर्षक” या साच्यात बसणारा आहे का किंवा तुम्ही जे आहात त्यानुसार युनिक आहे का?
  • सौंदर्याबद्दल असलेला आपला दृष्‍टीकोन विस्तृत करण्‍यासाठी तुम्ही तुमचा अवतार वापरू शकता का?

तुमच्या अवतारसाठी असलेल्या निवडींची व्यप्ती कितीही असू शकते, परंतु त्यामुळे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन कसे दिसता याबद्दल गुंतागुंतीच्या भावना देखील निर्माण होऊ शकतात. तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत बोलणे गरजेचे असल्यास एखाद्या विश्‍वासू प्रौढाशी संपर्क साधा.

आदरयुक्त

अवतारांची श्रेणी वास्तविक लोकांपेक्षा अधिक विस्तृत आहे! लोक जितक्या प्रकारचे दिसू शकतात त्या विविध प्रकारांचा आनंद घेण्याचा हा एक अद्भूत मार्ग आहे. खरे म्हणजे, शैलीपूर्ण Meta अवतार बनवण्याचे लक्षावधी प्रकार आहेत!

आभासी जागेतील प्रत्‍येकजणाने अवतार तयार केला आहे जो त्यांच्या मते त्यांचे प्रतिनिधित्व करतो. आपण व्हर्च्युअल जगातील प्रत्येकजणास ते कसे दिसतात याचा विचार न करता, प्रतिष्‍ठेने आणि आदराने वागवले पाहिजे.

अपिअरंसच्या काही पैलूंचे भिन्न ग्रुपसाठी भक्कम सांस्कृतिक अर्थ असतात. यामुळे तुमच्या अवतारला तुमचे अस्सल स्वत्व आणि तुमची मूल्ये यांचे प्रतिनिधित्व करण्‍यात मदत होऊ शकते. परंतु इतरांच्या दृष्टीेने महत्त्वाचा अर्थ असलेले आयटम निवडल्यामुळे अनादर केल्याची भावना निर्माण होऊ शकते, जरी तुमचा तसा हेतू नसला तरी देखील!

तुम्ही तुमच्या अवतारसाठी वापरलेल्या इतर आयटमबद्दलचे लोकांचे आकलन भिन्न असू शकते. गैरसमज होऊ शकतात. विशेषत: जर गैरमसज असतील तर, इतर लोकांच्या दृष्टीने वेगवेगळ्या चिन्हांचा अर्थ काय आहे ते विचारणे उपयुक्त ठरू शकते.

तुम्ही इतरांसोबत ऑनलाईन एंगेज असल्याने, ते त्यांचे प्रतिनिधित्व कसे करतात या आधारे तुम्ही कोणती गृहितके बनवत आहात? तुम्ही त्यांच्यासोबत कसे इंटरॅक्ट करता यास ती गृहितके प्रभावित करतात का? तुम्ही गृहित धरण्‍यापूर्वी नेहमी स्पष्टपणे विचारत असल्याची खात्री करा.

स्टार तपासणी - आदरपूर्वक असणे

तुम्ही वास्तविक जगात जसे दिसता त्यापेक्षा भिन्न दिसणारा अवतार तुम्ही निवडल्यास, त्यासारख्‍या शारीरिक अपिअरंस असणार्‍या लोकांबद्दल तुम्ही कोणता मेसेज पाठवत आहात ते तपासा. एखाद्या प्रौढाला किंवा मित्राला विचारा की: “हे एखाद्या व्यक्तीस अस्वस्थ करणारे असू शकते का?”

स्‍वत:ला विचारा:

  • मी या अवतारद्वारे काय सांगण्याचा/व्यक्त करण्‍याचा प्रयत्न करत आहे? हे यथोचित, अस्सल आणि आदरयुक्त आहे का? इतर लोकांचा गैरसमज होईल का?
  • अशा प्रकारे एखादी व्यक्ती अनादर करून वागत असेल तर मी माझ्‍या कम्युनिटी सदस्यांना कसा सपोर्ट करू शकेन?
  • हा अवतार माझ्‍या खर्‍या स्वत्वास आणि मूल्यांना व्यक्त करत आहे का? हे एकंदरपणे मला मी होण्यासाठी मुक्त करत आहे का? हे सामाजिक मानदंडांशी अलाइन होते की त्याविरोधात जाते?

गृहित धरू नका! नेहमी अन्य एखाद्या व्यक्तीच्या ओळखींबाबत विचारा. आणि तुम्हाला आभासी जागांमध्‍ये अनादरयुक्त इंटरॅक्शन दिसल्यास, एखाद्या विश्‍वासू प्रौढास सामील करून घ्‍या. लक्षात असू द्या की आभासी जागांमध्‍ये आदरयुक्त वर्तनासाठी नियम आहेत आणि त्यांचा भंग करणार्‍या लोकांची तक्रार करण्‍यासाठी टूल असू शकतात.

एक स्टार अवतार!

लक्षात असू द्या, तुमचे अवतार विचारपूर्वक तयार करा. तुमच्या आणि आमच्या कम्युनिटीच्या मूल्यांबाबत स्वतःशी प्रामाणिक रहा.

अंतिम स्टार तपासणी:


  • तुमच्या अवतारमुळे प्रसन्नता लाभत नसेल तर, पालक किंवा अन्य विश्‍वासू प्रौढ व्यक्तीसोबत चर्चा करा. त्यांना विचारा की तुमचा अवतार त्यांना काय सांगत आहे? तुम्हाला अभिप्रेत असलेला मेसेज तो पाठवत आहे का?
  • इतरांच्या बाबतीतही असेच करा! तुमच्या मित्राचा अवतार अभिप्रेत नसलेली एखादी बाब कम्युनिकेट करत असेल किंवा इतरांचा अनादर करत असेल तर, त्यांना विचारशील बनण्यात मदत करा. उदाहरणार्थ, त्यांना विचारा की जेव्हा त्यांनी त्यांचा अवतार डिझाइन केला तेव्हा ते काय विचार करत होते किंवा इतर लोक त्याबद्दल काय “अवलोकन” करू शकतील असे त्यांना वाटते.
  • विशेषत: तुमच्या अवतारच्या अनुभवामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर, एखाद्या विश्‍वासू प्रौढासोबत शेअर करा.

तुमच्या किशोरवयीन मुलाला “स्टार” अवतार तयार करण्‍यात मदत करण्‍याबाबत पालकांसाठी ABC

विचारा: तुमच्या किशोरवयीन मुलाला त्याच्या अवतार(रां)बद्दल विचारा:

  1. तुमचे किशोरवयीन मूल त्याच्या अवतारद्वारे दर्शवते ते त्यांचे कोणते भाग महत्त्वाचे आहेत आणि का? त्याने लोकांना हसवावे अशी अपेक्षा आहे का? ओळखीशी किंवा ग्रुपशी कनेक्ट करणे अपेक्षित आहे का? एक पूर्णपणे वेगळे किंवा महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व वापरून पाहणे अपेक्षित आहे का? तुम्हाला आढळलेला त्यांच्या शारीरिक अपिअरंसशी जुळणारा आणि न जुळणारा पैलू अशा दोन्ही बाबी हायलाईट करून पहा आणि त्या निवडींबद्दल विचारा.

विचारा: “मला तुमच्या अवतारबद्दल सांगा. तुम्ही स्वत:बद्दल लोकांना काय सांगू इच्छिता?”

  1. तुमच्या किशोरवयीन मुलांच्या अवतारबाबत आणि आभासी जागांमध्‍ये असण्‍याच्या त्यांच्या अनुभवाबाबत इतर लोक कसे इंटरॅक्ट करतात याबद्दल त्यांच्याशी कम्युनिकेट करा. त्यांना आठवण करून द्या की इंटरॅक्शनचा संदर्भ महत्त्वाचा आहे आणि त्यांना इंटरॅक्शन करताना, तंत्रज्ञानांवर आणि प्रेक्षकांसमोर त्यांच्या स्वत:च्या अभिव्यक्तीनुसार जुळवून घेण्यात मदत करा. तुमच्या किशोरवयीन मुलाचे वेगवेगळे अवतार असू शकतात, त्यामुळे ते कधी वापरावेत याबद्दल त्यांनी केलेल्या निवडींबाबत त्यांना विचारा.

विचारा: “लोक तुमच्या नवीन अवतारबद्दल कशी प्रतिक्रिया देत आहेत? तुम्ही कोणासोबत इंटरॅक्ट करता या आधारे, तुम्ही या ॲपसाठी हा अवतार का निवडला?

सहभागी व्हा: तुमचे किशोरवयीन मूल त्यांचा अवतार तयार करत असते तेव्हा त्यांना सहयोग करा. तुमचा स्वत:चा अवतार बनवण्‍याचा प्रयत्न करा आणि त्यांची मदत घ्‍या! एकत्रितपणे वैशिष्‍ट्‍ये वापरून पहा आणि त्यांना त्यांच्या स्वत:च्या सादरीकरणाद्वारे विचार करण्‍यात मदत करा.

सहभागी व्हा: तुमच्या किशोरवयीन मुलासह एक थीम किंवा मन:स्थिती निवडा आणि एकत्रितपणे हे व्यक्त करणारे अवतार तयार करा. तुम्ही वास्तविक जगात कसे दिसता याबाबतीत समान किंवा भिन्न निवडी करण्‍यासाठी एकमेकांना प्रेरित करा. काही पैलू वेगळ्या पद्धतींने दर्शवणे कसे वाटते ते एकमेकांना विचारा.

इतरांच्या अवतारांच्या आधारे त्यांच्याबाबत अगोदरच मत न बनवण्यास किशोरवयीन मुलांना प्रेरित करा. त्याऐवजी, इतर व्यक्ती किंवा खेळाडूसोबत बोलून त्यांच्या निवडींमागील अर्थ एक्सप्लोर करण्‍यात त्यांना मदत करा.

सहभागी व्हा: तुमच्या किशोरवयीन मुलाला इतर लोकांच्या अवतारांच्या अर्थांबद्दल विचारा: “मला त्याबद्दल सांगणार का? तुम्हाला असे वाटते का की याचे अन्य अर्थ असू शकतात?”

मॉडेल इतरांना त्यांची सांस्कृतिक चिन्हे आणि प्रतीकांच्या वापराबद्दल विचारशील प्रश्न विचारत आहे: माझे तुमच्या अवतारच्या [आयटम] कडे लक्ष आहे. तुमच्यासाठी याचा अर्थ काय आहे हे तुम्ही मला सांगू शकता का”?

नियंत्रणे: Meta अनुभवांमधून नॅव्हिगेट करण्‍यासाठी पालक आणि किशोरवयीन मुलांसाठी टूल ऑफर करते जिथे ते त्यांचे अवतार वापरत असतील. तुमच्या कुटुंबासाठी योग्य असणारी आणि सुरक्षित वातावरण तयार करू शकणारी सेटिंग्ज शोधण्यासाठी तुमच्या किशोरवयीन मुलासोबत सहयोग करा.

थोडा विराम द्या!

किशोरवयीन मुले त्यांची ओळख आणि व्यक्तिमत्व विकसित करत असतात. त्यांची प्रगती होत असताना या पैलूंसोबत खेळणे ही किशोरवयीन मुलांमधील सामान्य बाब आहे.

रिपोर्टिंग आणि अंमलबजावणीसाठी आभासी जागांमध्‍ये कम्युनिटीचे नियम आणि टूल असतात, जे वास्तविक जागांवर अस्तित्वात नसू शकतात. तुमच्या किशोरवयीन मुलासाठी त्यांच्या भिन्न भागांसह आणि त्याच्या व्यक्तिमत्वासह सुरक्षितपणे प्रयोग करण्‍यासाठी हे अनुभव एक चांगले ठिकाण असू शकते.

असे असले तरी, तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलासोबत अवघड विषयांबद्दलच्या संभाषणांसाठी तयार असले पाहिजे, जसे की दादागिरी आणि छळवणूक किंवा अत्याधिक आदर्श असलेले अवतार पाहिल्यानंतर आपल्या अपिअरंसबद्दल असलेले असमाधान.

रचनात्मक संभाषणांसाठी टिपा

  1. किशोरवयीन मुलांनी त्यांच्या अवतारांसाठी विशिष्‍ट वैशिष्‍ट्‍ये का निवडली याचे वर्णन करण्‍यासाठी त्यांना आमंत्रित करून त्यांच्या तत्त्वांशी जुळणार्‍या निवडी करण्‍यात त्यांना मदत करा.
  2. किशोरवयीन मुलांना इतरांसोबत तसेच वागण्यासाठी प्रॉम्प्ट करा. अपिअरंसच्या आधारावर गृहितके करण्‍यापेक्षा ओळखीबद्दल प्रश्न विचारण्यास प्रेरित करा.
  3. भिन्न कम्युनिटी वापरू शकतात त्या सानुकूलीकरणाच्या पर्यायांबद्दल आणि हे जर त्या कम्युनिटींचा भाग नसतील तर त्यांचा वापर आदरपूर्वकपणे कसा करावा याबद्दल बोला.
तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला