डिजिटल कुतूहलाला प्रोत्साहित करणे

Richard Culatta

किशोरवयीन मुलांसबोत तंत्रज्ञान वापरण्याच्या सर्वोत्तम मार्गांपैकी एक म्हणजे टूल म्हणून त्यांच्या उत्सुकतेला प्रोत्साहन देणे. पालक आणि शिक्षकांच्या थोड्या मॉडेलिंगसह, तरुण लोक डिजिटल जगाला एक सुपर-शक्तिशाली शिक्षण लायब्ररी म्हणून ओळखू शकतात जिथे त्यांना सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. डिजिल जगात भरभराट होण्यासाठी शिक्षण एक्सप्लोरर बनणे हे सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे. डिजिटल कुतूहलास सपोर्ट करणे हे जवळजवळ कोणत्याही क्षणी आणि विविध मार्गांनी घडू शकते.


लहान मुले नैसर्गिकरित्याच जिज्ञासू असतात. प्रश्न विचारणे हा त्यांच्या सभोवतालच्या जगाचा अर्थ कसा काढतो याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पालक म्हणून, डिजिटल कुतूहलाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण या प्रश्नांचा फायदा घेऊ शकतो. जेव्हा मूल विचारते की “चंद्र आज रात्री केशरी रंगाचा का दिसत आहे?” किंवा “हा कोणत्या प्रकारचा बग आहे?”, तेव्हा हे क्षण त्यांना उत्तरे शोधण्यासाठी ऑनलाईन टूलचे सामर्थ्य दाखवण्याकरिता आपण वापरू शकतो. ते तंत्रज्ञान हे ज्ञान संवधर्नाचे टूल म्हणून ओळखायला सुरूवात करत असल्याने, “चला बघूया” किंवा “मी पैज लावतो आपण उत्तर ऑनलाईन शोधू शकतो” असा प्रतिसाद दिल्यामुळे त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला डिजिटल वर्ल्डशी कनेक्ट करण्यात त्यांना मदत होते. सोबत आम्ही त्यांच्याशी शोध शब्दांच्या प्रकाराबद्दल देखील चर्चा करू शकतो ज्यामुळे सर्वात प्रभावी परिणाम मिळू शकतात.


उत्तरांसाठी डिजिटल सोर्सकरिता किशोरवयीन मुलांना इशारा करण्याव्यतिरिक्त, त्यांना कोणत्या प्रकारची माहिती त्यांच्या उद्दिष्टांसाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे हे ओळखण्यात त्यांना मदत करण्याची आपल्याला गरज आहे. काही डिजिटल माहिती इतरांपेक्षा अधिक विश्वासार्ह आहे हे त्यांना समजण्यास मदत करण्यासाठी आम्ही डिजिटल संसाधनाचे सोर्स, तारीख आणि उद्दिष्ट पाहण्याचे मॉडेल करू शकतो. Wikipedia सारख्‍या साईट एक उत्तम सुरूवात असू शकते, (लहान वाचकांना Wikipedia ची सोपी इंग्लिश आवृत्ती देखील आहे), आणि किशोरवयीन मुले येथून अधिक सखोलपणे अधिकृत सोर्सपर्यंत पोहचू शकतात.


डिजिटल जिज्ञासा प्रोत्साहित करण्याचा भाग म्हणजे विशेष ॲप आणि वेबसाईट ओळखण्यात मदत करणे - शोध इंजिनच्या पलिकडे - जे आपल्या किशोरवयीन मुलांचा इंटरेस्ट संरेखित करते. त्याचप्रकारे आम्ही लहान वाचकांना नवीन पुस्तकांची शिफारस करतो, सहाय्यक प्रौढांनी देखील आमच्या किशोरवयीन मुलांसाठी चांगल्या ॲप आणि वेबसाईटची शिफारस केली पाहिजे जेणेकरून त्यांचे डिजिटल पॅलेट विस्तृत करण्यात मदत होईल. जेव्हा माझ्‍या मुलाला विशेषकरून अंतराळाबद्दल जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे असे वाटले तेव्हा, मी त्याला त्याबद्दल अधिक जाणून घेण्यात मदत होण्यासाठी Sky Guide सारखे ॲप वापरून पाहण्याची शिफारस केली. फोन आकाशाकडे दाखवून, आपण कदाचित शोधू शकतो की आपल्या घरावर असलेला तेजस्वी प्रकाश हा खरंतर शुक्र ग्रहाचा आहे आणि तो आपल्यापासून 162 दशलक्ष मैल दूर आहे. आपण Wikipedia वर पृथ्वीचा परिघ (सुमारे 25,000 मैल) पाहू शकतो आणि नंतर मोजू शकतो की 162 दशलक्ष मैल म्हणजे पृथ्वीभोवती सुमारे 6,500 वेळा प्रदक्षिणा घालण्यासारखे आहे. प्रकाशाचा वेग (प्रति सेकंद 3,00,000 किलोमीटर) मिळवण्यासाठी आपण Wolfram Alpha ॲप वापरू शकतो आणि तुम्ही पाहत असलेला प्रकाश शुक्रापासून तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी जवळपास 15 मिनिटे लागतात हे ते ॲप शोधून काढू शकते.


अखेर, हे लक्षात घेऊया की डिजिटल वर्ल्डमधील जिज्ञासेला प्रोत्साहित करणे म्हणजे केवळ माहितीसाठी कनेक्ट होणे नाही तर इतर लोकांसोबत कनेक्ट होणे आहे. एखादा विशिष्ट प्रश्न किंवा इंटरेस्ट असलेला विषय असल्यास, आमच्या नेटवर्कमधील इतर लोकांना काय म्हणायचे आहे हे पाहण्यासाठी तुम्ही Facebook किंवा कम्युनिटी ॲपवर प्रश्न पोस्ट करणे मॉडेल करू शकता. क्रिएटिव्हिटी आणि शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराचे मॉडेलिंग करणे आपल्या मुलांना अशा विश्वात यशस्वी होण्यासाठी सेट करते जिथे माहितीची उत्तरे शोधण्याची क्षमता असणे हे जीवनातील सर्वात महत्त्वाच्या कौशल्यांपैकी एक आहे. डिजिटल टूलचा वापर करून प्रश्नांची उत्तरे देण्याचे केवळ अधूनमधून केलेले मॉडेलिंग किशोरवयीन मुलांना त्यांचे डिजिटल डिव्हाईस केवळ मनोरंजनाचे टूल म्हणून न पाहता शिक्षण घेण्यासाठीचे टूल म्हणून पाहण्यास मदत करण्यासाठी पुरेसे आहे.

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला