तुमच्या किशोरवयीन मुलासोबत ऑनलाईन चांगल्या सवयी कशा लावून घ्‍याव्‍यात

NAMLE

पालकांना त्यांच्या किशोरवयीन मुलांना संरक्षित आणि सुरक्षित ठेवायचे असते. तर केवळ सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, आपण घरामधील मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या सक्षम आणि उत्पादनशील नातेसंबंध असण्याचा अर्थ काय याबद्दल अधिक व्यापकतेने विचार करण्याचा प्रयत्न केला तर? सरतेशेवटी, मागील दशकापासून आपल्या तंत्रज्ञानातील आणि माहिती सिस्टममधील बदलांनी केवळ तरूण लोकंच नव्हे तर आपल्या सर्वांना प्रभावित केले आहे. आपण सर्वच या गुंतागुंतीच्या जगाला नॅव्हिगेट कसे करायचे हे शिकत आहोत आणि जर आपण एकत्रितपणे शोधल्यास ते सोपे होईल.

जर आपण आपल्या घरामध्ये सकारात्मक मीडिया वातावरण कसे तयार करायचे यावर लक्ष केद्रित केले तर, तर आपण केवळ आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यात मदत करू शकणार नाही तर या अद्भूत तांत्रित प्रगतीसह आपल्याला उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ देखील आपण घेऊ शकतो.

तुमच्या घरामध्ये मीडियासह सकारात्मक नातेसंबंध तयार करण्यासाठी या 5 टिपा:

  1. तुमच्या स्वतःचा मीडिया वापर प्रतिबिंबित करा. तुम्हाला स्क्रीनवेळ कमी करायला आवडते का? मीडियाच्या वापरामुळे तुम्ही विचलित होता का? तुमचा फोन, सोशल मीडिया किंवा तुमच्या मित्रांना मजकूर करणे यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याला तुम्ही विलंब करता का? तुम्हाला तुमचा फोन तुमच्या जवळ ठेवणे आवडते का? किशोरवयीन मुलांनी मीडिया आणि तंत्रज्ञानाचा वापर करताना आपण त्यांच्याबद्दल निर्णायक होतो, पण जेव्हा आपण आपल्या मीडिया वापराबद्दल विचार करतो तेव्हा आपल्याला देखील त्यांच्याप्रमाणेच सवय लागलेली असते जी आपल्याला काही सहानुभूती आणि समज तयार करण्याची अनुमती देते.
  2. तुम्ही घरामध्ये वापरत असलेल्या मीडियाबद्दल शेअर करा. आपण खरंतर जागे असताना मीडियासोबत इंटरॅक्ट करतो - मग ते न्यूज प्रसारण असो, स्पोर्ट्स इव्हेंट पाहणे असो, नवीन स्ट्रीम होणार्‍या सीरीज असो किंवा सोशल मीडिया फीड स्क्रोल करणे असो - मीडिया आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. आपण वापरत असलेल्या मीडियाबद्दल आपल्या किशोरवयीन मुलांसह बोलणे आणि आपण वाचलेल्या मनोरंजक स्टोरीज किंवा आपण पाहिलेले मजेशीर व्हिडिओ शेअर करण्याने आपण आपल्या किशोरवीन मुलासह ते काय पाहत आहेत, ऐकत आहेत आणि वाचत आहेत याबद्दल मोकळेपणाने बोलण्यासाठी मदत होते.
  3. नोटिफिकेशन बंद करा. आपण 24/7 मीडिया वातावरणात राहतो आणि सातत्याने नोटिफिकेशनच्या माऱ्यासह मजकूर, ईमेल, सोशल मीडिया पोस्ट आणि ठळक बातम्यांमध्ये राहतो ज्यामुळे पूर्णपणे थकायला होते.
    आपण अशा संस्कृतीत जगत आहोत जिथे घडणाऱ्या घटनेबद्दलची तात्काळ सर्व माहिती जाणून घ्यावी असे आपल्याला वाटते, पण जग इतक्या जलद गतीने पुढे जाणार्‍या जगात हे अशक्य आहे. आणि ते खूप विचलित करणारे असू शकते! नोटिफिकेशन बंद करण्यामुळे तुमच्याकडे एक असा घटक असतो जो तुम्ही तुमच्या न्यूज आणि अपडेट कधी मिळवू इच्छिता यासंबधित असतो. त्याशिवाय, स्वतःच्या सीमारेषा स्वतः सेट करणे तुमच्या किशोरवयीन मुलांनाही तसे करण्यास प्रोत्साहित करेल.
  4. एकत्रित एंगेज व्हा. काहीवेळा आम्ही आमच्या किशोरवयीन मुलांशी तंत्रज्ञानाविषयी केलेले एकमेव संभाषण असे काहीतरी असते: “काही क्षणासाठी तुम्ही ती गोष्ट बाजूला ठेवू शकाल का म्हणजे मी तुमच्याशी संभाषण करू शकेन?” हळू आवाजात फॉलो केले. आपण त्यापेक्षा चांगले करू शकतो! तंत्रज्ञान आणि मीडियाभोवती असलेले कुटुंब म्हणून तुमच्या किशोरवयीन मुलांसह एंगेज होण्याच्या अनेक संधी असतात. सर्वात पहिले, किशोरवयीन मुले खरोखरच तंत्र कुक्षल असतात. त्यांच्याकडे नवीन तंत्रज्ञान शिकण्याची अविश्वसनीय कौशल्ये असतात, त्यामुळे त्यांच्याकडून मदत मागण्यासाठी काहीतरी कारणे शोधण्‍यामुळे नवीन तंत्रज्ञानाबद्दल संवाद करता येतो आणि यावरून तुम्ही त्यांच्या ज्ञानाचा आदर करता हे देखील दिसते. दुसरे म्हणजे, तुमच्या किशोरवयीन मुलांना खेळायला आवडत असलेल्या व्हिडिओ गेमबद्दल बोलणे किंवा त्यांनी नुकतेच पोस्ट केलेल्या चित्राबद्दल प्रशंसा करणे अशाप्रकारे सकारात्मक तंत्रज्ञानाच्या पैलूंशी एंगेज होणे कदाचित तुम्ही चिंता व्यक्त करताना त्यांना कमी बचावात्मक बनवू शकतात.
  5. तंत्रज्ञानापासून थोडी विश्रांती घ्‍या. दिवसभरात तंत्रज्ञानापासून थोडी विश्रांती घेणे आरोग्यदायी असते. तंत्रज्ञानाशिवाय तुमच्याकडे तुमच्या कुटुंबासाठी कोणत्याप्रकारे थोडा वेळ असू शकतो याबद्दल विचार करा. कदाचित रात्रीच्या जेवणाची वेळ असू शकते. कदाचित रविवारी सकाळची पॅनकॅक बनवण्‍याची वेळ असू शकते. कदाचित ती आठवड्यातील एक रात्र असू शकते जेव्हा तुम्ही एकत्रितपणे 30 मिनिटांसाठी बोर्ड गेम खेळू शकता. सातत्याने तंत्रज्ञानाच्या वापरापासून स्वतःला स्वतंत्र करणे एक कुटुंब म्हणून कनेक्ट होण्याचा चांगला मार्ग असू शकतो आणि तुमच्या किशोरवयीन मुलांना हे दाखवून द्या की आपण सर्व दरदिवशी काही मिनिटांसाठी आपल्या जवळ फोन नसेल तरी जगू शकतो.

संबंधित विषय

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला