इंटरनेट आणि सोशल मीडिया माहितीचे उत्तम सोर्स होऊ शकतात, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की त्यातील सर्व काही अचूक आणि विश्वसनीय आहे. वाईट गोष्टींमधून चांगली गोष्ट निवडण्यासाठी, पालकांना त्यांच्या किशोरवयीन मुलांची ऑनलाईन मीडिया साक्षरता विकसित करण्यात मदत करावी लागेल.
मीडिया किंवा प्रतिमा चुकीच्या पद्धतींनी हाताळल्या जातात तेव्हा प्रौढांप्रमाणेच, किशोरवयीन मुलांकरिता कोणती माहिती विश्वसनीय आहे आणि कोणती नाही हे समजण्याची कौशल्ये असणे आणि खऱ्या नसलेल्या गोष्टी किंवा व्हेरिफाय केल्या जाऊ शकत नसलेल्या गोष्टी शेअर न करणे यांसारख्या चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे.
मीडिया साक्षरता विकसित करण्यासाठी टिपा
अगदी सुरुवातीला तुम्ही पाहाता ती माहिती विश्वसनीय आहे की नाही हे माहीत करून घेणे कधीही सोपे नसते. परंतु ऑफलाईन जगाप्रमाणे, कोणती गोष्ट अचूक व विश्वसनीय आहे आणि कोणती नाही याची जाणीव तरुणांना होण्यात मदत करण्यासाठी तुम्ही या काही मुलभूत कृती करू शकता.
आपण मुलभूत गोष्टींपासून प्रारंभ करू या: माहितीच्या एखाद्या भागासोबत एंगेज होण्यापूर्वी किंवा ती शेअर करण्यापूर्वी, किशोरवयीन मुलांना काही प्रश्न विचारण्यात मदत करा जे माहितीच्या भागावर प्रकाश टाकू शकतात: जसे की प्रसिद्ध पाच W’s: कोण? काय? कुठे? केव्हा? आणि का?
या सर्व टिपा म्हणजे फक्त एक सुरुवात आहे. किशोरवयीन मुलांना इंटरनेटवरील कोणत्या माहितीवर विश्वास ठेवता येतो आणि कशावर विश्वास ठेवता येत नाही याबद्दल आणखी चांगल्याप्रकारे जाणून घेण्याची क्षमता विकसित करण्यासाठी वेळ लागेल. त्यांच्यासोबत ऑनलाईन वेळ घालवण्याची सवय लावा आणि ते काय वाचतात, तयार करतात, कशामध्ये एंगेज होतात किंवा ऑनलाईन काय शेअर करतात याबद्दल चांगल्या निवडी करण्यासाठी त्यांना त्यांचा अंदाज लावता यावा यासाठी मार्गदर्शन करा.
मदत करण्याचे आणखी मार्ग
पाच W’s विचारून आणखी संदर्भ गोळा करण्याशिवाय, ऑनलाईन असताना किशोरवयीन मुले आणि तरुणांनी आणखी चांगले मीडिया ग्राहक कसे बनावे हे शिकण्यासाठी स्वतंत्र कौशल्ये विकसित करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही या आणखी काही गोष्टी करू शकता.
संभाषण सतत चालू ठेवा
मीडिया साक्षरतेचा प्रारंभ घरापासूनच होतो. हे एकवेळचे काम नाही. किशोरवयीन आणि तरुणांना ऑनलाईन माहितीच्या जगात वावरताना मदत करण्यासाठी पालकांना वेळ द्यावा लागेल आणि प्रयत्न करावे लागतील. यामध्ये त्यांना सामील करून घेतल्यास आणि ते जास्तीत जास्त चर्चात्मक असल्यास त्याची मदत होते. त्यांच्याशी यासारख्या गोष्टींबद्दल बोला:
मीडिया साक्षरतेबाबत सराव
विश्वसनीय सोर्स शोधण्यासाठी तुमच्या किशोरवयीन मुलासोबत करण्यासाठी हा सराव दिला आहे. या ॲक्टिव्हिटीमुळे तुम्ही ऑनलाईन पाहता तो सोर्स व माहिती व्हेरिफाय करण्याचा सराव करण्यात मदत होईल.
या काही गोष्टी तुम्ही एकत्रितपणे करू शकता आणि केल्या पाहिजेत.
यास वेळ लागेल, परंतु थोड्या सरावाने आणि तुमच्या मदतीने, तुमचे किशोरवयीन मूल जी ऑनलाईन माहिती पाहते त्याबद्दल गंभीरतेने विचार करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये शिकू शकते आणि चुकीची माहिती पसरवणे थांबवण्यासाठी मदत करू शकते.