तुमच्या किशोरवयीन मुलासोबत
सायबर दादागिरी झाल्यास
काय करावे


Justin W. Patchin आणि समीर हिंदूजा

तंत्रज्ञानामुळे किशोरवयीन मुलांना एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी आणि मजा करण्‍यासाठीच्या जास्तीच्या संधी उपलब्ध करून दिल्या खऱ्या, परंतु विविध प्रकारे एकमेकांना दु:खी करण्‍याच्या देखील संधी निर्माण केल्या आहेत आणि समवयस्कांच्या परस्पर नात्यात कुटुंबियांना देखील डील करणे आव्हानात्मक असेल असे वाद निर्माण केले आहेत. हे जटील असले तरी वास्तविकता आहे की तरुणांना त्यांच्या समवयस्कांबाबत ज्या समस्या येतात त्याबद्दल ते अनेकदा मोठ्या माणसांवर विश्वास ठेवताना दिसत नाहीत. याशिवाय, सतत बदलणारे ॲप, प्लॅटफॉर्म किंवा संबंधित तंत्रज्ञानामुळे काळजीवाहक व्यक्तींवर दडपण येऊ शकते. परंतु सायबर दादागिरी ही समस्या तंत्रज्ञानाशी कमी निगडीत आहे आणि जरी पालकांना नवीनतम ॲपबद्दल खूप काही माहीत नसले तरीदेखील मुलांना मदत करण्‍यासारखे बरेच काही आहे. तुमचे किशोरवयीन मूल ऑनलाईन क्रूरतेचे टार्गेट होते तेव्हा, त्याच्याशी संबंधित काही योजनांबाबत आम्ही खाली चर्चा करत आहोत.

तुमचे किशोरवयीन मूल सुरक्षित असल्याची खात्री करा

तुमच्या किशोरवयीन मुलाची सुरक्षितता आणि हित यास नेहमीच अग्रक्रम दिला पाहिजे. त्यांना पाठिंबा आहे, त्यांचे म्हणणे ऐकले जाईल आणि त्यांना प्रेरित केले जाईल याची जाणीव त्यांना करून देण्यात तुम्ही कशी मदत करू शकता? तुमचा पाठिंबा बिनशर्त आहे हे त्यांना कळणे आवश्यक आहे कारण ते खचून जाण्याच्या स्थितीत असण्‍याची शक्यता अधिक आहे. शब्दांमधून आणि कृतींमधून दाखवून द्या की तुम्हा दोघांना सारखाच अंतिम परिणाम हवा आहे: सायबर दादागिरी थांबवणे आणि ती पुन्हा घडणार नाही हे सुनिश्चित करणे. इच्छित कृती साध्‍य करण्‍यासाठी एकत्रितपणे परस्पर संमतीने कार्य करून हे पूर्ण केले जाऊ शकते. त्यांचा दृष्‍टीकोन पूर्णपणे विचारात घेण्याची वृत्ती नसणे हे खूप चिंताजनक आहे,आणि त्यांचे म्हणणे व दृष्‍टीकोन भक्कम करणे महत्त्वाचे आहे; यामुळे खरोखर दु:ख विसरण्‍याच्या आणि पूर्ववत होण्याच्या प्रक्रियेत मदत होऊ शकते. सायबर दादागिरीच्या टार्गेटना हे निश्चित स्वरूपात माहीत असणे आवश्यक आहे की ते ज्या मोठ्‍या लोकांना सांगतात ते विवेकशीलपणे व तर्कपूर्ण हस्तक्षेप करतील आणि परिस्थिती आणखी वाईट करणार नाहीत. त्यांना हे पटवून द्या की तुम्ही त्यांच्या बाजूने आहात आणि परिस्थिती आणखी चांगली बनवण्‍यासाठी त्यांच्यासोबत कार्य कराल.

पुरावे गोळा करणे

काय घडले आणि त्यात कोण सामील होते याबद्दल शक्य तितकी जास्त माहिती संकलित करा. बर्‍याच केसेसमध्‍ये, जरी ते निनावी वातावरणात असले किंवा त्यात अपरिचित स्क्रीननाव असले तरीदेखील, तुमच्या किशोरवयीन मुलाला कळेल (किंवा कमीत कमी त्यांना माहीत आहे असा विचार ठेवा) की दादागिरी कोण करत आहे. अनेकदा गैरवर्तन शाळेत घडणार्‍या गोष्टींशी संबंधित असते. तसे असल्यास, तुमच्या प्रश्नांबाबत तेथील प्रशासकाशी संपर्क करा आणि शालेय धोरणाच्या आवश्यकतांनुसार घटनेची तक्रार केली आहे आणि तपास सुरू झाला याची खात्री करा. तुमच्या किशोरवयीन मुलासोबत सायबर दादागिरी होत आहे याचा पुरावा म्हणून उपयुक्त ठरू शकतील अशी संभाषणे, मेसेज, चित्रे, व्हिडिओ आणि अन्य कोणत्याही वस्तू यांचे स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग्ज घ्‍या आणि ते पुरावा म्हणून समबिट करा. तपास प्रक्रियेत सहाय्य करण्‍यासाठी सर्व घटनांचा एक रेकॉर्ड ठेवा. तसेच, घटना कुठे (शाळेत, विशिष्‍ट ॲपवर) आणि कधी घडली तसेच त्यात कोण सामील (आक्रमक किंवा साक्षीदार) होते यांसारख्‍या समर्पक तपशीलांच्या नोट्स ठेवा.

साईट किंवा ॲपवर तक्रार करा

सायबर दादागिरी अनेक कायदेशीर सेवा प्रदात्यांच्या (उदा. वेबसाईट, ॲप, गेमिंग नेटवर्क) सेवा अटी आणि/किंवा कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वे यांचे उल्लंघन करते. तुमच्या किशोरवयीन मुलाला जे त्रास देत आहेत त्यांना ते ओळखू शकते किंवा नाही हे विचारात न घेता, संबंधित प्‍लॅटफॉर्मशी संपर्क साधा. एकदा तक्रार केल्‍यावर, गैरवर्तनात्मक कंटेन्ट लगेच काढला जावा. बहुतांश साईट आणि ॲप निनावी तक्रार करण्यास अनुमती देतात आणि तक्रार कोणी केली त्या व्यक्तीची ओळख उघड करत नाही याची जाणीव असू द्या.

समर्पक सेवा अटी आणि/किंवा कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वे समजनू घ्या म्हणजे कंटेन्टची तक्रार कोणत्या कॅटेगरीअंतर्गत करावी हे तुम्हाला कळेल. कायदा अंमलबजावणीचा हस्तक्षेप नसल्यास साईट किंवा ॲप खाते माहिती उघड करणे शक्य नाही याची जाणीव ठेवा, त्यामुळे एखाद्याची सुरक्षा धोक्यात येईल इतक्या पातळीवर परिस्थिती वाढल्यास, पोलिसांना सामील करून घेणे गरजेचे होऊ शकते. तुमचा स्थानिक विभाग मदत करत नसल्यास, काउंटी किंवा राज्य कायदा अंमलबजावणीच्या अधिकार्‍यांशी संपर्क करा कारण त्यांच्याकडे अनेकदा अधिक संसाधने असतात आणि तंत्रज्ञानाशी संबधित गन्हेगारीचे निराकरण करण्‍यात कुशल असतात.

तुमच्या किशोरवयीन मुलासोबत सायबर दादागिरी झाल्यास प्रतिसाद देण्यासाठी टिपा

  • नेमके काय घडले ते शोधा आणि संदर्भ समजून घ्‍या
  • तुमचे किशोरवयीन मूल सुरक्षित असल्याची खात्री करा
  • पुरावा संकलित करा आणि आवश्‍यक असल्यास शाळेशी किंवा पोलिसांशी संपर्क करा
  • गैरवर्तनात्मक कंटेन्टची तक्रार करा आणि प्लॅटफॉर्ममध्ये त्या आक्रमकास ब्लॉक करा

सायबर दादागिरी करणार्‍या किशोरवयीन मुलाच्या पालकांशी तुम्ही संपर्क करावा का?

ही खूप अवघड स्थिती असू शकते. खरे तर, हा एक चांगला दृष्‍टीकोन आहे आणि अनेक पालकांसाठी ही परिणामकारक योजना असू शकते. तुमचे किशोरवयीन मूल, या कल्पनेच्या संभावनेमुळे घाबरून जाऊ शकते. बरेचदा त्यांना असे वाटते की, दादागिरी करणार्‍या किशोरवयीन मुलाच्या पालकांना त्याबद्दल सांगितले तर परिस्थिती आणखी वाईट होईल. आणि संभाषण योग्य प्रकारे पुढे गेले नाही तर निश्चितच तसे होउ शकते. समस्या ही आहे की काही पालक त्यांचे किशोरवयीन मूल इतरांवर सायबर दादागिरी करत आहे हा आरोप नाकारतात, ते संरक्षणात्मक किंवा नकारात्मक पद्धतीने विचार करतात आणि त्यानुसार तुम्ही वर्णन केलेल्या घटनांचा कदाचित स्वीकार करत नाहीत. ते कदाचित असहमत होतात आणि भांडणाचा पवित्रा घेऊ शकतात. पालक म्हणून हे संभाषण करण्‍याचा विचार करताना, प्रथम तुम्ही आक्रमक मुलाच्या पालकांना किती चांगल्या प्रकारे ओळखता याचा विचार करा आणि ते कसा प्रतिसाद देतील याबद्दल तुमच्या विश्‍वासाचे मूल्यांकन करा.

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला