तरूण लोकांनी शिकण्याच्या सर्वाधिक महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे मॉडेलिंग. पालक आणि कुटुंबातील सदस्यांच्या कृती किशोरवयीन मुलांनी त्यांच्या सभोवतालच्या जगात त्यांनी स्वतःला कसे एंगेज करावे याबद्दल चांगल्या डिजिटल वर्तणुकी शिकण्याची गुरूकिल्ली आहे. भौतिक जगात, अनेक प्रकारे आम्ही प्रभावी वर्तणुकी मॉडेल करतो. उदाहरणार्थ, पार्कातल्या ट्रिपवर गेलेले असताना ग्राऊंडवरील कचरा उचलण्याची आणि कदाचित तो फेकण्याची आपल्याला संधी मिळू शकते. जरी आपण काहीही बोलत नसलो तरीदेखील, आमच्या मॉडेलिंगने हे शिकवले आहे की जरी आपण कचरा केलेला नसला तरीही, शेअर केलेली जागा स्वच्छ करून ती अधिक चांगली बनवण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे.
डिजिटल वर्ल्डमध्ये प्रभावी वर्तणुकींचे मॉडेल करणे खूप महत्त्वपूर्ण आहे. पालक म्हणून, तुम्ही आधीच महत्त्वपूर्ण पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर मॉडेल या रूपात करत असण्याची शक्यता आहे जो तुमच्या किशोरवयीन मुलासाठी मौल्यवान असू शकतो. तुम्ही Facebook वर फॉलो करत असलेल्या स्थानिक फुड बँकेला देणग्यांची गरज आहे हे लक्षात येणे आणि त्याबद्दल ऑनलाईन मेसेज पोस्ट करून तुमच्या फॉलोअरना योगदानामध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करणे समाविष्ट असू शकते. किंवा कदाचित एखाद्या अनुभवाबद्दल पोस्ट करणे जिथे तुम्ही अशा व्यक्तीला पाठिंबा देत आहात जिला योग्य वागणूक दिली जात नाही आणि इतरांनाही तसे करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
पण प्रभावी डिजिटल वर्तणूक मॉडेल करण्यासाठीचे हे अतिरिक्त आव्हान आहे. कचरा उचलणे किंवा किराणा सामान घेऊन जाणाऱ्या व्यक्तीसाठी दार उघडे ठेवणे, एखादे लहान मूल पालकांना कॉम्प्यूटर वापरताना पाहणे, या सर्व कृती सारख्याच दिसतात. जरी आपण ईमेल तपासत असलो, गेम खळत असलो किंवा ऑनलाईन सेवांची कृती करत असलो तरी, निरीक्षण करणाऱ्याला आपण फक्त कॉम्प्यूटर समोर नुसतेच बसलो आहोत असे दिसते. हे चांगल्या डिजिटल वर्तणूक मॉडेल करण्यासाठी उपयुक्त असू शकत नाही.
चांगली डिजिटल वर्तणूक मॉडेल करण्याबद्दल उघडपणे बोलायला शिकणे हा सोपा उपाय आहे. उदाहरणार्थ आपण एखाद्या व्यक्तीला ऑनलाईन मदत करत असतो तेव्हा आपण नेमकं काय करत आहोत हे आपल्या मुलांना सांगण्यासाठी आपण थोडा वेळ देऊ शकतो; “मी तात्काळ तेथे असेन, मी माझ्या शेजारणीची उद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट असून तिला नेण्यासाठी राईडची व्यवस्था करत आहे”. शक्य होईल तेव्हा, आपण त्यांना दयाळूपणाच्या डिजिटल कृती आणि सेवांमध्ये देखील सामील करू शकतो; “मी पुढील आठवड्यातील रक्तदान प्रमोट करण्यासाठी Facebook वर आमंत्रण पोस्ट करत आहे - ते कसे दिसते?” डिजिटल दयाळूपणाच्या आपल्या कृती या वर्तणुकींचे असे आदर्श समोर ठेवतात, ज्या किशोरवयीन मुले डिजिटल स्पेसमध्ये आत्ता व भविष्यात कशा प्रकारचे लोक असू शकतात हे घडवण्यात आणि परिभाषित करण्यात मदत करतात.