ऑनलाईन गोपनीयतेचे महत्त्व

सोशल मीडियावर, तुमच्या पोस्ट कोण पाहू शकते ते तुम्ही काय पोस्ट करता तितकेच महत्त्वाचे असू शकते. किशोरवयीन मुलांनी त्यांच्या गोपनीयता सेटिंग्जबद्दल निवडी कशा करायच्या हे जाणून घेण्यात त्यांची मदत करणे आणि त्यांच्या ऑनलाईन अनुभवांवर नियंत्रण ठेवणे पालक आणि आई वडिलांसाठी महत्त्वाचे आहे.

काळानुसार, किशोरवयीन मुलांच्या गोपनीयता गरजा आणि अपेक्षा बदलू शकतात, त्यामुळे नियमितपणे त्याबाबतीत तपासणी करणे आणि त्यांच्या गोपनीयता सेटिंग्ज त्यांच्या स्वतःच्या स्टँडर्डची पूर्तता करतात याची खात्री करणे, तसेच ते त्यांच्या सेटिंग्ज कधीही अपडेट करू शकतात हे त्यांना माहीत असणे उपयुक्त ठरते.

तुमच्या किशोरवयीन मुलांसोबत त्यांच्या ऑनलाईन गोपनीयतेबद्दल बोलण्यासाठी 5 टिपा

ऑनलाईन गोपनीयतेबद्दलचे संभाषण चालू करणे तितकेसे सोपे नसते, परंतु ते करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या किशोरवयीन मुलासोबत तुमच्या संभाषणाबद्दल येथे काही टिपा आहेत.

  1. तुमच्या किशोरवयीन मुलाला ते नियंत्रित करू इच्छित असलेल्या माहितीच्या संबंधात गोपनीयता सेटिंग्ज समजून घेण्यास मदत करा. जर तुमचे किशोरवयीन मूल (किंवा कोणीही!) सोशल मीडिया वापरणार असेल तर, त्यांना त्यांच्या गोपनीयता सेटिंग्ज काय आहेत आणि त्यांच्या विशिष्ट गरजांना अनुकूल होण्यासाठी त्या कशा बदलायच्या हे त्यांना माहित असायला हवे. जेव्हा तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलाशी बोलता तेव्हा, गोपनीयता सेटिंग्जबद्दल लोकांना असणाऱ्या काही सामान्य प्रश्नांद्वारे त्याला गाईड करा, जसे की:

  • या गोपनीयता सेटिंग्ज मी काय शेअर करत आहे ते कोणते प्रेक्षक पाहू शकतात हे मला निवडू देतील का?
  • या सेटिंग्ज मला कोणती वैयक्तिक माहिती (जसे की, नाव, लोकेशन, फोन नंबर किंवा ईमेल पत्ता) खाजगी ठेवण्यात मदत करू शकतील?
  • मी ओळखत नसलेल्या लोकांसह — मला कोण संपर्क करू शकते हे मी नियंत्रित करू शकेन?
  • अॅपला माझे भौतिक लोकेशन ट्रॅक करण्यापासून रोखण्यासाठी काही सेटिंग्ज आहेत का?

    संपूर्ण Meta तंत्रज्ञानावरील गोपनीयता सेटिंग्जबद्दल अधिक जाणून घ्‍या:

    Instagram
    Facebook
    Messenger
    WhatsApp
    Oculus

2. तुमच्या किशोरवयीन मुलाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संबंधात त्यांच्या ऑनलाईन गोपनीयतेच्या अपेक्षांबद्दल विचारा. Meta तंत्रज्ञानावर खाते असलेले कोणीही यांसारख्या सेटिंग्ज नियंत्रित करू शकतात जसे की: त्यांचा कंटेन्ट कोण पाहते आणि त्यांच्या फ्रेंड किंवा फॉलोअर लिस्टमध्ये कोण आहे. त्यांची किशोरवयीन मुले त्यांच्या पालकांकडून आणि आई वडिलांकडून कोणती माहिती गोपनीय ठेवू शकतात याबद्दलचे प्रत्येक कुटुंबाचे नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि दृष्टीकोन वेगवेगळे असतील — आणि प्रत्येक किशोरवयीन मुलाच्या गोपनीयतेच्या अपेक्षा देखील कालांतराने बदलतील. तुमच्या किशोरवयीन मुलांना सुरक्षित ठेवणे आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करणे यामध्ये योग्य संतुलन राखणे हे एक आव्हान असू शकते. विश्वासावर आधारित नातेसंबंध स्थापित करण्याची गुरुकिल्ली म्हणजे सतत त्यांच्यासाठी गोपनीयतेचा अर्थ काय आहे आणि त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या मर्यादा (जसे की काय ऑनलाईन शेअर करणे त्यांना योग्य वाटते आणि तुम्ही त्यांच्यासोबत ठरवलेले नियम) याबद्दल संभाषण करत राहणे होय.

3. तुमच्या किशोरवयीन मुलांना त्यांच्याकडे असलेल्या गोपनीयता सेटिंग्जबद्दल किंवा त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर सेट करण्याची योजना विचारा. तुम्ही विचारू इच्छित असलेल्या पहिल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्यांचे खाते प्रत्येकासाठी किंवा निवडक गटासाठी उपलब्ध असेल. उदाहरणार्थ, Instagram वरील खाती सार्वजनिक किंवा खाजगी असू शकतात. ते ऑनलाइन पोस्ट करत असलेल्या गोष्टी कोण पाहते आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट होते यावर त्यांचे नियंत्रण आहे हे समजून घेण्याने त्यांना सोशल मीडियावर — सुरक्षितपणे राहण्यास सक्षम वाटेल उदाहरणार्थ, Instagram असे अनेक टूल ऑफर करते जे तुमच्या किशोरवयीन मुलाला त्याच्या गोपनीयतेवर आणि डिजिटल फुटप्रिंटवर नियंत्रण देते. 16 वर्षांखालील (किंवा काही देशांमध्ये 18 वर्षांखालील) किशोरवयीन मुले जेव्हा Instagram वर साइन अप करतात, त्यांची खाती स्वयंचलितपणे खाजगीमध्ये डीफॉल्ट होतात. त्यानंतर त्यांनी त्यांचे खाते सार्वजनिकवर स्विच करण्याचे निवडल्यास, ते अद्याप फॉलोअर काढू शकतात, त्यांच्या पोस्टवर कोण कमेंट करू शकते ते निवडू शकतात आणि त्यांच्या अ‍ॅप सेटिंग्जवर जाऊन त्यांचा अ‍ॅक्टिव्हिटी स्टेटस बंद करू शकतात (म्हणजे ते अॅपवर कधी अ‍ॅक्टिव्ह असतात हे लोकं त्यांच्या ॲप सेटिंग्जवर जाऊन पाहू शकत नाहीत).

4. तुमच्या किशोरवयीन मुलाला तो कोणती माहिती खाजगी ठेऊ इच्छित आहे, आणि इतरांसोबत ऑनलाईन काय शेअर करायला योग्य वाटते हे विचारा. इंटरनेटवर गोष्टी शेअर करण्याच्या वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या सोयींच्या पातळ्या असतात. किशोरवयीन मुले जशी मोठी होतात आणि स्वतःबद्दल व ते कशाला महत्त्व देतात हे जाणून घ्यायला लागतात, तेव्हा ऑनलाईन गोपनीयतेबद्दलची त्यांची परिभाषा खूपच बदलते! त्यांनी कोणती माहिती सार्वजनिकपणे शेअर करावी किंवा करू नये (जसे की त्यांचा फोन नंबर,पत्ता आणि इतर संवेदनशील माहिती), आणि अधिक खाजगी अनुभव कसे सक्षम करावे याबद्दल मूळ नियम सेट करणे महत्त्वाचे आहे.Instagram वर किशोरवयीन मुले जिवलग मित्र सूचीतयार करू शकतात आणि केवळ त्याच लिस्टवरील लोकांसोबत त्यांच्या स्टोरीज शेअर करू शकतात — ज्या ते कधीही संपादित करू शकतात. यामुळे लोकांना अधिक वैयक्तिक क्षणचित्र केवळ त्यांनी निवडलेल्या लहान ग्रुपसोबत शेअर करण्याची लवचिकता मिळते.

5. तुमच्या किशोरवयीन मुलाला नियमितपणे गोपनीयता चेकअप करण्यासाठी प्रोत्साहित करा. ऑनलाईन गोपनीयता निवडी नोंदणीवर थांबत नाहीत. आमच्या निवडीप्रमाणे उपलब्ध गोपनीयता सेटिंग्ज कालांतराने बदलू शकत असल्याने, तुमच्या किशोरवयीन मुलांशी त्यांच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये आवश्यकतेनुसार रिव्ह्यू करणे आणि नियमित बदल करण्याच्या महत्त्वाबद्दल बोला.

किशोरवयीन मुलांसाठी अतिरिक्त गोपनीयता टिपा

Instagram वर खात्यासाठी साइन अप करणारा आणि 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेला प्रत्‍येकजण (किंवा काही देशांमध्ये 18 पेक्षा कमी वय असलेला) खाजगी खात्यामध्ये डिफॉल्ट असतो. आम्हाला तरुणांनी सहजपणे नवीन फ्रेंड करायला आणि त्यांच्या कुटुंबाशी देखील जोडलेले रहायला हवे आहे, परंतु अनोळखी व्यक्तींकडून येणारे नको असलेले DMs किंवा कमेंटशी डील करण्यात आम्ही त्यांची मदत देखील करू इच्छितो. त्यामुळे आम्हाला वाटते की खाजगी खाती हा योग्य पर्याय आहे.

तरीही, आम्ही जाणून आहोत की काही तरुण क्रिएटरना फॉलो करणारे लोक वाढवण्यासाठी, कम्युनिटी बनविण्यासाठी, किंवा त्यांना काळजी वाटणाऱ्या समस्यांचे समर्थन करण्यासाठी सार्वजनिक खाते हवे असू शकते. त्यामुळे, त्या निवडीचा अर्थ काय याविषयी माहिती देऊन आम्ही तो पर्याय उपलब्ध करून देतो.

तुम्ही आणि तुमचे किशोरवयीन मूल आणखी ऑनलाईन कनेक्ट होताना आणि शेअर करत असताना, तुमच्यासाठी गोपनीयता म्हणजे काय, आणि तुम्ही पोस्ट करण्यापूर्वी गंभीरपणे विचार करणे कसे चालू ठेवायचे याबद्दलचे संभाषण चालू ठेवा.

संबंधित विषय

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला