ParentZone
तुमच्या किशोरवयीन मुलाचे नातेसंबंध पूर्णपणे ऑनलाईन अस्तित्त्वात असले किंवा ते मिश्र म्हणजेच, ऑनलाईन-ऑफलाईन स्वरूपाचे असले तरीदेखील त्याला/तिला त्या नात्यात कधी तरी अडचणी येणे अपरिहार्य आहे.
सहजपणे नात्यातनू बाहरे पडणे असो किंवा ते कठीण, विस्कटलेले आणि भावनात्मक पातळीवर संपलेले नाते असो, या गोष्टींचा विचार करा: तुमच्या प्रारंभिक प्रतिसादापासून त्यांना साकारात्मकरित्या पुढे जाण्यासाठी मदत करा.
ऑनलाईन नातेसंबंधांचा आदर करा
सर्व मैत्री आणि नातेसंबंधांमध्ये वेळोवेळी आव्हाने येत असतात. नातेसंबंध केवळ-ऑनलाईन स्वरूपाचे असले तरी, हे देखील खरे नातेसंबंध आहेत.
केवळ-ऑनलाईन स्वरूपाचे संबंध तुमच्या किशोरवयीन मुलांसाठी तितकेच महत्त्वाचे असू शकतात जितके ते शाळेत किंवा आठवड्याच्या शेवटी लोकांना भेटतात. प्रयत्न करा आणि या मित्रांचा आदर करा.
सकारात्मक कृती करणे
उदाहरणार्थ, तुमच्या किशोरवयीन मुलाने Instagram वर एखाद्याला ब्लॉक करणे किंवा त्याची तक्रार केली असल्याचे आढळणे, हे काहीतरी चुकीचे घडत असल्याचे पहिले लक्षण असू शकते. परंतु हे काहीतरी बरोबर झाल्याचे लक्षण देखील असू शकते.
चांगली गोष्ट: जर त्यांनी एखाद्यास ब्लॉक केले किंवा तक्रार केली, तर ती सकारात्मक कृती आहे. ते स्वतःला संरक्षित करण्यासाठी उपलब्ध टूल वापरतात, यामधून त्यांची स्वयं-जागरूकता आणि आत्मविश्वास दिसून येतो.
घाई करणे आणि काय घडले आहे आणि का हे शोधणे स्वाभाविक आहे. तुमचे किशोरवयीन मूल सकारात्मक कृती करत आहे हे ओळखणे आणि तुम्हाला याचा किती आनंद झाला आहात हे त्यांना सांगणे, ही अधिक तपशिलांची मागणी करण्यापेक्षा संभाषणाची चांगली सुरुवात आहे.
साईड-बाय-साईड क्षण
तुमच्या किशोरवयीन मुलाशी संभाषण सुरू करण्यासाठी योग्य वेळ शोधण्यासाठी सर्व पालकत्त्व कौशल्ये वापरण्याची आवश्यकता आहे.
साईड-बाय-साईड हे ते मौल्यवान, आरामदायी क्षण आहेत जिथे तुमच्याकडे त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे याबद्दल बोलण्याची आणि चर्चा करण्याचा संधी असते. ते क्षण कदाचित स्वयंपाक करताना किंवा कार प्रवास करतानाचे क्षण असू शकतात. हळूच हा विषय कधी काढायचा ती योग्य वेळ तुम्हाला माहीत असली पाहिजे.
महत्त्वाचे म्हणजे थोडी वाट पहा व तो क्षण आपसूकपणे येऊ द्या. जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका – अन्यथा तुमचे संभाषण चौकशी करत असल्यासारखे वाटू शकते.
ऑफलाईन वाईट परिणाम
त्यांना Instagram वर ज्या व्यक्तीला ब्लॉक करायचे आहे किंवा तक्रार करायची आहे ती त्यांच्या दैनंदिन जीवनात दिसल्यास गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात - आणि वाईट परिणामांबद्दल त्यांना काळजी वाटू शकते.
त्या व्यक्तीला माहीत असेल की तुमचे किशोरवयीन मूल त्यांना Instagram वर यापुढे फॉलो करत नाही तर, काय घडू शकते हे समजणे अवघड नाही.
तुमच्या किशोरवयीन मुलासमोर ती व्यक्ती आल्यास, तुमचे मूल ही घटना कशी हाताळू शकते याबद्दल किशोरवयीन मुलाला विचार करण्याबाबत तुम्ही मदत करू शकता. तुम्ही एकत्रितपणे काही प्रतिसाद आचरणात आणू शकता.
गोष्टी अधिस क्लिष्ट होऊ नयेत यासाठी, आरोपात्मक भाषा वापरणे टाळा. उदाहरणार्थ, ते “मला वाटते…” यापेक्षा “तुम्ही…” अशी वाक्याची सुरुवात करू शकते.
तुमचे किशोरवयीन मूल दुसऱ्या व्यक्तीला Instagram वर ब्लॉक करण्याऐवजी प्रतिबंधित करणे देखील निवडू शकते. अन्य व्यक्ती त्यांच्यासोबत कधी आणि कसे इंटरॅक्ट करू शकते याचे नियंत्रण तुमच्या मुलाला करू देण्यात यामुळे मदत होते – ते काय पाहतात याचे नियंत्रण करणे असो किंवा त्यांच्या कमेंटना मंजूरी देण्याचे नियंत्रण करणे असो. येथे अधिक वाचा.
तुमच्या किशोरवयीन मुलाला आठवण करून द्या: नेहमीच जसे दिसते तसे नसते, सोशल मीडियावर कोणाला फॉलो करायचे ही वैयक्तिक निवड असते. ते कोणाला फॉलो करतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे.
नुसते ऐका
बरेचदा, सर्वात उत्तम गोष्ट जी पालक करू शकतात ती म्हणजे ऐकणे. त्यांना त्यांचे म्हणणे मांडू द्या. तुमच्याकडून फार जास्त इनपुट न घेता पुढे काय करायचे हे ते ठरवू शकतात – फक्त त्यांच्यासोबत रहा.
लक्षात ठेवा: त्यांना त्यांच्या चुका करू द्या आणि त्यांच्या आव्हानांना त्यांना स्वतःला सामोरे जाऊ द्या, त्यामुळे ते कुठल्याही प्रसंगांना तोंड देऊ शकतील. हा सर्व तुम्ही त्यांना त्यांच्या लहानपणापासून शिकवत आला आहात ती सोशल कौशल्ये तपासून पाहण्याचाच भाग आहे.
ते त्यांच्या जीवनात पुढे निघून गेले आणि मागचे सर्व विसरून गेले तरी देखील तुम्हाला त्यांच्यासोबत जे घडले त्यामुळे कदाचित निराशाजनक किंवा अस्वस्थ वाटू शकते. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे, तुम्ही सूत्रे हातात घेण्यापेक्षा त्यांनी नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
पुढे जाणे
तुमच्या किशोरवयीन मुलाला पुढे काय करायचे आहे ते विचारा. उपयुक्त प्रश्न हा असू शकतो: त्यांना या नातेसंबंधात सुधारणा करायची आहे का?
नसल्यास, असे गृहीत धरू नका किंवा अपेक्षा करू नका की ते काही वेळासाठी ऑनलाईन स्पेस किंवा स्पेसेसपासून दूर राहतील - जिथे हा नातेसंबंध सुरू झाला. यामुळे त्यांना असे वाटू शकते की ते महत्त्वाचा सोशल किंवा सपोर्ट नेटवर्क गमावत आहेत.
तथापि, त्यांना कदाचित पुढेही संपर्क कायम ठेवल्यास त्याच्या परिणामांबद्दल विचार करावा लागेल – उदाहरणार्थ, ते कुठे भेटू शकतात किंवा ग्रुप सोडण्याने त्यांना म्युच्युअल फ्रेंडसोबत असलेला संपर्क गमावण्याची जोखीम वाटू शकेल.
त्यांना हे समजून घ्यावे लागेल की ते संपूर्णपणे एखाद्याला टाळू शकत नाहीत. अद्याप त्याच प्रमाणात भावना जागृत असतील तर, परिस्थिती कठीण होते.
पण तरीही तुम्ही त्यांच्यासोबत असा. ते जे करू इच्छितात त्यासाठी योजना आखण्यात – आणि त्यानुसार कृती करण्यात तुम्ही त्यांची मदत करू शकता, मग ते काही मित्र किंवा सोशल ग्रुपपासून काही काळासाठी लांब राहावे लागणे असले तरीही. ते दुसऱ्या व्यक्तीसोबत ऑनलाईन स्पेस शेअर करणे स्वीकारणे – आणि ते कसे प्रतिसाद देतात हे समजून घेणे असू शकते.
पुढे जे घडेल त्याबाबतचे नियंत्रण त्यांच्याकडे आहे याची जाणीव त्यांना करून देण्यात मदत करण्यासाठी त्यांच्या इच्छा-आकांक्षांना पाठिंबा द्या – आणि भविष्यात नकारात्मकता एका सकारात्मक अनुभवात रूपांतरित करण्यासाठी त्यांना मदत करा.
अधिक सल्ल्याची हवा आहे? येथे कुटुंब केंद्रविषयीचे अधिक लेख वाचा.