सोशल मीडियावरील चुकीची माहिती: तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलाला कशी मदत करू शकता?

Meta

9 मार्च 2022

सोशल मीडिया आणि चुकीची माहिती

इंटरनेटवर खूप जास्त माहिती असते, आणि त्यामुळे काय सत्य आणि काय विश्वसनीय आहे, आणि काय नाही हे समजून घ्यायला वेळ आणि श्रम लागतात. प्रत्‍येकजणाप्रमाणे, तरुणांमध्येही ऑनलाईन चुकीची माहिती तात्काळ शोधण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे.

चुकीची माहिती ओळखत आहात का?

‘चुकीची माहिती’ याची कोणतीही एकच अशी व्याख्या नाही. परंतु ती 'चुकीच्या माहिती' पासून वेगळी "खोटी माहिती" म्हणून सामान्यतः ओळखता येते, म्हणजेच ती एखाद्याला फसवण्याच्या उद्देशाने पसरवली जात नाही.

सोशल मीडियावर, ती सनसनाटी हेडलाईन म्हणून किंवा अतिशयोक्ती केलेली पोस्ट म्हणून दिसू शकते, जी खोटी छाप मारण्यासाठी संदर्भास अनुसरून नसते. स्पॅमर तिचा वापर क्लिक वाढवण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी करतात, आणि विरोधक ती निवडणुका आणि वांशिक संघर्षासाठी वापरू शकतात.

चुकीच्या माहितीच्या विरोधात लढा देणे

चुकीच्या माहिती विरोधातील लढा दडपण आणणारा वाटू शकतो, पण तिचा प्रसार होऊ नये यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो.

Meta येथे, चुकीची माहिती थांबवण्याच्या आमच्या रणनीतिचे तीन भाग आहेत:

  • आमचे कम्युनिटी स्टँडर्ड किंवा जाहिरात धोरणाचे उल्लंघन करणारी खाती आणि कंटेन्ट काढणे
  • चुकीच्या माहितीचे वितरण आणि क्लिकबेटसारखा अनधिकृत कंटेन्ट कमी करणे
  • लोकांना ते पाहत असलेल्या पोस्टबाबत अधिक संदर्भ देऊन माहिती देणे

हा दृष्टीकोन चुकीच्या माहितीचा प्रसार थांबवण्यासाठी आणि सार्वजनिक संवाद-चर्चेचे दमन न करता लोकांना सर्व माहिती मिळण्यात मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

पालक आणि तरुणांचीदेखील यात भूमिका आहे. ब्रिजवॉटर स्टेट युनिव्हर्सिटी येथील मॅक्सवेल लायब्ररी यांनी हायलाईट केलेल्या कल्पनांनुसार, तुम्हाला आणि तुमच्या किशोरवयीन मुलांना सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या माहितीच्या अचूकतेबाबत पारख करण्यात मदत करणाऱ्या आणखी काही टिपा येथे दिल्या आहेत:


टीप #1: सखोल माहिती घ्या

केवळ हेडलाईन आणि स्टोरीचे छोटे अंश आपल्याला बरेच काही सांगू शकतात. आपल्याला जे दिसते किंवा आपण जे ऐकतो त्यापलिकडील गोष्टींचा संपूर्ण संदर्भ मिळण्यासाठी मूळ सोर्स सामग्रीवरील पोस्ट किंवा लिंकच्या पलिकडे पाहणे देखील उपयुक्त असते.

टीप #2: इंटरनेट वापरा

जर एखादी स्टोरी आधीपासूनच सत्यता-तपासकांद्वारे फ्लॅग केलेली नसेल, तर बर्‍याचदा झटपट शोध घेऊन ती अचूक आहे की नाही हे उघड होईल. न्यूजचे चांगले सोर्स इतर कायदेशीर न्यूज साईटवर देखील लिंक केलेले असतील.

टीप #3: तुमचा सारासार विवेक वापरा

स्वतःला विचारा: मी जे वाचत आहे त्याचा आधार किती वाजवी आहे? लेखकाचा हेतू काय होता? ही न्यूज स्टोरी आहे की मताचा एक भाग आहे? सत्य तपासण्याचा असे कोणतेही एक सूत्र नाही, पण कधीकधी त्यासाठी थोडे जास्त श्रम घ्यावे लागतात.

टीप #4: उद्धरणांबाबत संशोधन करा

इंटरनेटवर अशी बरीच उद्धरणे येत असतात ज्याचे श्रेय ज्या लोक असे कधीच म्हंटलेले नसते त्यांना दिले जाते. कोणत्याही गोष्टीप्रमाणेच, शेअर करण्यापूर्वी एक थोडे संशोधन केले तर ते दीर्घकाळ उपयुक्त ठरते.

टीप #5: स्कॅमी जाहिराती किंवा इतर “क्लिकबेट” पहा

काही चुकीच्या माहितीचे शोधक तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर क्लिक करावे यासाठी तसे करतात, यामुळे त्यांना तुम्हाला जाहिरात पाठवता येते. कमी-गुणवत्ता आणि स्कॅमी जाहिराती ही लक्षणे विश्वासाला पात्र नाहीत.

टीप #6: सनसनाटी कंटेन्ट आहे का ते पहा

खराब व्याकरण, उद्गारवाचक चिन्हांचा अतिवापर, सर्व कॅपिटल वाक्ये आणि तुमच्या भावनांना मोठ्या प्रमाणात केलेले अपील याकडे लक्ष द्या. बरीचशी चुकीची माहिती केवळ प्रतिक्रिया मिळवण्यासाठी डिझाईन करण्यात येते, माहिती देण्यासाठी नाही.

टीप #7: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गंभीरपणे वाचा

काहीही शेअर करण्यापूर्वी, हे महत्त्वाचे आहे की केवळ सनसनाटी मथळे न वाचता, शांत रहा आणि गांभीर्याने संपूर्ण स्टोरी वाचा.

सोर्स विश्वसनीय कशाने बनतो

आपण चर्चा केल्याप्रमाणे, तरुणांना चांगले ऑनलाईन कंटेन्ट वाचक होण्यात मदत करणे, विश्वासार्ह सोर्स ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे हे प्रश्न विचारणे: कोण? काय? कुठे? का? केव्हा?

  • हा कंटेन्ट कोणी तयार केला?
  • हा कंटेन्ट कशाचा निर्देश देतो?
  • तो कोठे तयार करण्यात आला?
  • तो का तयार करण्यात आला?
  • तो केव्हा तयार करण्यात आला?

विश्वसनीय सोर्स ओळखण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, पुढील टिपा पहा:

तुम्हाला चुकीची माहिती दिसली तर काय करायचे

चुकीची माहिती पोस्ट करणाऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत संभाषण चालू ठेवणे खूप कठीण गोष्ट असू शकते, विशेषतः जेव्हा ती व्यक्ती तुमचा मित्र किंवा कुटुंबातील सदस्य असते. हे असे क्षण म्हणजे मोकळेपणाने बोलण्याची आणि विश्वसनीय सोर्सकडील अचूक माहिती शेअर करण्याची खरंतर संधी असते.

तुमच्या किशोरवयीन मुलांसाठी चुकीच्या माहितीच्या आसपास इंटरॅक्शन नेव्हिगेट करताना लक्षात ठेवण्यासाठी येथे काही टिपा आहेत:

  • सोशल मीडियावर मित्र किंवा कुटुंबाला सुधारणा करण्यास सांगताना सौम्यपणा दाखवा

चुकीची माहिती बरेचदा इतरांना पटवून देण्यासाठी भावनिक आवाहनावर अवलंबून असल्यामुळे, अशा प्रकारचा कंटेन्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीशी बोलणे कठीण आणि अत्यंत भावनिक असू शकते. त्या भावनांबद्दल जागरूक राहणे आणि इतरांना कसे वाटू शकते याबद्दल सहानुभूती दाखवणे कोणत्याही इंटरॅक्शनबाबत संदर्भ देण्यास मदत करते.

  • चुकीची माहिती शेअर केल्याबद्दल कोणालाही सार्वजनिक ठिकाणी लाजवू किंवा लाजीरवाणे वाटू देऊ नका

खाजगी संभाषणंमुळे सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरसमज टाळता येतात. विश्वसनीय सोर्सकडील ताज्या बातम्यांकडे इशारा करताना वाणी सभ्य आणि सकारात्मक ठेवा.

सर्व तंत्रज्ञानावर Meta चुकीच्या माहितीचा प्रसार कमी कसा करत आहे याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला