आपल्या सर्वांना तसेच आपल्या किशोरवयीन मुलांना देखील अपरिहार्यपणे ऑनलाईन स्वरूपात अस्वस्थ करणारा, संभ्रमित करणारा किंवा भीतीदायक कंटेन्ट आढळेल.
असे घडण्यापासून रोखण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, हे घडेल तेव्हा नव्हे, तर घडते तेव्हा तुम्ही कसा प्रतिसाद द्याल याचा विचार करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या किशोरवयीन मुलांच्या समोर येणाऱ्या गोष्टी हाताळण्यात त्यांना मदत करण्यासाठी तुम्हाला राजकारणापासून पोर्नोग्राफीपर्यंतच्या गोष्टींविषयी काय वाटते यावर अगोदरच विचार करणे उपयुक्त ठरते.
असे करण्याचे अनेक मार्ग आहेत: सुरुवातीच्या प्रतिसादापासून, धोक्याचा इशारा शोधण्यापर्यंत किंवा निराशेला सामोरे जाण्यापर्यंत.
तुमच्या किशोरवयीन मुलाने काय पाहिले?
संदर्भ महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कंटेन्ट अनेक कारणांमुळे अस्वस्थ करणारा असू शकतो. हे अत्यंत काल्पनिक दृश्य किंवा व्हिडिओ फुटेज किंवा वैयक्तिकरित्या आक्षेपार्ह वर्तन असू शकते.
हे यामध्ये समाविष्ट असलेल्या लोकांमधील संबंध, ते कसे पाहिले गेले किंवा त्यामागील प्रेरणा यावर अवलंबून असू शकते. तुमच्या किशोरवयीन मुलाने ते शोधून काढले होते का किंवा त्याला अपघाताने ते आढळले होते का? जर कोणी ते त्यांच्यासोबत शेअर केले असेल तर, त्यांना अस्वस्थ किंवा अपमानित करायचे होते का?
एका व्यक्तीला त्रासदायक वाटणारी गोष्ट दुसऱ्याला व्यक्तीला तशी वाटणार नाही - त्यामुळे तुमच्या किशोरवयीन मुलाच्या भावना नाकारल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. संभाषण न केल्यास ते अविश्वसनीय सोर्सकडून उत्तरे शोधू शकतात, म्हणून त्यांचे म्हणणे ऐका आणि त्यांना काय वाटते ते पडताळून पहा. हे तुम्हाला क्षुल्लक वाटले तरी हरकत नाही: तुमचे मूल अस्वस्थ झाले असल्यास, ते त्रासदायक असते.
संकेत शोधणे
तुम्हाला कदाचित नोटिफिकेशन प्राप्त झाले असेल की त्यांनी कंटेन्टची तक्रार केली आहे किंवा एखाद्याला ब्लॉक केले आहे – याचा अर्थ असा की त्यांनी तुमच्याकडे याची तक्रार करण्याचा पर्याय निवडला आहे. परंतु जेव्हा तुमचे किशोरवयीन मूल एखाद्या गोष्टीमुळे अस्वस्थ होते तेव्हा ते तुमच्याकडे येईलच असे तुम्ही गृहित धरू शकत नाही.
ते तुमच्यासोबत सुरुवातीला चर्चा करू शकत नाहीत याची अनेक कारणे असू शकतात. त्यांनी जे पाहिले आहे ते पाहून ते गोंधळलेले असतील किंवा ते त्यांना (किंवा इतर कोणाला) अडचणीत आणेल अशी भीती वाटू शकते. त्यांना कदाचित माहीत असेल की त्यांनी मर्यादा ओलांडली आहे आणि त्यांना त्यांनी ऑनलाईन जाणे किंवा एखाद्या व्यक्ती किंवा ग्रुपसोबत कनेक्ट करणे थांंबवले जाण्याची चिंता आहे.
ते याबाबतीत सल्ला घेण्यासाठी प्रथम एखाद्या मित्राकडे जाऊ शकतात - जरी त्यांच्याकडे याची उत्तरे नसतील तरीही.
या काही लक्ष देण्यासारख्या काही गोष्टी आहेत:
त्यांना त्यांची समस्या मांडण्यासाठी वेळ आणि जागा उपलब्ध करून द्या. संवाद साधण्यासाठी हलकेफुलके वातावरण, जसे की कार प्रवास किंवा चालणे, त्यांना मोकळेपणाने व्यक्त होण्यास प्रोत्साहित करू शकते.
प्रतिक्रिया कशी द्यावी
त्यांनी जे काही पाहिले असेल - आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी ते पाहिले असेल तरीही - शांत रहा. त्यांना काय घडले ते समजावून सांगण्यासाठी पुरेसा वेळ आणि अवधी द्या. असे करणे कधीही सोपे नसते, परंतु कोणताही निर्णय न घेता प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकत्रितपणे सर्वतोपरी प्रयत्न कराल याविषयी त्यांना आश्वस्त करा.
कंटेन्ट स्वतः पाहू देण्यास सांगण्यापूर्वी, तुम्हाला - तुमच्या स्वतःच्या, तसेच तुमच्या किशोरवयीन मुलांच्या फायद्यासाठी ते आवश्यक आहे का असे स्वतःला विचारा.
त्यांच्यासाठी पुन्हा अनुभव घेणे त्रासदायक असू शकते आणि होऊ शकते की तुम्ही त्याचा तुमच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा जास्त विचार करणार नाही.
सकारात्मकतेने पुढे जाणे
एकत्रितपणे पुढे कसे जायचे ते ठरवा. जर त्यांनी खरोखर त्रासदायक असे काहीतरी पाहिले असेल तर त्यांना त्याविषयी समजून घेण्यासाठी वेळ लागेल.
त्यांना विशिष्ट खाते किंवा संपर्कापासून दूर राहण्याची किंवा संरक्षणाची आवश्यकता असू शकते.
त्यांच्याकडे इतर खाती अनफॉलो करण्याची, ब्लॉक करण्याची किंवा तक्रार करण्याची क्षमता आहे याची त्यांना आठवण करून द्या तसेच त्यांना तसे करण्यास प्रोत्साहित करा. संबंधित खात्याला त्याविषयी सूचित केले जाणार नाही. त्यांना खाते प्रभावित करायचे नसल्यास ते कंटेन्टची तक्रार देखील करू शकतात. ऑनलाईन नातेसंबंध तुटतात तेव्हा तुमच्या किशोरवयीन मुलाची मदत करण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती वाचा - आणि Instagram च्या पालक सुपरव्हिजन टूल्सबद्दल अधिक जाणून घ्या.
त्यांच्या गरजा काय आहेत ते ऐका आणि ओलांडलेल्या कोणत्याही मर्यादा पूर्ववत करताना तुमचा त्यांना पाठिंंबा आहे हे नक्की कळू द्या.
कंटेन्ट तीव्र स्वरूपाचा असल्यास किंवा काहीतरी आपराधिक घडले असल्यास अधिक गंभीर कृती करण्याची गरज असू शकते.
हे आव्हानात्मक वाटू शकते - परंतु याकडे सकारात्मक कृती म्हणून पाहायला हवे. तुमच्या किशोरवयीन मुलांना ते भविष्यात अशाच प्रकारच्या कंटेन्टच्या संपर्कात येण्यापासून इतरांचे संरक्षण करू शकतात हे सांगून प्रोत्साहित करा.
कंटेन्ट किंवा संदर्भानुसार, तुम्हाला देखील सहाय्याची आवश्यकता असू शकते – आणि अशा मदत करणाऱ्या साईट आणि संस्था आहेत.
पॅरेंट झोन वेबसाईटवर अधिक सहाय्यक सेवा सापडतील.