स्वतःची इतरांशी तुलना करणे हा मानवी स्वभाव आहे. पण असे तरुण, ते कोण आहेत हे समजण्यात आणि जगामध्ये ते नेमके कुठे फीट बसू शकतात हे समजण्यात व्यग्र आहेत, त्यांच्यासाठी या तुलना विशेषतः त्यांच्या मनात भरलेल्या असतात. मग किशोरवयीन मुले वर्गात असो, एखाद्या स्पोर्ट्स टीममध्ये असो, किंवा सोशल मीडिया वापरत असो, ते स्वतःला — कळत किंवा नकळत — त्यांचा अपिअरंस, नातेसंबंध, भावना, जीवनशैली, किंवा कौशल्ये किंवा क्षमतांची तुलना इतरांशी करत असतात. ते त्या परिमाणात बसत नाहीत असे त्यांना वाटल्यास, याचा त्यांच्या मानसिक कल्याणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. द जेड फाऊंडेशन येथील तज्ञांनी अशा संशोधनाकडे लक्ष वेधले जे दर्शवते की दुर्लक्षित, सातत्यपूर्ण नकारात्मक सामाजिक तुलना कमी आत्मसन्मान, एकाकीपणा, स्वतःची खराब इमेज आणि जीवनातील असंतोष या भावनांना कारणीभूत ठरू शकतात.
द जेड फाऊंडेशन ने ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीवर सामाजिक तुलना व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन विकसित केले आहे. आम्ही तुम्हाला तुमच्या किशोरवयीन मुलांसोबत त्यांच्या सोशल मीडियासंबंधित भावना जाणून घेण्यास मदत करण्यासाठी खालील टिपा शेअर करण्याकरिता आणि त्यावर चर्चा करण्यास आणि तुम्हाला स्वतःची सकारात्मक इमेज तयार करणाऱ्या सवयी — एकत्र — विकसित करण्यास प्रोत्साहित करतो.
जर तुमचे किशोरवयीन मूल स्वतःबद्दल सकारात्मक गोष्टी सांगण्यात संघर्ष करत असल्यास, पुढाकार घ्या आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काय आवडते ते सांगा! एखाद्या मित्राला सकारात्मक इनपुट सांगण्यास त्यांना प्रोत्साहित करा किंवा दुसर्या मार्गाने सांगायचे झाले तर, त्यांना विचारा: ज्यांना स्वतःबद्दल वाईट वाटत असेल त्यांना ते कोणत्या प्रकारच्या किंवा सकारात्मक गोष्टी सांगतील?
सामाजिक तुलना करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी वैयक्तिक आणि सूक्ष्म असतात. संशोधन दर्शवते, की आपण कुठे ऑनलाईन जातो आणि आपण प्रत्येकजण प्लॅटफॉर्मवर काय योगदान देतो (जसे की तिथे असण्याची प्रेरणा, आत्मविश्वासाची पातळी आणि त्या दिवशी तुम्हाला कसे वाटते) त्याचा आपण कंटेन्टला कसा प्रतिसाद देतो यावर परिणाम होतो. तुमच्या मूडवर, अलीकडील अनुभवांवर आणि विशिष्ट साईटवर जाण्याच्या कारणांवर आधारित, अगदी समान कंटेन्ट तुम्हाला भिन्न प्रकारची जाणीव करून देतो. याचा अर्थ या टिपा युनिव्हर्सल नाहीत, तर तुमच्या किशोरवयीन मुलाशी पुढील चर्चा करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून आहेत.
किशोरवयीन मुलांसाठी आई वडील किंवा पालक म्हणून, कदाचित तुम्ही अशी महत्त्वाची गोष्ट करू शकता ज्यामध्ये तुम्ही कुतूहलाने आणि सहानुभूतीने त्यांना ऐकत आहात. सोशल मीडियावर राहून त्यांना कसे वाटते याकडे लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे हे समजण्यास त्यांना मदत करा. अगदी लहान गोष्टींवरून, चिडचिड होणे, हे याचे लक्षण आहे की सोशल मीडिया सोडून काहीतरी वेगळे करण्याची वेळ आली आहे. तुमच्या किशोरवयीन मुलाला तुम्ही त्यांच्यासाठी आहात आणि नेहमीच त्यांच्यासोबत ते सोशल मीडियावर कसे एंगेज होतात याबद्दल मोकळेपणाने संभाषण करण्यासाठी (चांगले, वाईट आणि त्यामधील सर्वकाही) उपलब्ध आहात ही जाणीव करून द्या.
तुमच्या किशोरवयीन मुलाला आठवण करून द्या की सोशल मीडियावर जे पाहतो त्यापेक्षा त्यांच्यासाठी खूप काही आहे. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय आवडते आणि ते कोण आहेत याबद्दल तुम्ही किती प्रभावित आहात हे त्यांना सांगा. जर तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलामध्ये स्वत:बद्दल लवचिकतेची भावना विकसित करू शकल्यास, ती त्यांच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी पूरक ठरेल.
शेवटी, तुम्हाला सातत्याने तुमच्या किशोरवयीन मुलाची काळजी वाटत असेल, तर लक्षात घ्या बाहेर अनेक संसाधने आहेत जी तुम्हाला तुमच्या या प्रवासात मदत करू शकतील. येथे विश्वसनीय मानसिक आरोग्य संसाधने आणि प्रदाते डिस्कव्हर करा.