जनरेटिव्ह AI बाबत पालकांसाठी मार्गदर्शन

ConnectSafely द्वारे Meta साठी तयार केले आहे

Meta बऱ्याच काळापासून लोकांना नवीन इंटरेस्ट आणि संपर्क डिस्कव्हर करण्यात व त्याचे प्‍लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी AI वापरत आले आहे, परंतु आता ते युजरला त्यांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी जनरेटिव्ह AI वापरण्याची अनुमती देत आहे. जनरेटिव्ह AI च्या सर्वसाधारण ओव्हरव्ह्यू पासून सुरुवात करू या.

जनरेटिव्ह AI कंटेन्ट, ज्यामध्ये मजकूर, इमेज, अ‍ॅनिमेशन व कॉम्प्यूटर कोड यांचा समावेश असू शकतो, तयार किंवा सुधारित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते. त्याचा उपयोग प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी किंवा नवीन दस्तऐवज तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की नियोजित सहलीसाठी प्रवासाचा कार्यक्रम ठरवणे किंवा शेक्सपीअरच्या शैलीत कविता लिहीणे. त्याची संशोधनामध्ये निबंध, रिपोर्ट आणि इतर दस्तऐवज ड्राफ्ट करण्यासाठी मदत होऊ शकते. फोटोग्राफ संपादित करण्यासाठी, लांबलचक लेखातील मुख्य मुद्द्यांचा सारांश तयार करण्यासाठी, ईमेलचा टोन सुधारण्यासाठी, खरेदी करताना प्रॉडक्टची तुलना करण्यासाठी आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो.

जनरेटिव्ह AI बाबत पालकांचा दृष्टीकोन

पालकांनी नवीन तंत्रज्ञानाचा त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम होईल याबद्दल विचार करणे स्वाभाविक आहे. आणि जनरेटिव्ह AI मुळे भूतकाळात आपल्याला कधीही तोंड न द्यावे लागलेल्या काही समस्या उभ्या राहत असल्या तरीही, तुमच्या किशोरवयीन मुलाला त्याचा सुरक्षितपणे, योग्यप्रकारे आणि परिणामकारक वापर करण्यात मदत करण्याचा मूळ दृष्टीकोन तुम्ही यापूर्वी इतर तंत्रज्ञानांचा स्वीकार केलात त्यासारखाच आहे. ते काय आहे आणि तुमची किशोरवयीन मुले ते कसे वापरत असावेत हे जाणून घेण्याने याची सुरुवात करू. याबद्दलच्या माहितीचा एक सर्वात उत्तम स्रोत तुमचे किशोरवयीन मूल असू शकते. ते जनरेटिव्ह AI वापरतात का हे त्यांंना विचारा आणि वापरत असल्यास, ते काय करतात, कोणती टूल वापरतात, त्यांना त्याविषयी काय आवडते आणि कशाबद्दल काळजी वाटते हे विचारा. याच वेळी तुम्ही त्यांच्यासोबत जनरेटिव्ह AI चे फायदे व तोटे व संभााव्य धोके तसेच त्याचा वापर जबाबदारीने कसा करावा याबद्दल देखील चर्चा करू शकता.

आणि तंत्रज्ञान बदलू शकत असले तरीही मूल्ये मात्र कायम तीच राहतात. तुम्हाला वाटत असते की, तुमच्या किशोरवयीन मुलांना अचूक माहितीचा अ‍ॅक्सेस असावा, ते काय तयार करतात व इतरांसोबत काय शेअर करतात याबद्दल त्यांनी विचार करावा व जबाबदार असावे आणि त्यांनी इतरांची व स्वतःची चांगली काळजी घ्यावी, याचा अर्थ असाही होऊ शकतो की त्यांनी तंत्रज्ञानापासून काही काळ दूर राहावे.

सर्व नवीन तंत्रज्ञानाप्रमाणेच, जनरेटिव्ह AI सतत विकसित होत आहे, त्यामुळे काळानुसार होणाऱ्या बदलांशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे, यामध्ये तुम्ही आणि तुमची किशोरवयीन मुले वापरत असलेल्या सेवांबद्दलच्या बातम्या तसेच मदत विभाग, ब्‍लॉग पोस्‍ट आणि इतर अपडेट वाचणे याचाही समावेश होतो.

Meta चा AI वापर

Meta बऱ्याच काळापासून विविध उद्देशांनी AI चा वापर करत आले आहे, जसे की शिफारशी करण्यात मदत करणे आणि लोकांना रुची असू शकते अशा इव्हेंटबद्दल त्यांना माहिती देणे. तसेच Meta त्याच्या युजरना सुरक्षित ठेवण्यासाठी देखील AI वापरते.

Meta आता त्याच्या सर्व सेवांंवर युजरसाठी जनरेटिव्ह AI उपलब्ध करून देत आहे. उदाहरणार्थ, Meta ची नवीन AI ही प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात, विविध विषयांवरील संभाषणात एंगेज करू शकतात आणि संभाषणात्मक टोनमध्ये लिखाण करू शकतात. प्रत्येक AI चे व्यक्तिमत्व आणि विशेषता वेगवेगळी आहे, जसे की गेम, खाद्यपदार्थ, प्रवास, विनोद आणि कल्पकता, परंतु ते देत असलेली उत्तरे, खरा मनुष्य नव्हे तर AI जनरेट करते.

तुम्ही AI सोबत एकास एक असे थेट संभाषण करू शकता किंवा @Meta AI आणि त्यानंतर प्रश्न किंवा विनंती टाईप करून Meta AI ला ग्रुप चॅटमध्ये जोडू शकता. Meta AI सोबत इंटरॅक्ट करताना "/imagine" असे टाईप करून किंवा थेट वेब अनुभवामधून लोक मेसेजमध्ये इमेज देखील जनरेट करू शकतात.

जनरेटिव्ह AI चे दुसरे उदाहरण म्हणजे Meta च्या प्‍लॅटफॉर्मवर लोकप्रिय असलेली स्टिकर होय. संवाद साधण्यात किंवा स्वतःला व्यक्त करण्यात मदत व्हावी म्हणून युजर मजकुराद्वारे इमेजचे वर्णन करून AI ने जनरेट झालेले स्टिकर वापरू शकतात.

Meta AI द्वारे जनरेट झालेल्या फोटोरिअलिस्टिक इमेजबाबतीत त्या मानव-निर्मित आहेत असे वाटून लोकांचा गोंधळ होऊ नये यासाठी, Meta त्या इमेजमध्ये दिसू शकणारे निर्देशक समाविष्ट करते. या निर्देशकांच्या उदाहरणांमध्ये, Meta AI साहाय्यकामध्ये निर्मित इमेज जनरेटरकडील कंटेन्टवर दिसून येणाऱ्या चमकदार वॉटरमार्कचा आणि अन्य जनरेटिव्ह AI वैशिष्ट्यांमध्ये साजेसे प्रॉडक्टमधील उपाय यांचा समावेश होतो.

Meta AI अनुभव Meta च्या प्‍लॅटफॉर्मवर US मधील प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत आणि त्यासाठी जनरेटिव्ह AI मॉडेलला ते काय तयार करू शकते आणि काय करू शकत नाही याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे लागू आहेत. सुरक्षित अनुभव प्रदान करण्यासाठी Meta कसे कार्य करते याबद्दल येथे अधिक जाणून घ्‍या.

तुमच्या किशोरवयीन मुलाशी जनरेटिव्ह AI बद्दल बोलणे

जनरेटिव्ह AI चा कंटेन्ट ओळखणे

एखादी गोष्ट जनरेटिव्ह AI चा वापर करून निर्माण केली आहे का हे नेहमी ओळखता येणे सोपे नाही. सोशल मीडियावरील इतर पोस्टप्रमाणेच युजरद्वारे कंटेन्ट तयार केला, पेस्ट केला किंवा अपलोड केला जातो आणि ते जनरेटिव्ह AI म्हणून लेबल करता येऊ शकत नाही. Meta च्या सेवांसह, काही जनरेटिव्ह AI सेवा, दृश्यमान मार्किंग जोडतील ज्यामुळे तुम्ही जनरेटिव्ह AI इमेज ओळखू शकता - परंतु असे नेहमीच होत नाही.

Meta युजरना कंटेन्ट अपलोड करण्याची अनुमती देते आणि युजरने जनरेटिव्ह AI द्वारे तयार झालेले परंतु तसे लेबल न केलेले काहीतरी अपलोड करणे शक्य आहे.

माहिती व्हेरिफाय करा

जनरेटिव्ह AI चुकीची माहिती जनरेट करण्याची शक्यता असते, ज्याला काही वेळा “भ्रम” असे म्हटले जाते. जनरेटिव्ह AI कडील माहितीवर विश्वास ठेवण्याआधी किंवा ती शेअर करण्याआधी, सन्मान्य सोर्सकडून ती व्हेरिफाय करणे आणि घोटाळेबाज व्यक्ती तुमच्या किशोरवयीन मुलाला फसवणे किंवा त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी जनरेटिव्ह AI चा वापर करू शकते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

जबाबदारीने वापर

तुमच्या किशोरवयीन मुलाला जनरेटिव्ह AI चा वापर करताना प्रामाणिक असण्याच्या व काळजी घेण्याच्या, त्यांच्या सोर्सचा संदर्भ देण्याच्या, शाळेच्या विशिष्‍ट नियमांचे पालन करण्याच्या जबाबदारीची आठवण करून द्या आणि जाणीव ठेवण्यास सांगा की त्यांच्या कामाच्या अचूकतेसाठी आणि प्रामाणिकपणासाठी ते जबाबदार आहेत. पालकांनी याची देखील चर्चा करावी की AI-जनरेटेड कंटेन्टचा वापर सकारात्मक उद्देशांसाठी करायला हवा, हानीकारक उद्देशांसाठी नव्हे.

गोपनीयता आणि सुरक्षितता

तुमच्या किशोरवयीन मुलाला कोणतेही जनरेटिव्ह AI वापरताना त्यांची गोपनीयता व सुरक्षितता यांचे रक्षण करण्याची आठवण करून द्या. जनरेटिव्ह AI प्रॉडक्ट तुम्ही प्रदान करत असलेल्या माहितीचा वापर त्याचे जनरेटिव्ह AI सुधारण्यासाठी करू शकते. महत्त्वाचे म्हणजे तुमचा सोशल सिक्युरिटी नंबर, क्रेडिट कार्ड नंबर यासारखी किंवा तुम्ही इतरांसोबत शेअर करू इच्छित नसलेली संवेदनशील माहिती प्रविष्ट करू नये. तुमच्या किशोरवयीन मुलांसोबत AI-जनरेटेड घोटाळ्यांमधील धोक्याविषयी चर्चा करा.

जनरेटिव्ह AI विषयी तुमच्यासाठी आणि तुमच्या किशोरवयीन मुलासाठी अधिक माहितीकरिता:

किशोरवयीन मुलांना सपोर्ट करण्यासाठी Meta संसाधने

किशोरवयीन मुलांचे AI मार्गदर्शक

संबंधित विषय

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला