हे संभाषण त्याची लांबी आणि स्पष्टतेसाठी संपादित करण्यात आले आहे.
NICOLE:
बालरोगतज्ञ आणि किशोर औषधतज्ञ, लेखिका, आई आणि आमच्या स्क्रीन स्मार्ट मालिकेच्या निर्मात्या डॉ. हिना तालिब या माझ्यासोबत सामील होत असल्याने मी खूप उत्साहित आहे. वैयक्तिकपणे, किशोरपूर्व मुलाची आई म्हणून, मी देखील डॉ. हिना तालिब यांच्यावर माझ्या मुलाशी अवघड संभाषणे कशी आणि कधी करायची यावरील टिपांसाठी खूप अवलंबून आहे. त्या पालकत्त्वावर व्यावहारिक आणि विचारपूर्वक मार्गदर्शन करतात. त्या Instagram वर @teenhealthdoc म्हणून आणि त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, परंतु स्वतःची ओळख करून देण्यासाठी मी सूत्र त्यांच्या हाती देत आहे.
DR. TALIB:
आणि Meta येथे तरुणांच्या सुरक्षेमध्ये तुमची महत्त्वाची भूमिका आहे हे मला माहीत असल्यामुळे मी तुमच्याशी तरुण आणि सोशल मीडिया याबद्दल बोलण्यासाठी उत्सुक आहे! होय, मी किशोर वैद्यकशास्त्रज्ञ असून एट्रिया, NYC मधीलएक प्राथमिक आणि प्रतिबंधात्मक देखभाल संस्था येथे काम करते. मी अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स यासाठी प्रवक्ता आहे आणि त्यांच्या कौन्सिल ऑन कम्युनिकेशन्स अँड मीडिया याचा भाग आहे. अनेक लोकांनी माझ्या बालरोगतज्ञ सबस्पेशालिटी, किशोरवयीन मुलांच्या औषधाबद्दल कधीही ऐकलेले नाही. किशोरवयीन मुलांची आणि त्यांच्या कुटुंबांची काळजी घेणे ही माझी आवड आहे आणि आजच्या किशोरवयीन मुलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला मदत करण्यात माझ्या स्पेशालिटीने मला मानसिक आरोग्य, स्त्रीरोग, त्वचारोगशास्त्र, स्पोर्ट्स औषधे आणि डिजिटल कल्याण यांसारख्या विभागांमध्ये अतिरिक्त प्रशिक्षण दिले.
NICOLE:
ज्या पालकाला त्याच्या किशोरवयीन मुलासोबत सोशल मीडिया किंवा स्क्रीनटाईमबद्दल संभाषण सुरू कसे करायचे याबाबतीत खात्री नाही त्यांना तुम्ही काय सांगाल? ते त्यांच्या कुटुंबांमध्ये मनमोकळ्या, सपोर्टिंव्ह संभाषणाला कसे प्रोत्साहित करू शकतात?
DR. TALIB:
खऱ्याखुऱ्या जिज्ञासेने आणि मनमोकळेपणाने केल्या जाणाऱ्या संभाषणाचा दृष्टीकोन मला सर्वाधिक यशस्वी झालेला आढळला आहे. अशी महत्त्वाची संभाषणे करण्याच्या या तीन टिपा आहेत. सर्वप्रथम, कुतूहल निर्माण करा आणि ते त्यांच्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करतात, ते कोणते अॅप्स किंवा प्लॅटफॉर्म वापरतात, त्यांचे फेव्हरेट फॉलो कोण आणि का आहेत आणि त्यांना कोणता गेम सर्वात जास्त खेळायला आवडतो हे त्यांना विचारा. तुम्ही त्यांची खाती एकत्रितपणे त्यांच्यासोबत पाहण्यात एकत्र वेळ घालवू शकलात आणि त्यांच्यासोबत त्यांचा आवडता गेम खेळू शकलात तर तो बोनसच ठरेल. दुसरे, त्यांना त्यांच्या विचाराने त्यांचे मत मांडू द्या. त्यांना विचारा की “तुम्ही तुमच्या सोशल मीडिया किंवा फोनच्या वापराने किती समाधानी आहात? ” हे मी माझ्या कामामध्ये जेव्हा किशोरवयीन मुलांना पाहते तेव्हा मी हेच करते. मी त्यांना विचारते की मीडिया वापरण्याच्या कोणता भागांमुळे त्यांना चांगले, कनेक्टेड आणि प्रोडक्टीव्ह वाटते आणि कोणत्या भागांमुळे त्या उलट वाटू शकते.
आणि तिसरे म्हणजे, त्यांच्या मित्रांबद्दल आणि त्यांचे मित्र सोशल मीडिया कसे वापरतात याबद्दल विचारून पहा. माहिती मिळवा! बरेचदा स्वतःपेक्षा मित्रांबद्दल बोलणे सोपे असू शकते आणि बोलता बोलता संवेदनशील व्हा आणि तुम्ही स्वतः देखील सोशल मीडियाचे चढ उतार कसे हाताळत आहात हे तुमच्या किशोरवयीन मुलासोबत शेअर करा. सोशल मीडियाबद्दल बोलण्याचे इतर मार्ग म्हणजे सोशल मीडियाबद्दल बोलणे सुरू न करणे. त्याऐवजी, त्यांचे मानसिक आरोग्य, शाळा, क्रीडा, झोप, डोकेदुखी किंवा त्यांच्या जीवनाचे इतर पैलू याबद्दल त्यांना विचारा आणि सोशल मीडिया त्यांना कशी मदत करू शकते किंवा आव्हाने देऊ शकते हे बोलण्यात गुंतवून ठेवा. अशाप्रकारची संभाषणे सुरू करण्यासाठी त्यांच्या कुटुंब केंद्रावर Meta कडे संसाधने आहेत.
NICOLE:
किशोरवयीन मुलावर Instagram चे तुम्ही पाहिलेले कोणते सकारात्मक परिणाम आहेत? पालकांसाठी असे काही मार्ग आहेत का जे त्यांच्या किशोरवयीन मुलांना चांगले वाटेल असा कंटेन्ट शोधण्यात मदत करतील?
DR. TALIB:
Instagram आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे कम्युनिटी शोधण्यात, मित्रांशी कनेक्ट होण्यात, नवीन कौशल्य शिकून घेण्यात, आणि स्वतःला व्यक्त करण्यासाठीचे सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहेत. अनेक किशोरवयीन मुले आणि विशेषतः अशी किशोरवयीन मुले ज्यांची कम्युनिटी ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित आहे ते माझ्याशी शेअर करतात की त्यांना ऑनलाईन "माझे लोक सापडले". LGBTQIA+ म्हणून ओळख असलेल्या किशोरवयीन मुलांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे सपोर्ट, शिक्षण आणि संसाधने कशी मिळाली हे शेअर केले आहे. विशेषतः मागील काही वर्षात, किशोरवयीन मुले ते फॉलो करत असलेल्या प्लॅटफॉर्म आणि लोकांकडून किंवा संस्थांद्वारे ऑनलाईन शिकलेल्या मानसिक आरोग्य टूल किंवा कोपिंग कौशल्यांबद्दल अगदी काही आरोग्य टिपांबद्दल देखील बोलतात! शेवटी, भावना व्यक्त करताना समर्थन मिळवण्याचा भाग म्हणून किशोरवयीन मुले देखील सोशल मिडियाला कल्पना शेअर करण्यासाठी असलेले ठिकाण या रूपात सूचित करतात आणि त्यांना योग्य वाटेल तसे त्यांच्या जगात बदल घडवण्याची त्यांची आशा मला आवडते.
पालकांसाठी, त्यांच्या किशोरवयीन मुलांना सकारात्मक अनुभव मिळण्यात, अर्थातच तिथे सर्व सकारात्मक अनुभव नसल्यामुळे त्यांना त्यांच्या किशोरवयीन मुलांना मदत करण्यासाठी प्लॅटफॉर्म ऑफर करतात अशा टूलबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, पालक किशोरवयीन मुलांना त्यांच्या कंटेन्ट शिफारसी सेटिंग्ज, वेळ व्यवस्थापन सेटिंग्ज आणि त्यांच्यासाठी योग्य असल्यास पालक सुपरव्हिजन सेट करण्यासह मदत करू शकतात.
NICOLE:
अनेक पालक सकारात्मक ऑनलाईन सवयींबद्दल संभाषण सुरू करण्यासाठी त्यांच्या किशोरवयीन मुलाच्या तेराव्या वाढदिवसापर्यंत प्रतीक्षा करणार नाहीत. तुम्ही अशा पालकांना काय सल्ला द्याल जे त्यांच्या मुलांना सोशल मीडियावर येण्यापूर्वी त्यात सामील होण्यासाठी त्यांची तयारी करत आहेत?
DR. TALIB:
माझ्या अनुभवावरून, असं कोणतंही ठराविक वय नाही जेथे मी स्वतःहून किशोरवयीन मुलाला सोशल मीडियावर सामील होण्यासाठी सुचवेन, पण अर्थातच सर्व प्लॅटफॉर्मच्या किमान वयाच्या सेवा अटी आहेत ज्या महत्त्वाच्या संरक्षक पायऱ्या आहेत. त्याप्रमाणेच, सोशल मीडिया अखंड गोष्ट नाही, ती एकच गोष्ट नाही आणि ती फक्त Instagram, Facebook आणि TikTok पुरतीच नाही. मी माझ्या समोरील किशोरवयीन मुलाकडे एक व्यक्ती म्हणून पाहते कारण प्रत्येक व्यक्तीसाठी अनेक घटकांचे युनिक महत्त्व असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा मला सोशल मीडिया वापरण्याच्या सुरुवातीच्या वयाबद्दल कुटुंबाचे समुपदेशन करण्यास सांगितले जाते तेव्हा मी पालकांना त्यांच्या किशोरवयीन मुलांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याकडील आवश्यक वेळ आणि उपलब्धता विचारात घेण्यास सांगते.
लहान मुलांच्या पालकांना जेव्हा मी डायरेक्ट मेसेजिंग किंवा iMessage, हे देखील सोशल मीडियाप्रमाणेच विचारात घेतले जावेत असे सांगते तेव्हा त्यांना बरेचदा आश्चर्य वाटतं. Youtube Kids आणि iPad किंवा टॅबलेट गेम जसे की Minecraft आणि Roblox हे देखील सोशल मीडियाच आहेत. त्यामुळे ही संभाषणे प्राथमिक शाळेतील मुलांच्या पालकांमध्ये सुरू होणे गरजेचे आहे आणि मी देखील आता सध्या तेच अनुभवत आहे कारण मला देखील लोअर स्कूलमध्ये जाणारी दोन मुले आहेत. आपण लवकरात लवकर ही संभाषणे सुरू करणे देखील महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्या मुलांना जेव्हा सपोर्टची गरज असेल तेव्हा त्यांना आपल्या जवळ येणे अधिक सोयीचे वाटेल. शेवटी, ही संभाषणे आपल्या कुटंबात होणे, तसेच तुमच्या वर्गातील किंवा इयत्तेतील मुलांच्या पालकांसोबत आणि शिक्षकांसोबत होणे देखील गरजेचे आहे. मुलं राहत असलेल्या संपूर्ण कम्युनिटीमध्ये अशी संभाषणे व्हायला हवीत. हा एक भाग आहे जिथे पालकांचा शेअर विशेष करून कठीण असतो कारण डिव्हाईस आणि सोशल मीडियाचा विचार केला जातो तेव्हा कुटुंबाची त्यासाठीची मूल्य वेगळी असतात.
NICOLE:
मी पूर्णपणे सहमत आहे, आणि मला अणखी सांगावसं वाटतं की आमच्या कुटुंब केंद्रामध्ये देखील अशा प्रकारच्या विषयांबद्दल तुमच्या किशोरवयीन मुलांशी कसे बोलायचे याबद्दल शिक्षण संसाधने आहेत, उदाहरणार्थ, ParentZone मध्ये एक स्वयं-जागरूकता आणि मानसिक नियमनावरील एक उत्तम लेख आहे. स्वतः किशोरवयीन मुलांना सोशल मीडियाशी सकारात्मकरित्या कसे एंगेज व्हायचे याबद्दल सांगताना तुम्ही कोणत्या विशिष्ट मूलतत्त्वांबद्दल विचार करता? आणि/किंवा, त्याबद्दल त्यांच्या पालकांशी बोलताना त्यांनी काय विचार केला पाहिजे?
DR. TALIB:
ही माझ्यासाठी महत्त्वाची असलेली मूलतत्त्वे आहेत. पहिले, तुमचे उद्दिष्ट सेट करून पहा किंवा तुम्ही तुमचा फोन का घेत आहात हे मोठ्याने म्हणून पहा. तुम्हाला कदाचित 10 मिनिटांसाठी लक्ष विचलित करायचे असू शकते, कदाचित तुम्हाला 3 मित्रांना मेसेजे करायचा असू शकतो आणि तुम्हाला बिस्कीटच्या पाककृतीबद्द्ल अधिक जाणून घ्यायचे असू शकते. फक्त हे मोठ्याने म्हणण्यात सामर्थ्य आहे आणि हे तुम्ही तुमचा फोन खाली ठेवून दिल्यानंतर त्यावर विचार देखील करू शकता.
दुसरे, तुमच्या भावनांना फॉलो करा. सोशल मीडियावर वेळ घालवणे तुम्हाला कसे वाटते किंवा तुम्ही इंटरॅक्ट करत असलेले लोक तुम्हाला कसे वाटतात याकडे लक्ष द्या. तुम्हाला उत्साही, प्रेरित किंवा प्रोत्साहित किंवा थकल्यासारखे, एकटेपणा किंवा दुखावलेले वाटत आहे का याकडे नीट लक्ष द्या.
आणि तिसरे, कृती करा, बोला आणि जसे तुम्ही वास्तविक जीवनात शेअर कराल तसे ऑनलाईन शेअर करा. जर तुम्ही ते तुमच्या आजी-आजोबांना बोलू शकत नसाल किंवा ते बातमीमध्ये यावे असे वाटत नसेल, तर ते ऑनलाईन बोलू नका. याचे कारण म्हणजे तुम्हाला ते कुठे जाते, कोण पाहते आणि त्याचा कोणता संदर्भ घेतला जातो हे कधीही कळणार नाही. वास्तविक जीवनात आणि ऑनलाईन दोन्हींमध्ये स्वतःशी आणि इतरांशी नम्र रहा.
NICOLE:
ऑनलाईन घडलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या पेशंटसोबत तुमची कधी अवघड संभाषणे झाली आहेत? ती कशी होती?
DR. TALIB:
भावनिक किंवा नॅव्हिगेट करण्यासाठी आव्हानात्मक असलेले काही ऑनलाईन घडले असल्यास त्याबद्दलची संभाषणे खरोखरंच सवयींमध्ये बदल करण्यासाठी प्रेरित करणारी किंवा त्यांना त्यांच्या ऑनलाईन वापराच्या सीमा सेट करण्यासाठी परवानगी देण्यासाठी सर्वोत्तम टूल आहेत. तरुण मुलांसोबतच्या माझ्या संभाषणांमध्ये हे कसे करायचे यावरील सर्वोत्तम कल्पना त्यांच्याकडूनच आल्या आहेत. ते स्वतःला खूप चांगले ओळखतात आणि चुका दुरूस्त करण्यासाठी किंवा जीवनाचे किंवा आरोग्याचे उद्दिष्ट अधिक संरेखित करण्यासाठी त्यांच्या वापराची पद्धत बदलण्यासाठी क्रिएटिव्ह मार्ग शोधतात.
किशोरवयीन मुलांसाठी त्यांच्यापेक्षा त्यांचे समवयस्क ऑनलाईन कशाचा सामना करत आहेत याबद्दल बोलणे दखील खूप सोपे आहे. तिथून सुरुवात करा आणि माहिती मिळवा. हे भारावून टाकणारे आहे, कधीकधी ह्रदयद्रावक आणि त्यांना याबद्दल त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्साठी जागा हवी.
NICOLE:
आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांपैकी एक शेवटचा प्रश्न, “एक प्रौढ म्हणून सोशल मीडिया माझ्यासाठी तुलना करण्याचे कारण आहे, सोशल मीडियावर होणाऱ्या तुलनेसंबंधित मला माझ्या मुलांना कशी मदत करता येईल?” डॉ. तालिब, यावर तुमचं काही म्हणणं आहे?
DR. TALIB:
तुलना करण्याने आनंद हिरावून घेतला जातो, Theodore Roosevelt म्हणाले असे मला वाटते. सामाजिक तुलनेमुळे आत्मसन्मानावर परिणाम होऊ शकतो आणि किशोरवयीन मुले विकासात्मक दृष्टीकोनातून जीवनाच्या अशा नाजूक टप्प्यावर असतात जिथे त्यांच्यावर केलेल्या कमेंट ते खूप मनाला लावून घेतात आणि इतर टप्प्यांपेक्षा यामध्ये स्वतःला केंद्रस्थानी ठेवतात. तर आपण त्यांना कशी मदत करू शकतो, आपण वास्तविक जीवनात तसेच ऑनलाईन त्यांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी जे काही करणं शक्य आहे ते केलं पाहिजे आणि जे त्यांना आनंद देत नाहीत, ते सन्माननीय आणि महत्त्वाचे असल्याची जाणीव करून देत नाहीत अशा लोकांपासून सावध राहण्यास शिकवले पाहिजे. खरंच, शेवटी तुम्ही महत्त्वाचे आहात ही भावना सत्य ठरते. आपण महत्त्वाचे आहोत ही जाणीव निर्माण होणे हाच सामाजिक तुलनेवरील प्रभावशाली तोड आहे. मी अलिकडेच नेव्हर इनफ या पुस्तकाच्या लेखिका, Jennifer Wallace यांना याबद्दल बोलताना ऐकलं आहे आणि ते खूपच प्रभावशाली होतं. लहान किंवा मोठ्या प्रकारे, आपल्या सर्वांना आपल्या किशोरवयीन मुलांना आणि आपण इंटरॅक्ट होतो त्या सर्व किशोरवयीन मुलांना ते महत्त्वाचे असल्याचे, सन्माननीय असल्याचे, त्यांच्यामध्ये कौशल्य असल्याचे आणि ते या जगात स्वतःचे अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात ही जाणीव करून देण्याची गरज आहे.
मी किशोरवयीन मुलांना सांगते की अशा कंटेन्टशी इंटरॅक्ट करा जो तुम्हाला सकारात्मक वाटेल. डी-फ्रेंड डिसेंबर ही एक खरी गोष्ट आहे, आणि जे लोक तुम्हाला चांगले वागवत नाहीत त्यांना अनफॉलो करणे चांगले आहे. त्याचप्रमाणे, मी बरेचदा किशोरवयीन मुलांना ते यापुढे लोकांकडे लक्ष देणार नाहीत हे त्यांना कळू द्यायचे नसल्यास लाईक बंद करण्याचे, त्यांना प्रतिबंधित करण्याचे सुचवत असते. पुन्हा एकदा सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या किशोरवयीन मुलांसोबत या सगळ्याबद्दल नियमितपणे विचारणा करा.
NICOLE:
तर आपण खूप गोष्टी कव्हर केल्या, पण आजच्या संभाषणातून पालकांनी काय घेतले पाहिजे?
DR. TALIB:
प्रत्येकाला सोशल मीडिया वेगवेगळा भासतो, किशोरवयीन मुलांच्या भिन्न वयोगटातील आणि परिपक्वतेच्या टप्प्यांवरील गरजा दखील भिन्न असतात. आपल्याला आपल्या किशोरवयीन मुलांच्या ऑनलाईन आयुष्यात मार्गदर्शन करण्यात सर्वोत्तम मदत करण्याकरिता त्यांच्याकडे लक्ष देण्याची आणि त्यांचे ऐकण्याची गरज आहे. सोशल मीडियावर तुमच्या किशोरवयीन मुलांना योग्य तो अनुभव कसा येऊ शकतो आणि ते कसे फसले जाऊ शकतात याबद्दलची संभाषणे त्यांच्याशी करा. संवेदनशील व्हा आणि सोशल मीडियाशी तुमचे असलेले नाते तुमच्या किशोरवयीन मुलांसाठी देखील एक आदर्श आहे हे समजून घ्या... या विषयाशी कनेक्ट होताना हे पुढे खूप उपयुक्त ठरू शकतं. Instagram सारख्या अनेक ॲपमध्ये मदत करण्यासाठी पालक टूल आणि डीफॉल्ट सेटिंग्ज असतात, पण तुमच्या किशोरवयीन मुलाशी संभाषण करणे हा सोशल मीडियावर सकारात्मक अनुभव मिळण्यात मदत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
NICOLE:
खूप धन्यवाद, डॉ. तालिब. आम्हाला माहीत आहे की तंत्रज्ञान सातत्याने बदलत असल्यामुळे या विषयावर अधिक सखोल विचार केला जाऊ शकतो आणि आम्हाला पालकांना सपोर्ट करणे चालू ठेवायचे आहे कारण कुटुंब एकमेकांशी जुळवून घेण्याचे आणि सपोर्ट करण्याचे सर्वोत्तम मार्ग शोधतात.
DR. TALIB:
किशोरवयीन मुलांची मदत करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी आणि सातत्याने सुधारणा करणे आणि संसाधने शेअर करण्यासाठीच्या तुमच्या कार्यासाठी Nicole आणि तुमच्या कार्यासंघाचे आभार.
या संभाषणामध्ये उल्लेख केलेल्या Meta आणि Instagram टूल आणि संसाधने आणि बऱ्याच गोष्टींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील संसाधने पहा.