आत्महत्या हा अवघड विषय आहे, परंतु आपल्याला त्याबद्दल बोलावे लागेल. प्रौढांप्रमाणेच, किशोरवयीन मुले या भयानक घटनेला बळी पडू शकतात. आत्महत्या-संबंधित विचार, भावना किंवा वर्तणुकींची लक्षणे समजून घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा किशोरवयीन मुलाच्या आयुष्यात पालक, मार्गदर्शक, शिक्षक आणि इतर विश्वासू लोक महत्त्वाची भूमिका बजावतात.
किशोरवयीन मुलांशी आत्महत्येबाबत बोलताना उपयुक्त भाषा
तुमच्या किशोरवयीन मुलाशी या समस्येबद्दल बोलणे सोपे नाही, परंतु तुम्ही जेव्हा त्याबद्दल संभाषण करता तेव्हा (किंवा ते विषय काढतात तेव्हा), त्यास टाळू नका.
नेहमी उपयुक्त अशा पद्धतीने समस्यांची मांडणी करा. तुम्ही भाषा आणि संदर्भ कसे वापरता तिकडे बारकाईने लक्ष द्या. तुम्ही जे शब्द निवडता त्यांचा सखोल प्रभाव संभाषणावर पडू शकतो. तुमच्या संभाषणात आशा, पूर्ववत होणे आणि मदत मागणे याबद्दलच्या स्टोरीज आधी सांगा. त्यांना जिथे त्यांच्या भावना शेअर करणे सोयीस्कर वाटते अशी एक जागा तयार करा. त्यांना कळू द्या, की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता आणि त्यांना नेहमीच मदत मिळेल.
खाली गाईडमधील उपयुक्त भाषेची काही उदाहरणे Orygen या आमच्या भागीदाराने एकत्रितपणे दिली आहेत – ही एक अशी संस्था आहे जिने तरुणांसाठी मानसिक आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित केले आहे. आत्महत्येबद्दल बोलताना हे मुद्दे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे:
उलटपक्षी, अशाही काही पद्धती आहेत ज्याद्वारे आत्महत्येबद्दल बोलता येते, पण त्या संभाषण योग्य दिशेने नेत नाहीत.
तुमचे किशोरवीन मूल “मला अदृश्य व्हायचे आहे,” किंवा “मला हे संपवायचे आहे” असे म्हणत असल्यास ते एक चेतावणीचे चिन्ह आहे. ते असे दर्शवू करू शकतात की त्यांना निराशाजनक आणि असहाय्य वाटत आहे किंवा त्यांचे इतरांवर ओझे असल्याचे सूचित करू शकतात. ते सहसा जी कामे करतात त्यात त्यांना अजिबात स्वारस्य वाटत नाही किंवा भावनेच्या आहारी जाऊन ते एखादी गोष्ट करू शकतात.
Orygen ने हायलाईट केल्याप्रमाणे, एखादी तरुण व्यक्ती आत्मघाती होऊ शकण्याची अन्य लक्षणे यामध्ये हे समाविष्ट असू शकते:
अशा वर्तनाकडे लक्ष ठेवताना, आत्महत्येबाबत विचार करणार्या किशोरवयीन मुलांना मदत करण्यासाठी पालक आणि इतरजण या कृती करू शकतात.
तुमच्या किशोरवयीन मुलामध्ये ही चेतावणीची लक्षणे दिसल्यास किंवा तुमच्याशी बोलायचे आहे असे ते म्हणत असल्यास, सुरुवात कशी करावी याबद्दल तुम्हाला प्रश्न पडत असल्यास येथे काही पद्धती आहेत ज्यांद्वारे तुम्ही त्यांना मदत करू शकता. ही लिस्ट यांच्या कामाच्या आधारावर बनवलेली आहे Forefront: आत्महत्या प्रतिबंधाबाबत नावीन्यता.
आत्महत्या प्रतिबंध
नॅशनल सुसाईड प्रिव्हेन्शन लाईफलाईन 1-800-273-8255
क्रायसिस टेक्स्ट लाईन 741-741
ऑनलाईन “आत्महत्येची आव्हाने” किंवा “गेम” यामध्ये सहसा धोकादायक टास्कची एक मालिका समाविष्ट असते जी लोकांना एका ठराविक कालावधीत करण्यास सांगितली जाते, यात अनेकदा टास्कची तीव्रता वाढत जाते. या आव्हानांवर चर्चा करणारा कंटेन्ट Meta च्या धोरणांच्या विरोधात आहेत. Meta हा कंटेन्ट काढते आणि काही बाबतीत, आम्ही ती खातीदेखील काढू शकतो ज्यांनी तो पोस्ट केला आहे.
तुम्हाला तुमचे किशोरवयीन मूल या प्रकारचा कंटेन्ट शेअर करताना दिसल्यास (किंवा त्यांनी तुम्हाला सांगितले की त्यांचे वर्गमित्र तो शेअर करत आहेत), पुढे काय करावे यासंबंधात या काही सूचना आहेत:
Meta तंत्रज्ञानावर कल्याण आणि ऑनलाईन सुरक्षा यासंबंधात अतिरिक्त ऑनलाईन संसाधनांसाठी आमचे आत्महत्या प्रतिबंध केंद्र किंवा आमचे सुरक्षा केंद्र यावर जा.
आमच्या तंत्रज्ञानाचा वापर करणार्या लोकांना अधिक चांगल्या प्रकारे सपोर्ट करण्यासाठी, Meta या तज्ञ संस्थांसोबत भागीदारी करते:
युनायटेड स्टेट्स
नॅशनल सुसाईड प्रिव्हेन्शन लाईफलाईन 1-800-273-8255
क्रायसिस टेक्स्ट लाईन 741-741