लैंगिक पिळवणूक थांबवा: पालकांसाठी टिपा | Thorn कडील एक गाईड

Thorn

यांनी विकसित केले Thorn आणि Facebook द्वारे रुपांतरित केलेले, ही लैंगिक पिळवणूक थांबवा संसाधने लैंगिक पिळवणुकीशी संबंधित सहाय्य आणि माहिती शोधणाऱ्या प्रत्येकासाठी आहेत.

तुमची किशोरवयीन मुले तुमच्या पाठिंब्यामुळे आणि जीवनातील आव्हानांबाबत तुम्ही करता त्या मार्गदर्शनामुळे अधिक सुरक्षित असतात, यात ते ऑनलाईन असतात त्याचा समावेश होतो. लैंगिक पिळवणुकीसारख्‍या फसवणूक होणार्‍या (आणि काहीवेळा धोकादायक) परिस्थितींमध्‍ये तुमच्या किशोरवयीन मुलाने स्वत:स गुंतवून घेणे टाळण्‍यासाठी त्याला मदत करण्‍याकरिता या काही गोष्टी तुम्ही करू शकता.

हे अवघड आहे परंतु हे गाईड वाचून तुम्ही आधीपासून योग्य कृती करत आहात. तुमच्यासाठी असलेल्या पुढील स्टेप: याबद्दल तुमच्या मुला(लां)शी आणि नंतर तुमच्या मित्रांशी बोला.

तुमच्या किशोरवयीन मुलांशी ऑनलाईन सुरक्षेबद्दल बोला.

सेक्सटिंग बद्दल बोलणे हा सोपा आरंभ असून, तरूण मुले ही भाषा समजू शकतात. सेक्सटिंग म्हणजे लैंगिकदृष्‍ट्या सुस्पष्ट मेसेज किंवा नग्न किंवा अंशत: नग्न प्रतिमा सहसा ऑनलाईन शेअर करणे किंवा प्राप्त करणे होय. सुरुवात करण्‍यात मदतीसाठी हा काही मजकूर वापरता येईल:

  • तुम्हाला कधीही कोणीही अत्यंत जवळिकीचे चित्र किंवा सेक्स्ट पाठविले आहे का? (तुम्हाला संकोच वाटत नसल्यास तुम्ही केवळ सेक्स्ट असेही म्हणू शकता.)
  • तुम्हाला कोणीही अंतरंग चित्र किंवा सेक्स्ट पाठविण्‍यास कधीही सांगितले आहे किंवा सक्ती केली आहे का? (जी व्यक्ती अंतरंग प्रतिमा पाठविण्‍यासाठी त्यांना सक्ती करीत असेल ती व्यक्ती विश्‍वासार्ह नसते हे समजावून सांगा.)
  • इतरांच्या जवळीक साधणाऱ्या किंवा लाजिरवाण्या प्रतिमा फॉरवर्ड करणे योग्य आहे असे तुम्हाला वाटते का? का? (या प्रतिमा फॉरवर्ड न करण्याचे जे महत्त्व आहे त्यावर भर द्या. प्रतिमेत जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी खरोखर ते दु:खदायक असू शकते आणि फॉरवर्ड केल्याने तुमच्या मुलासाठी समस्या निर्माण होऊ शकते. तसेच, एखाद्याचे शरीर कोणी पहावे ते ठरवण्‍याचा अधिकार कोणालाही नाही.)

कोणतीही अट न ठेवता त्यांच्यासोबत रहा.

लैंगिक पिळवणूक होणार्‍या तरूण मुलांना अडचणीत सापडण्‍याची भीती वाटू शकते. त्यांच्या पालकांसाठी लाजिरवाणे असेल किंवा त्यांना शाळेमधून निलंबित केले जाईल, मित्र त्यांच्याबद्दल वाईट मत बनवतील किंवा पोलिसांची समस्या येईल अशी चिंता त्यांना वाटू शकते. गैरवर्तन करणारी व्यक्ती त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी अशा प्रकारच्या भीती दाखवू शकते आणि दु:खाची गोष्ट म्हणजे, हे घडते. ही भीती तरुणांना गप्प ठेवते आणि त्यामुळे वाईट परिणाम होतात.

तुमची भीती आणि नैराश्य ही सामान्य बाब आहे परंतु अशा कठीण प्रसंगी तुम्ही नेहमी एकत्र असाल हे तुमच्या मुलांना कळणे गरजेचे आहे. तुम्ही त्यांना सहाय्य कराल हे त्यांना माहीत आहे असा तुम्ही विचार करत असला तरीदेखील, अशी संभाषणे केल्याने एखाद्या कारणाने मन:स्थिती ठीक नसल्यास किंवा काही चुकीचे घडते तेव्हा तुमच्यासोबत त्यांचे अनुभव शेअर केल्याने पुष्कळ फरक पडू शकतो.

शिकणे सुरू ठेवा.

पालक असणे हे एक अवघड काम असू शकते. आजच्या तंत्रज्ञानात जलद गतीने होणार्‍या बदलांशी जुळवून घेऊन अद्ययावत राहणे अवघड आहे. नवीन अॅप डाऊनलोड करा आणि ते वापरून पहा. तुमच्या किशोरवयीन मुलाचे आवडते अॅप कोणते आहेत ते त्यांना विचारा. तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलासोबत याबद्दल जितके अधिक बोलाल, तितके एखादी वाईट गोष्ट घडल्यास ती जाणून घेणे सोपे होईल आणि सोयीस्कर न वाटणार्‍या परिस्थितीविषयी तुमच्यासोबत शेअर करणे त्यांच्यासाठी अधिक सोपे होईल.

पालक आणि कुटुंबांसाठी असलेली आमची संसाधने तुम्ही एक्सप्लोर करावी यासाठी तुम्हाला आम्ही प्रेरित करतो. तुमचे Facebook खाते असो किंवा Instagram खाते– किंवा तुमच्या किशोरवयीन मुलाचे खाते असो – तुमच्या अनुभवातून अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी आणि तुमच्या किशोरवयीन मुलाला नॅव्हिगेट करताना मदत करण्याकरिता आम्ही काही सहज सोप्या लिंक, टिपा आणि युक्त्या घेऊन आलो आहोत.

प्रचार करा.

एकमेकांना शिक्षित करून, आपण आमच्या तरूणांचे चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकतो. Thorn यांचा "लैंगिक पिळवणूक थांबवा" व्हिडिओ तुमच्या किाोरवयीन मुलांसोबत आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. लैंगिक छळ होण्‍याचे काही प्रकार जितक्या अधिक लोकांना माहित होतात, तितके ते या परिस्थितींना हाताळण्‍यास सक्षम होतील.

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला