सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याबद्दल LGBTQ+ किशोरवयीन मुलांशी बोलणे | LGBT टेक

LGBT टेक

किशोरवयीन मुलांशी त्यांचे टेक्स्ट करणे, सोशल मीडिया आणि सेल फोन वापर याबद्दल संवाद साधणे या वयोगटाची जबाबदारी असणाऱ्या बहुतांश प्रौढांसाठी आव्‍हानात्मक असते. बहुतांश सोशल मीडिया ॲप वापरासाठी युजर किमान 13 वर्षांचे असणे आवश्यक असले तरीही, तरुण लोक खात्यासाठी साइन अप करण्याकरिता त्यांच्या वयाबाबत खोटी माहिती देऊ शकतात. यू.एस. मध्ये स्वतःचा सेल फोन मिळण्याचे सरासरी वय 10 वर्षे आहेआणि 95% किशोरवयीन मुलामुलींकडे स्मार्टफोनचा ॲक्सेस असतो. त्यामुळे, विश्वसनीय प्रौढांनी त्यांच्या किशोरवयीन मुलांशी स्मार्टफोन व सोशल मीडियाच्या योग्य वापराबद्दल खुले संभाषण साधणे आवश्यक आहे.

किशोरवयीन मुलांच्या आयुष्यातील तुमची भूमिका कोणतीही असो, तुम्हाला माहीत आहे की त्यांना त्यांच्या आयुष्यात अधिक स्वातंत्र्य, जबाबदारी आणि गोपनीयता हवी असते आणि फोन व सोशल मीडियाची यामध्ये खूप मोठा भूमिका असू शकते. LGBTQ+ तरुणांसाठी, ते त्यांची लैंगिकता, कम्युनिटी रचना, आरोग्य माहिती आणि सामान्य सुरक्षा काळज्या जाणून घेत असताना, अनेक परिस्थितींमध्ये त्यांचा सेल फोन म्हणजे त्यांची जीवनरेखा असू शकतो. तथापि, याचे व त्यांच्या ऑनलाईन सुरक्षेशी संतुलन राखणे महत्त्वपूर्ण आहे. खालील सूचना सर्वच किशोरवयीन मुलांसाठी महत्त्वाच्या आहेत, परंतु LGBTQ+ तरुणांसाठी, ज्यांना सुरक्षा व सुरक्षिततेबाबत अधिक धोका असतो, अशी संभाषणे करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तसेच, काही वेळा कठीण होणारी संभाषणे कशी हाताळावीत याबद्दलच्या देखील सूचना यात आहेत.

सूचना #1 – शून्य-सहनशीलता धोरण काही वेळा किमान यशस्वी होऊ शकते.

किशोरवयीन मूल कदाचित डिजीटल किंवा सोशल मीडिया खाते असण्यासाठी सज्ञान किंवा जबाबदार असणार नाही असा इशारा करण्याऐवजी व ते बंद करण्यास सांगण्याऐवजी, काही चर्चा प्रारंभ करणारे विषय वापरून पहा जसे की Netsmartz.org येथे सुचवलेले. यापैकी काही आहेत:

  • तुमची फेव्हरेट वेबसाईट किंवा ॲप कोणते आहे?
  • तुम्हाला तेथे काय करायला आवडते?
  • तुम्ही कधी ऑनलाईन अशा गोष्टी पाहिल्या आहेत का ज्या तुम्हाला पाहायच्या नव्हत्या?

तुम्ही LGBTQ+ तरुणांना अन्य किशोरवयीन मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी व व्यावसायिक सपोर्ट मिळवण्यासाठी सुरक्षित संसाधनांची एक लिस्ट देखील देऊ शकता.

सरासरी LGBTQ+ तरुण त्यांच्या भिन्नलिंगी समवयस्कांपेक्षा 45 मिनिटे अधिक घालवतात हे जाणून घेतल्यावर, किशोरवयीन मुले कोणाशी बोलत आहेत हे जाणून घेणे आणि त्यांनी कधीही अनुचित मजकूर, फोटो किंवा माहिती शेअर केली आहे का किंवा शेअर करण्यास कोणी सांगितले आहे का हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या किशोरवयीन मुलाशी, गोपनीयता बाळगण्याचा आणि जबाबदारीचा एक भाग ऑनलाईन वर्तनात काय ठीक आहे आणि काय ठीक नाही याची जाणीव असल्याचे सिद्ध करायला हवे याची चर्चा करा.

पालक आणि संरक्षक यांना पूर्णपणे नियंत्रण ठेवून किंवा फोन/इंटरनेट सोयी काढून घेऊन त्यांच्या किशोरवयीन मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेबाबतच्या समस्या व्यवस्थापित करण्याचा मोह होऊ शकतो. स्वाभाविकपणे, तरुणांकडून याचा विरोध केला जाण्याची शक्यता असते. या मर्यादा काही वेळा प्रभावी ठरत असल्या तरीही, त्यांचा वापर ऑनलाईन सुरक्षेसंबंधी खुली चर्चा आणि संवाद यांच्यासह एकत्रितपणे केला जायला हवा, अन्यथा याचा उलट परिणाम होऊ शकतो. पालक नियंत्रण किंवा पालक मर्यादा यावर किशोरवयीन मुलांनी शोधून काढलेला एक उपाय म्हणजे मिळवण्यास सोपा स्वस्तातील “बर्नर” किंवा “ट्रॅप फोन्स” यांचा वापर करणे. तंत्रज्ञान किंवा डिजीटल अनुभव काढून घेणे उपयोगाचे ठरत नाही; पालक त्याऐवजी त्यांच्या किशोरवयीन मुलांना स्वतःचे ऑनलाईन संरक्षण कसे करावे याबद्दल शिक्षण देण्याचे मार्ग शोधू शकतात.

सूचना #2 – तुमच्या किशोरवयीन मुलांना त्यांच्या डिजीटल फूटप्रिंटचे रक्षण करण्यात मदत करा.

तुमच्या किशोरवयीन मुलाशी ऑनलाईन काय शेअर करावे आणि काय करू नये याबद्दल बोलणे महत्त्वाचे आहे, विशेषतः सेक्सटिंगच्या संबंधाने. किशोरवयीन मूल इतर किशोरवयीन मुलांशी अनुचित नातेसंबंधात गुंतून पडू शकते व त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक इमेज किंवा माहिती मिळवणाऱ्या शिकाऱ्यांचे बळी देखील होऊ शकतात. बळी पडलेल्या किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्यात काळजी घेणाऱ्या प्रौढ व्यक्तींच्या व तसेच मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या सपोर्टची गरज भासू शकते. “किशोरवयीन मुलांशी सेक्सटिंगबद्दल बोलणे” यामध्ये तरुणांशी हे संभाषण कसे करावे याबद्दल माहिती आहे आणि Netsmartz कुटुंबांना मदत करू शकणारी संसाधने ऑफर करते.

सूचना #3 – तुमच्या किशोरवयीन मुलाशी ते ऑनलाईन शेअर करत असलेली ओळख, लोकेशन आणि इतर वैयक्तिक माहिती याबद्दल बोला.

किशोरवयीन मुलांनी त्यांच्या गोपनीयता सेटिंग्ज आणि गेमिंग ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज होताना ऑनलाईन सहकारी किंवा प्रतिस्पर्ध्यांशी कोणती माहिती शेअर करत आहेत याबद्दल सजग राहिले पाहिजे. महामारीच्या काळात ऑनलाईन प्रलोभनांमध्ये 100% वाढ झाली होती. तरुणांशी गेमिंग, सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममार्फत संपर्क साधला जातो तेव्हा असे होते. तरुणांना भूमिका वठवण्यास सांगून, संभाषण किंवा नातेसंबंध निर्माण करणे याद्वारे “तयार केले” जाऊ शकते किंवा स्पष्ट फोटो/इमेज पाठवण्यास प्रोत्साहन दिले जाते, जे ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा विक्री/व्यापार यासाठी वापरले जाऊ शकते. LGBTQ+ तरुणांना याव्यतिरिक्त आणखी धोका आहे, कारण ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी त्यांची लैंगिक अभिमुखता शेअर करण्यास तयार नसल्यामुळे अनेकदा विविध संसाधनांकडून माहिती किंवा सपोर्ट घेत असतात. या परिस्थितीत HRC.org चे Being an LGBTQ+ Ally यांसारख्या संसाधनांची LGBTQ+ तरुणांना सपोर्ट करण्याची इच्छा असणाऱ्यांना मदत होऊ शकते.

सूचना #4 – तुमच्या किशोरवयीन मुलांशी हे शेअर करा, की ऑनलाईन “छेडछाड” याचे रूपांतर फक्त एका क्लिकमध्ये सायबर दादागिरीमध्ये होऊ शकते.

तुमचे किशोरवयीन मूल दादागिरीला बळी पडत असो किंवा अन्य कोणावर दादागिरी करत असो, ऑनलाईन शेअर केलेली कोणतीही बाब खरे तर नष्ट होत नाही. LGBTQ विदयार्थ्यांपैकी 48.7% विद्यार्थ्यांना एका वर्षात सायबर दादागिरीचा अनुभव येत असतो. अगदी एखाद्याला दुखावण्याच्या हेतूने असलेली एखादी ऑनलाईन गोष्ट शेअर करणे किंवा “लाईक करणे” देखील दादागिरीला प्रमोट करते. Stopbullying.gov येथे सायबर दादागिरीची व्याख्या आणि त्याबद्दल तक्रार कशी करावी याची माहिती दिलेली आहे. तुम्हाला येथे दिलेल्या परिस्थितींमध्ये तुमच्या किशोरवयीन मुलास सपोर्ट करण्याचे मार्ग येथे सापडतील.

सूचना #5 – तुमचे किशोरवयीन मूल त्यांचे मित्र कोण आहेत हे जाणून आहे याची खात्री करा.

किशोरवयीन मुलाच्या सोशल मीडिया पेजवर नवीन मित्रांची व फॉलोअरची पुष्टी करणे आणि ते मिळवणे थरारक असू शकते. मित्राच्या मित्राकडील फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे निर्धोक असू शकते आणि यामुळे नवीन आणि सकारात्मक नातेसंबंध निर्माण होऊ शकतात, परंतु किशोरवयीन मुलांनी काळजी घेतली पाहिजे. ऑनलाईन व्हिडिओ गेम हा ऑनलाईन कम्युनिकेशनचा दुसरा सोर्स आहे, ज्याचे निरीक्षण करण्याची गरज आहे असे प्रौढांना वाटत नाही, परंतु हे विचारात घेतले पाहिजे. अनेक किशोरवयीन मुलांसाठी व्हिडिओ गेम हा एक लोकप्रिय सामाजिक आउटलेट आहे (जेव्हा ते त्यांच्या फोनवर नसतात) आणि अर्ध्याहून अधिक तरुण म्हणतात की खेळत असताना त्यांनी नवीन ऑनलाईन फ्रेंड बनवला आहे. ऑनलाईन गेमिंगद्वारे LGBTQ+ तरुणांना कम्युनिटी बनवणे, नवीन मित्र आणि प्रतिनिधित्व शोधणे यामार्फत फायदा होण्याची संभावना असते, परंतु किशोरवयीन मुले गेमिंग दरम्यान देखील सुरक्षित आहेत याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

तुमच्या किशोरवयीन मुलास नवीन फ्रेंड किंवा फॉलोअर यांच्या पोस्टचे निरीक्षण करण्याची आठवण देणे महत्त्वाचे आहे. खाती हॅक केली जाऊ शकतात आणि आपली खाती सुरक्षित ठेवण्याबाबत सावध असणारे किशोरवयीन मुले फक्त स्वतःचेच नव्हे तर, त्यांच्या खऱ्या फ्रेंड आणि फॉलोअरचे संरक्षण करण्यात देखील मदत करतात. तुमच्या किशोरवयीन मुलास वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची धोरणे आणि मानदंडांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींची खाती – फक्त दुर्लक्षित करण्यास नव्हे – तर ती ब्लॉक करण्यास व तक्रार करण्यास देखील प्रोत्साहन द्या.

सूचना #6 – तुमच्या किशोरवयीन मुलासोबतची अवघड किंवा अस्वस्थ करणारी संभाषणे प्रतिक्रियात्मक असण्याऐवजी प्रतिबंधात्मक असतील तर ती कमी होऊ शकतात.

ऑनलाईन परिस्थितींमध्ये स्वतःची मदत कशी करावी याबाबत LGBTQ+ तरुण अशिक्षित राहिल्यास ते विशेषतः असुरक्षित ठरू शकतात. LGBTQ+ किशोरवयीन मुलाच्या आयुष्यातील एक विश्वासू प्रौढ व्यक्ती या नात्याने डिजीटल वापर जबाबदारीने करण्याबाबत सल्ला देणे अतिशय महत्त्वाचे आहे. ऑनलाईन सुरक्षा आणि गोपनीयतेशी संबंधित LGBTQ+ समस्यांबाबत चर्चा करणे असुविधाजनक आहे म्हणून या संभाषणांकडे दुर्लक्ष करू नका; त्याऐवजी ही जबाबदारी कशी व्यवस्थापित करावी यासंबंधी शिक्षण देऊन तुमच्या किशोरवयीन मुलास सपोर्ट करा, विशेषतः कारण शून्य सहनशीलता धोरणाचा उलट परिणाम होऊ शकतो. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असलेल्या विषयांसाठी खालील संसाधनांंची सहाय्यता घ्या आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या आयुष्यातील किशोरवयीन मुलांना कळू द्या की तुम्हाला त्यांची व त्यांंच्या डिजीटल कल्याणाबद्दल काळजी आहे.

संसाधने

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला