तुमच्या किशोरवयीन मुलाच्या डिजिटल प्रतिष्ठेचे महत्त्व

सायबरबुलिंग संशोधन केंद्र

समीर हिंदुजा आणि Justin W. Patchin

प्रतिष्ठा महत्त्वाची आहे – शाळेमध्ये, कामाच्या ठिकाणी, कम्युनिटीमध्ये, आणि – त्याहून जास्त – ऑनलाईन. सोशल मीडिया, वेब आणि इतर इंटरनेट-आधारित ठिकाणे येथे तुमच्या व्यक्तित्वाचे हुशारीने चित्रण करणारा कंटेट विखुरलेला असतो, आणि त्यातून इतरांच्या तुमच्याबद्दलच्या धारणांना व दृष्टिकोनांना आकार दिला जातो. यातून तुमची डिजिटल प्रतिष्ठा दर्शवली जाते, आणि ती तुम्ही (किंवा इतरांनी) अपलोड केलेले फोटो आणि व्हिडिओ, तुम्ही शेअर केलेल्या कमेंट, तुम्हाला ज्यात प्रस्तुत केले आहे ते लेख, तुमच्याबद्दल इतरांनी पोस्ट केलेली विधाने, तुम्ही वापरलेली स्क्रीनवरील नावे आणि अधिक गोष्टींद्वारे ठरविली जाते.

प्रौढ व्यक्ती म्हणून, आपण चांगली प्रतिष्ठा तयार करण्याचे आणि ती राखण्याचे महत्त्व जाणून असतो. आपल्या मुलांचे काय? किशोरवयीन मूल माध्यमिक शाळेत असो किंवा उच्च माध्यमिक, त्यांच्या आयुष्यात त्यांची डिजिटल प्रतिष्ठा त्यांचा अग्रक्रम असला पाहिजे. त्यांचे समवयस्क, शिक्षक, प्रशिक्षक आणि मेंटॉर व कम्युनिटीतील इतर लोक त्यांच्याकडे कसे पाहतात यावर याचा प्रभाव पडतो. आशा आहे की, त्यांनी कोणत्या तरी स्तरावर याबाबत विचार केलेला आहे, कारण त्यांचे ऑनलाईन चित्रण कसे आहे याच्या आधारे लोक त्यांची पारख करू शकतात (आणि बरेचदा करतील). खरं तर, त्यांच्या डिजीटल प्रतिष्ठेवर, किंवा काही म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या डिजिटल पाऊलखुणांवर महाविद्यालयातील प्रवेश, शिष्यवृत्त्या, रोजगार किंवा अन्य प्रमुख संधी इ. अवलंबून असू शकतात.

तुमच्या किशोरवयीन मुलाची डिजिटल प्रतिष्ठा राखण्यात मदत करा

तुमच्या किशोरवयीन मुलाशी त्याची ऑनलाईन माहिती योग्य प्रकारे व्यवस्थापित करण्याच्या महत्त्वाबाबत चर्चा करणे महत्त्वाचे आहे. त्यांना आठवण करून द्या की त्यांनी ऑनलाईन पोस्ट केलेल्या कोणत्याही गोष्टीचे भविष्यात इतरांकडून मूल्यमापन केले जाऊ शकते. त्यांना ते सोयीस्कर वाटते का? तुमचे किशोरवयीन मूल पोस्ट करत असलेल्या कंटेन्टच्या प्रत्येक भागासाठी त्यांना हा प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करा.

तसेच, वेळ काढून तेथे त्यांच्याबद्दल याआधीच काय दिसते आहे हे पहा. प्रमुख सर्च इंजिन मार्फत, आणि शोध घेणे शक्य असलेल्या इतर साईटवर त्यांचे नाव आणि आडनाव टाकून (आणि कदाचित शाळा आणि/किंवा शहर) सुरुवात करा. नवीन “खाजगी” किंवा “इन्कॉग्निटो” टॅब किंवा विंडो वापरा म्हणजे शोध परिणाम तुमचा ब्राउजिंग इतिहास आणि कुकीज यानुसार खास तुमच्यासाठी क्युरेट केलेले नसतील. तुमच्या किंवा त्यांच्या खात्यांवर काही अडचणीचा कंटेन्ट दिसल्यास, त्यांना तो काढण्यास प्रवृत्त करा. तो जर तुमचे नियंत्रण नसलेल्या अन्य साईट किंवा प्रोफाईलवर असेल तर, क्रिएटर, पोस्ट करणारा किंवा वेब होस्टशी कसा संपर्क साधायचा हे निर्धारित करा. त्यांच्याकडून उत्तर न मिळाल्यास, त्याचा पाठपुरावा करा, किंवा व्यावसायिक प्रतिष्ठित व्यवस्थापन कंपनीशी संपर्क साधा आणि/किंवा वकीलाची मदत घ्या. तुम्ही काही शोध परिणामांमधून तो जुना कंटेन्ट किंवा वैयक्तिक माहिती काढून टाकण्याची औपचारिक विनंती देखील करू शकता. अडचणीचा वाटणाऱ्या कंटेन्टच्या विरुद्ध, तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलास त्याच्यासाठी ऑनलाईन न्यूज स्टोरीज आणि सेगमेंटमध्ये प्रस्तुत होण्याच्या संधी शोधण्यात सहाय्य देखील करू शकता.

इतर लोक त्यांच्या फोटोंमध्ये आणि पोस्टमध्ये किशोरवयीन मुलाला टॅग करून (जे ते सोशल मीडिया फीडमध्ये किंवा तुमच्या मुलाचे नाव शोध संज्ञा म्हणून वापरून इतरांनी घेतलेल्या शोध परिणामांमध्ये दाखवू शकतात) किशोरवयीन मुलाच्या प्रतिष्ठेवर चुकीचा प्रभाव टाकण्याची क्षमता त्यांच्यात असते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. किशोरवयीन मूल कधीही स्वतःला अनटॅग करू शकते, किंवा ज्या व्यक्तीने हे पोस्ट केले तिच्याशी संपर्क साधून ते काढण्याची विनंती करू शकते. यामुळे काम न झाल्यास, तुमच्या किशोरवयीन मुलाशी बोला व त्या व्यक्तीची तक्रार करण्यास आणि सोशल मीडिया साईटला कंटेन्ट काढण्याची औपचारिक विनंती करण्यास सांगा.

वैयक्तिक ब्रँडिंग

संशोधन1 दर्शवते की सोशल मीडिया महत्त्वाच्या व्यावसायिक उद्देशांसाठी उपयुक्त ठरू शकते, जसे की वैयक्तिक ब्रँडिंग, स्वतःचा प्रचार आणि इंप्रेशन व्यवस्थापन. खरे तर, आम्ही त्याचा जाणूनबुजून सकारात्मक वापर करण्यास प्रोत्साहन देतो. सगळ्या युवा वर्गाने शाळेत आणि त्यांच्या कम्युनिटीत उत्तम कामगिरी करण्यासाठी कठोर मेहनत (उदा.नैपुण्य मिळवणे, स्वयंसेवा करणे, अभ्यासेतर उपक्रम इ.) करणे महत्त्वाचे आहे, केवळ वैयक्तिक विकासासाठी नव्हे तर इतरांनी त्यांचा ऑनलाईन शोध घेतल्यास त्यांची कठोर मेहनत, प्रामाणिकपणा आणि नागरी मानसिकता यांचा पुरावा सापडावा यासाठी.

याचबरोबर, तुमच्या किशोरवयीन मुलास वैयक्तिक वेबसाईट तयार करण्यास प्रोत्साहन देणे (किंवा मदत करणे) विवेकाचे ठरू शकते. येथे ते शैक्षणिक, क्रीडा विषयक, व्यावसायिक किंवा सेवा-आधारित कर्तृत्व, प्रशंसापत्रे, आणि त्यांची प्रशंसा करणाऱ्या इतरांकडून मिळालेल्या शिफारसी, तसेच परिपक्वता, चारित्र्य, क्षमता आणि स्नेहभाव दर्शवणारे योग्य ते फोटो आणि व्हिडिओ अपलोड करू शकतात. किशोरवयीन मुलाने भूतकाळात चुकीने काहीतरी अनुचित ऑनलाईन पोस्ट केलेले असल्यास हे अधिकच महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास, त्यांनी त्यांच्याबद्दल सकारात्मक कंटेन्टचे प्रमाण हायलाईट करायला आणि ते वाढवायला हवे, यामुळे नकारात्मक कंटेन्ट दिसणे आणि त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. एकूणच, किशोरवयीन मुलांनी त्यांचा ऑनलाईन सहभाग अशा दृष्‍टीकोनातून सतत विचारात घेतला पाहिजे की त्यांच्याबद्दल जे काही पोस्ट झाले आहे त्याचे चुकीचे परिणाम होण्याऐवजी त्यांना त्याचा उपयोग कसा होईल. पालकांनो, तुमच्या किशोरवयीन मुलाला मिळणार्‍या संधींसाठी त्यांची प्रतिष्ठा राखण्याकरिता त्यांचे भागीदार बना – आणि अशा प्रकारे त्यांच्या यशस्वी होण्याच्या शक्यता वाढवा.

संबंधित विषय

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला