भविष्य साकारले आहे: मीडिया साक्षरता याद्वारे जनरेटिव्ह AI समजून घेणे

NAMLE द्वारे Meta साठी तयार केले आहे

31 मे 2024

तुमच्या लक्षात आले असेल—प्रत्येकजण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बद्दल बोलत आहे. AI सर्वव्यापी होत असल्याने, सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये संकल्पना म्हणून पाहिलेली गोष्ट आता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक मोठा भाग झाली आहे. पालक या नात्याने, तुमची किशोरवयीन मुले लॉग इन करत असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्हाला नुकतेच समजायला लागले असतील आणि आता तुम्ही या नवीन तंत्रज्ञानाचा सामना करत आहात. तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगती करत असल्याचे दिसते आणि ही प्रगती अनावर वाटू शकते, विशेषतः ज्या पालकांना त्यांच्या मुलांना एकाच वेळी काही समजावयाचे आणि शिकवायचे आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता हे काही नवीन नाही. पहिला AI प्रोग्राम 1956 मध्ये लिहिला गेला होता! होय, 60 पेक्षा अधिक वर्षांपूर्वी! आजच्या आपल्या जगात, AI तंत्रज्ञानाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जात आहे. वेब शोध. स्पेल चेक. चॅटबॉट. व्हॉईस साहाय्यक. सोशल मीडिया अल्गोरिदम. शिफारस केलेल्या व्हिडिओ लिस्ट. मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असणारी टास्क करण्यासाठी कॉम्प्यूटर वापरणे ही सामान्य गोष्ट आहे. तर मग आजकाल AI हा आपल्या सांस्कृतिक संभाषणाचा इतका मोठा भाग का आहे?

मुख्य कारणांपैकी एक म्हणजे AI चा जनरेटिव्ह AI नावाचा प्रकार, जे खूप लक्ष वेधून घेत आहे. जनरेटिव्ह AI हा एक प्रकारचा AI आहे जो कंटेन्ट तयार करतो ज्यामध्ये मजकूर, इमेज, ऑडिओ आणि व्हिडिओचा समावेश आहे. तुम्ही स्पेल चेक वापरले असेल किंवा तुमचे व्याकरण दोनदा तपासले असेल, तर तुम्ही जनरेटिव्ह AI वापरले असावे. तुम्ही "डीपफेक" बद्दल देखील ऐकले असेल, जे व्हिज्युअल कंटेन्टमध्ये फेरबदल करण्यासाठी AI चा वापर करू शकतात, जसे की एखाद्या व्यक्तीचा चेहरा वेगळ्या व्यक्तीच्या शरीरावर लावणे. किंवा कदाचित तुमच्या किशोरवयीन मुलाची शाळा तरुण लोक त्यांचा गृहपाठ करत असताना मजकूर कंटेन्ट तयार करणाऱ्या नवीन चॅटबॉट ॲप्सचा विद्यार्थी वापर कसा व्यवस्थापित करायचा हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. जनरेटिव्ह AI आता तंत्रज्ञान क्षेत्राचा महत्त्वाचा भाग आहे. हे कसे कार्य करते, याचे फायदे आणि आव्हाने समजून घेणे आणि तंत्रज्ञानवर नेव्हिगेट करताना मीडिया साक्षरता कौशल्यांसह किशोरवयीन मुलांचे समर्थन करणे महत्त्वाचे आहे हे पालकांना माहीत असणे महत्त्वाचे आहे.

जनरेटिव्ह AI कसे काम करते (सोप्या शब्दांत)?

जनरेटिव्ह AI जगात आधीपासून अस्तित्वात असलेला डेटा मोठ्या प्रमाणात ग्रहण करून पॅटर्न आणि संरचनांसाठी स्कॅन करते. त्यानंतर सिस्टम काय ओळखायला शिकली आहे यावर आधारित नवीन कंटेन्ट आणि डेटा तयार करण्याचे नियम विकसित करते. सिस्टम ही पॅटर्न आणि संरचनांविषयी जाणून घेत असताना लोक तिला प्रशिक्षित करतात. उदाहरणार्थ, तुम्ही पर्यटन स्थळाविषयी माहितीच्या डेटासेटवर AI ला प्रशिक्षण देऊ शकता आणि तुम्ही त्या स्थानाला भेट दिल्यावर करायच्या गोष्टींबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे जनरेट करू शकता. उत्तरे अचूक वाटू शकतात, परंतु ते कदाचित तसे असेलच असे नाही. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की जनरेटिव्ह AI चे आउटपुट हे प्रशिक्षण देण्यासाठी कोणती माहिती आणि डेटा उपलब्ध करून दिला जातो यावर अवलंबून आहे.


जनरेटिव्ह AI चे फायदे काय आहेत?

नवीन तंत्रज्ञान आपल्यासाठी खूप रोमांचक आणि मौल्यवान असू शकते. ते आपल्याला अधिक कार्यक्षम आणि अधिक क्रिएटिव्ह बनवू शकतात. येथे विचारात घ्यायचे तीन फायदे दिले आहेत:

  1. जनरेटिव्ह AI नवीन कल्पना आणि नवीन शक्यता जनरेट करते. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जनरेटिव्ह AI वापरल्याने त्याची सर्जनशीलता वाढू शकते, जसे की एखादी कथा लिहिताना. हे नवीन कल्पना जनरेट करण्यात आणि चौकटी बाहेरील विचार करण्यात देखील मदत करू शकते.
  2. शिक्षणामध्ये जनरेटिव्ह AI चा वापर वैयक्तिकरण करू देतो. विशिष्ट विद्यार्थ्यासाठी लेसन प्लॅन किंवा अ‍ॅक्टिव्हिटी सानुकूलित करता येणे हे शिक्षकांसाठी एक अतुल्य टूल आहे. हे विशेषतः मानसिकरीत्या वेगळे (न्यूरोडायव्हर्जंट) किंवा अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. हे नवीन भाषेचा सराव करण्यात, नवीन कौशल्य शिकण्यात किंवा तुमचे किशोरवयीन मूल शाळेत शिकत असलेल्या गोष्टींवर अतिरिक्त सपोर्ट मिळवण्यात देखील मदत करू शकते. तुमचे किशोरवयीन मूल त्याच्या असाइनमेंटसाठी मान्यताप्राप्त तंत्रज्ञान विषयक टूल वापरत असल्याचे निश्चित करण्यासाठी त्यांच्या शिक्षकांसोबत ते बोलत असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
  3. AI टूल अनेकदा वेळ वाचवतात आणि उत्पादकता वाढवतात. हे जनरेटिव्ह AI साठी देखील खरे आहे. कॉर्पोरेशन आणि संस्था या आधीच जनरेटिव्ह AI वापरत आहेत जेणेकरून कर्मचाऱ्यांना सामान्य कामे करण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल आणि ते उच्च स्तरीय विचार आणि धोरणावर लक्ष केंद्रित करू शकतील. उदाहरणार्थ, काही कंपन्या आता जनरेटिव्ह AI चॅटबॉट वापरून 24/7 ग्राहक सहाय्य प्रदान करतात.

जनरेटिव्ह AI ची आव्हाने कोणती आहेत?

जनरेटिव्ह AI समजून घेण्याचे हे सुरुवातीचे दिवस आहेत आणि जनरेटिव्ह AI चा जीवनाच्या विविध पैलूंवर जसे की शिक्षण, आरोग्यसेवा, व्यवसाय, कम्युनिकेशन किंवा नागरी जीवनावर काय परिणाम होईल याचे मूल्यांकन करण्यासाठी थोडा वेळ लागेल. आम्हाला माहीत आहे की जनरेटिव्ह AI च्या वापरामुळे काही आव्हाने उद्भवतात. येथे विचारात घेण्यासाठी तीन मुद्दे दिले आहेत:

  1. आम्हाला माहीत आहे की जनरेटिव्ह AI पूर्वाग्रहास संवेदनाक्षम असू शकते कारण प्रशिक्षणासाठी वापरलेले डेटासेट कमी दर्जाचे, रूढीवादी आणि/किंवा पक्षपाती असू शकतात. लक्षात ठेवा, जनरेटिव्ह AI केवळ विशिष्ट डेटासेटमधून शिकण्याच्या पॅटर्नद्वारे तयार करू शकते ज्यावर ते प्रशिक्षित केले गेले आहे, त्यामुळे तयार केलेल्या माहितीची गुणवत्ता इनपुटच्या गुणवत्तेइतकीच चांगली असते.
  2. जनरेटिव्ह AI टूल इंटरनेटवरून माहिती घेऊ शकत असल्याने किशोरवयीन मुलांनी त्यांच्या संसाधनांचा उल्लेख करताना अजूनही लक्ष देणे आवश्यक आहे. काही जनरेटिव्ह AI टूलमध्ये उद्धरणांचा समावेश आहे, परंतु सर्वच नाही. आणि जनरेटिव्ह AI प्रोग्राम संदर्भातील काही उद्धरणे नेहमीच अचूक नसतात. तुमच्या किशोरवयीन मुलांना AI द्वारे जनरेट केलेल्या माहितीबद्दल आणि त्यांच्या कामात कंटेन्ट वापरण्यापूर्वी त्यांचाकडे परवानगी आहे की नाही याबद्दल जागरूक राहण्यास मदत करा.
  3. सत्यता-तपासणी हा जनरेटिव्ह AI प्रक्रियेचा भाग नाही. अल्गोरिदम हे डेटासाठी विश्वासार्हता आणि अचूकता या पूर्व शर्ती विचारात घेत नाहीत. तुम्ही कल्पना करू शकता, याचा अर्थ जनरेट केलेल्या कंटेन्टची विश्वासार्हता तो वापरण्यापूर्वी किंवा शेअर करण्यापूर्वी विचारात घेणे आवश्यक आहे. काही कंपन्या हे आव्हान स्वीकारत आहेत.

सर्व मूलभूत तंत्रज्ञानाप्रमाणे – रेडिओ ट्रान्समीटरपासून ते इंटरनेट ऑपरेटिंग सिस्टमपर्यंत – AI मॉडेलसाठी अनेक उपयोग असतील, काहींचा अंदाज लावता येईल आणि काहींचा नाही. आणि प्रत्येक तंत्रज्ञानाप्रमाणे, आपण सुरक्षा, गोपनीयता, सत्यता, कॉपीराईट आणि नैतिकतेच्या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे कारण ते जनरेटिव्ह AI शी संबंधित आहेत.

तुम्हाला AI नॅव्हिगेट करण्यात मदत होण्यासाठी तुम्ही मीडिया साक्षरता कौशल्ये कशी वापरू शकता

कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घेण्यासाठी मीडिया साक्षरता कौशल्ये आवश्यक आहेत. मीडिया साक्षरता म्हणजे सर्व प्रकारच्या संवाद पद्धती वापरून अॅक्सेस, विश्लेषण, मूल्यांकन, निर्मिती आणि कृती करण्याची क्षमता होय. मीडिया साक्षरता लोकांना गंभीर विचारवंत आणि निर्माते, प्रभावी संवादक आणि सक्रिय नागरिक होण्यासाठी सक्षम करते. मीडिया साक्षरतेची गुरुकिल्ली म्हणजे प्रश्न विचारायला शिकणे तसेच तुम्ही वापरत असलेल्या आणि तयार करत असलेल्या माहितीविषयी सखोलपणे विचार करणे. जनरेटिव्ह AI जनरेट करते त्यासह सर्व माहितीसाठी हे महत्त्वाचे आहे.

अनेक लोक प्रश्न विचारत आहेत, "A.I. द्वारे फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओमध्ये फेरबदल केले जाऊ शकतात तर काहीही खरे आहे की नाही हे मला कसे कळेल?" मीडिया साक्षरता शिक्षण आपल्याला “वास्तविक किंवा खोटे,” “तथ्य किंवा काल्पनिक” अथवा “खरे आणि खोटे” या पलीकडे पाहण्यास तसेच आपण जे पाहत आणि ऐकत आहोत ते अधिक सूक्ष्मपणे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडते.

तुम्ही तुमच्या सोशल मीडिया फीडवरून स्क्रोल करत असाल किंवा इंटरनेटवर व्हिडिओ पाहत असाल, तुम्ही असे प्रश्न विचारू शकता ज्यांमुळे सखोल विश्लेषण करता येईल. उदाहरणार्थ:

  • हे कोणी बनवले?
  • हे का बनवण्यात आले?
  • मी काय विचार करायचा आहे असे यास वाटते?
  • जाणून घेणे महत्त्वाचे असू शकते असे काय गाळले आहे?
  • यामुळे मला कसे वाटते?
  • हे किती विश्वासार्ह आहे (आणि तुम्हाला कसे कळेल?)

लक्षात ठेवा: कंटेन्ट हा जनरेटिव्ह AI ने जनरेट केला असला किंवा नसला तरीही आपण वापरत आणि तयार करत असलेल्या कंटेन्टबद्दल प्रश्न विचारणे ही मानक पद्धत असली पाहिजे. सर्व माहिती विश्लेषण आणि मूल्यांकनाच्या अधीन असावी.

मी जनरेटिव्ह AI बद्दल माझ्या किशोरवयीन मुलासोबत कशाप्रकारे संवाद साधू?

तुमच्या किशोरवयीन मुलाला जनरेटिव्ह AI बद्दल आधीच माहिती असू शकते, परंतु कंटेन्ट कुठून आला आणि तो कोणी तयार केला हे समजत नसावे. तुमच्या किशोरवयीन मुलाशी त्याबद्दल मोकळेपणाने चर्चा करणे आणि त्यांच्या अनुभवाबद्दल उत्सुक असणे ही तुम्ही करू शकत असलेली सर्वात चांगली गोष्ट आहे. उदाहरणार्थ:

मी जनरेटिव्ह AI विषयी वाचन केले. तुला त्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. मला त्याबद्दल तुझे विचार ऐकायला आवडतील कारण ते काय आहे हे मला नुकतेच समजू लागले आहे. ते कसे कार्य करते ते तू मला दाखवू शकशील का?

विशेषतः, जनरेटिव्ह AI त्यांच्या शिक्षणावर कसा परिणाम करत असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही विचारू शकता असे काही प्रश्न:

  • तुम्हाला शाळेत जनरेटिव्ह AI वापरण्याची अनुमती आहे का?
  • ते कसे वापरता येईल याबद्दल तुमच्या शाळेचे नियम आहेत का?
  • शालेय कामासाठी हे तुम्हाला उपयुक्त ठरले आहे का?

तुमच्या किशोरवयीन मुलाला त्यांच्या शाळेतील जनरेटिव्ह AI बद्दलचे नियम माहीत नसल्यास, ते जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापकांशी संपर्क साधू शकता का हे त्यांना विचारा. काही शाळा क्रिएटिव्ह पद्धतीने जनरेटिव्ह AI वापरत आहेत. शैक्षणिक अखंडतेच्या चिंतेमुळे इतरांकडे याबाबत कठोर नियम आहेत.

नवीन तंत्रज्ञान येते, तेव्हा त्याचा वापर आणि परिणाम याविषयी तुमच्या किशोरवयीन मुलांशी चर्चा करा. प्रश्न विचारा. ऐका. त्यांच्याकडून आणि त्यांच्यासोबत शिका. हे संसाधन एकत्र रिव्ह्यू करा! नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा वेळ घेणे, धीर धरणे आणि जिज्ञासू राहणे.

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला