छळणुकीचे स्वरूप म्हणून डीपफेक

समीर हिंदुजा आणि Justin W. Patchin

2020 च्या उन्हाळ्यात, 50 वर्षांच्या एका महिलेने तंत्रज्ञानाचा वापर करून तिच्या मुलीच्या समवयस्कांना टार्गेट केले. यातील सर्वात महत्त्वाचा भाग आक्रमक आणि टार्गेट यांच्यामधील फरक हा नव्हता, तर ऑनलाईन सापडलेल्या काही प्रतिमा सॉफ्टवेअर वापरुन बदलल्या गेल्या व त्या नग्न, अल्‍पवयीन असताना दारू पीत आहेत किंवा नशा करण्याचे प्रॉडक्ट वापरत आहेत अशा – तिची मुलगी पूर्वी ज्या चिअरलिडींग क्लबमध्ये जात असे त्या क्लबच्या मुलींशी साधर्म्य असल्यासारख्या करण्यात आल्या होत्या. हे “डीपफेक” मुलींना ओळखू न येणाऱ्या फोन नंबरवरून मजकूर मेसेजद्वारे प्रसारित करण्यात आले होते आणि पालकांना माहीत असले पाहिजे अशा एका नवीन ट्रेंडचे उदाहरण आहेत.

डीपफेक म्हणजे काय?

“डीपफेक” (“डीप लर्निंग + खोटे”) हा शब्द, युजरच्या ऑनलाईन कम्युनिटींनी सेलिब्रिटींच्या खोट्या पोर्नोग्राफी प्रतिमा शेअर करण्यास सुरुवात केली त्यापासून उत्पन्न झाला असावा असे दिसते. ते तयार करण्यासाठी, आश्चर्यकारकपणे अत्यंत वास्तविक वाटणारा बनावट कंटेन्ट (उदा. फोटो आणि व्हिडिओ) निर्माण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअर वापरले जाते, जो खरा वाटावा या हेतूने बनवला जातो. मोठ्या प्रमाणावरील कंटेन्टचे विश्लेषण करण्यासाठी (उदा. एखाद्या व्यक्तीच्या व्हिडिओचे तास, एखाद्या व्यक्तीचे हजारो चित्र) कम्प्यूटिंग पॉवर वापरुन शिक्षण मॉडेल तयार केले जातात, यामध्ये चेहऱ्याच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर आणि देहबोली/ठेवण याकडे विशेष लक्ष पुरवले जाते.

त्यानंतर, जाणून घेतलेल्या गोष्टी ज्या प्रतिमा/फ्रेम्समध्ये कुशलतेने फेरफार करायचे किंवा तयार करायच्या आहेत त्यांना अल्गोरिथम स्वरूपात लागू केल्या जातात (उदा. मूळ कंटेन्टवर ओठांच्या हालचाली सुपरइम्पोज करणे आणि ध्वनी डब करणे) व असा आभास निर्माण केला जातो की ती व्यक्ती काहीतरी बोलते आहे परंतु वास्तविक पाहता तिने ते कधीच म्हंटलेले नसते. कृत्रिम घटक जोडणे (जसे “बिघाड” जो सामान्य किंवा प्रसंगानुरूप भासतो) किंवा वास्तविकता वाढवण्यासाठी मास्किंग/संपादन वापरणे यांसारखे जास्तीचे तंत्रज्ञान देखील जोडीला टाकले जाते, आणि त्यातून निर्माण होणारे प्रॉडक्ट आश्चर्यकारकपणे खात्री वाटण्याजोगे असतात. डीपफेकच्या उदाहणांसाठी तुम्ही वेब शोध घेतल्यास, ते किती अस्सल वाटतात हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमचे मूल कुठल्याही डीपफेकला बळी पडू नये यासाठी काळजी घेताना तुम्ही जाणून घ्यावेत असे काही महत्त्वाचे मुद्दे खाली दिले आहेत, ज्यामुळे त्यांना वास्तव व कल्पित जग यांमध्ये फरक करता येण्याची क्षमता मिळेल.

डीफफेक कसे ओळखायचे

तंत्रज्ञानात जसजशी सुधारणा होते तसतसे डीपफेक अधिकाधिक वास्तव होत आहेत, ते ओळखण्यासाठी फोटो किंवा व्हिडिओ कंटेन्टमधील काही विशिष्ट माहितीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे (नैसर्गिकपणे डोळ्यांची उघडझाप न होणे). झूम इन करून तोंड, गळा/कॉलर किंवा छातीभोवती अनैसर्गिक किंवा अस्पष्ट कडा आहेत का हे पाहणे अतिशय उपयुक्त ठरते. या ठिकाणी बरेचदा मूळ कंटेन्ट आणि सुपरइम्पोज केलेला कंटेन्ट यामधील एकीकरण किंवा ताळमेळ झालेला नसतो असे आढळून येते.

व्हिडिओवर तुम्ही क्लिप हळू करू शकता आणि ओठांच्या हालचाली जुळणे किंवा थरथरणे यांसारख्या व्हिजुअल विसंगती आढळतात का हे पाहू शकता. याशिवाय, अशा क्षणचित्रांवर लक्ष ठेवा ज्यामध्ये, जे काही बोलले जात आहे त्यानुसार त्या पात्राच्या भावना प्रदर्शित होत आहेत की नाही, शब्द उच्चारणात चूक आहे का किंवा ते अन्य कुठल्याही विचित्र विसंगतीचा भाग आहे का. सरतेशेवटी, फोटोंवर (किंवा व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉटवर) उलट प्रतिमा शोध घेतल्यास, फेरफार करण्याआधीच्या मूळ व्हिडिओचा इशारा मिळू शकतो. त्या पॉईंटवर, कंटेन्टच्या दोन भागांची काळजीपूर्वक तुलना करा व कोणत्या भागात फेरफार करण्यात आले आहेत ते निर्धारित करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या ज्ञानेंद्रियांवर विश्वास ठेवा; आपणे जेव्हा कंटेन्ट पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी त्याचा वेग कमी करतो तेव्हा आपल्याला सामान्यतः जाणवते की काहीतरी भलतेच आहे.

किशोरवयीनांना याची आठवण करून देणे महत्त्वाचे आहे की ते ऑनलाईन पोस्ट करत असलेले सर्व काही डीपफेक तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर, त्यांनी कदाचित कंटेन्टची एक लायब्ररी तयार केली असू शकते, जी इतर जण ॲक्सेस करू शकतात आणि त्यांच्या समंतीशिवाय फेरफार करू शकतात. त्यांचा चेहरा, हालचाली, व्हॉईस आणि इतर वैशिष्ट्ये हवे तसे साजेसे केले जाऊ शकतात आणि नंतर साधर्म्य असलेल्या इतर कोणावर सुपरइम्पोज केले जाऊ शकतात – एखाद्याच्या अशा वर्तनात ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. या संबंधातील संवाद सुलभ बनवण्‍यासाठी, अनिर्णायक आणि समजून घेण्‍याच्या पद्धतीने येथे काही प्रश्न त्यांना विचारण्‍यासाठी दिले आहेत:

  • अशा काही व्यक्ती ज्यांचा, कधीतरी, तुमच्याशी विवाद झाला होता किंवा तुमच्या प्रतिस्पर्धेत होत्या त्यांना तुम्ही स्वीकारले असण्‍याची शक्यता आहे का?
  • तुम्ही अशा एखाद्या व्यक्तिकडून कधीही दुखावले गेला आहात का ज्यांकडून दुखावले जाण्याची तुम्हाला अपेक्षा नव्हती? ते पुन्हा घडू शकेल का?
  • जेव्हा नवीन फॉलोअर किंवा फ्रेंड रिक्वेस्ट येतात, त्या योग्य आहेत किंवा नाहीत याची खात्री करण्यासाठी तुम्ही त्यांची प्रोफाईल तपासता का? तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता का?
  • तुमच्या मित्राने केलेला कोणत्याही पोस्टचा वापर दुसऱ्याकडून अनधिकृतपणे झाला आहे का? हे तुमच्यासोबत होण्याची शक्यता आहे का?

एखाद्या व्यक्तीने भावनात्मक, मानसिक पातळीवर आणि प्रतिष्ठेस हानी पोहचवण्याचा विचार केल्यास, डीपफेकमध्‍ये किशोरवयीन मुलांच्या कल्याणाबद्दल तडजोड करण्‍याची क्षमता असल्याने ती व्यक्ती तसे करू शकते. श्रवणीय, दृश्य आणि तात्पुरती विसंगती मानवी डोळ्यांद्वारे निरिक्षण चुकवू शकतात, परंतु प्रतिमा किंवा व्हिडिओ कंटेन्टमधील कोणतीही एकसमानता ओळखण्यासाठी आणि फ्लॅग करण्यासाठी सॉफ्टवेअर सुधारित केले जात आहे. ही तंत्रज्ञाने सुधारित होणे चालू असल्याने, पालक, काळजीवाहक व्यक्ती आणि तरूणांची काळजी घेणारे अन्य प्रौढ लोक यांनी डीपफेकबद्दलच्या वास्तविकतेबाबत जागरूकता वाढवणे आणि त्या डीपफेकच्या निर्मिती व वितरणामुळे होणारे परिणाम रोखण्‍यासाठी कार्य करणे आवश्‍यक आहे. त्याचवेळी, तुमच्या किशोरवयीन मुलाला नियमितपणे आठवण करून द्या की कोणत्याही डीपफेकच्या परिस्थितींमध्‍ये (आणि अर्थातच, त्याला अनुभवास येणार्‍या ऑनलाईन हानी बाबत) त्याला मदत करण्‍यासाठी नेहमीच तुम्ही त्याच्यासोबत आहात.

संबंधित विषय

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला