तुमच्या किशोरवयीनाला Facebook आणि Messenger वर वयानुसार योग्य असलेले डिजिटल अनुभव मिळवण्याच्या दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी गरजेनुसार बनवलेली टूल, इन्साईट आणि संसाधने शोधा.
Facebook आणि Messenger वर किशोरवयीन खाती सादर करत आहे
किशोरवयीनांसाठी पालकांच्या मार्गदर्शनाखाली नवीन, सुरक्षित अनुभव
लवरकच Facebook आणि Messenger वरील किशोरवयीनांना आपोआप किशोरवयीन खात्यांमध्ये ठेवले जाईल, ज्यामध्ये अपडेट केलेली सेटिंग्ज आहेत जी त्यांच्याशी कोण संपर्क करू शकते आणि ते कोणता कंटेन्ट पाहतात ते मर्यादित करू शकतात. 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या किशोरवयीनांना ही सेटिंग्ज बदलण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असेल.
खाते वैशिष्ट्ये आणि टूलद्वारे सकारात्मक ऑनलाईन अनुभवास उत्तेजन द्या
तुमच्या किशोरवयीनाला ॲप-मधील वैशिष्ट्ये आणि टूलबद्दल अधिक जाणून घेऊन ते जी ऑनलाईन कनेक्शन तयार करत आहे त्यामधून त्यांना आत्मविश्वासाने नॅव्हिगेट करण्यात सक्षम करा.
कंटेन्ट आणि इंटरॅक्शन
गैरवर्तनापासून आमच्या तंत्रज्ञानास सुरक्षित ठेवण्यासाठी, आम्ही धोरणांच्या उल्लंघनांचे निरीक्षण करतो आणि गैरवापर आमच्या सर्व्हिस बाहेर ठेवण्यासाठी आमच्याकडे उपाययोजना आहेत. तुम्हाला अवांछित कंटेन्ट प्रतिबंधित करण्यात मदत करण्यासाठी असलेल्या सेटिंग्जमध्ये याचा समावेश होतो:
एखाद्या व्यक्तीस अवांछित संभाषणे किंवा भविष्यातील इंटरॅक्शनपासून ( Facebook वर किंवा Messenger वर) ब्लॉक करणे
दृश्यमानतेची पातळी आणि विशिष्ट लोकांसोबत होणार्या तुमची इंटरॅक्शन मर्यादित करण्यासाठी लोकांवर (Facebook वर किंवा Messenger वर) निर्बंध लावणे
आमची मार्गदर्शक तत्त्वे आणि स्टँडर्डचे उल्लंघन करणार्या कंटेन्ट किंवा खात्यांची तक्रार करणे
काही संरक्षणे आपोआप सक्षम केली जातात. किशोरवयीन खाती याद्वारे, खालील प्रेक्षक सेटिंग्ज आपोआप फ्रेंड यावर सेट केली जातील:
तुमच्या भविष्यातील पोस्ट, स्टोरी किंवा रील कोण पाहू शकते
तुमची फ्रेंड्स लिस्ट कोण पाहू शकते
तुम्ही फॉलो करत असलेले लोक, पेज आणि लिस्ट कोण पाहू शकते
तुमच्या प्रोफाईलवर तुम्हाला टॅग केलेल्या पोस्ट कोण पाहू शकते
तुमच्या सार्वजनिक पोस्टवर कोण कमेंट करू शकते
सक्षम केलेले सुपरव्हिजन याद्वारे, पालक आणि संरक्षक हे करू शकतात:
तुमच्या किशोरवयीनाचे मित्र आणि संपर्क कोण आहेत ते पाहणे
तुमच्या किशोरवयीनाने कोणाला आणि काय ब्लॉक केले आहे ते पाहणे
तुमच्या किशोरवयीनाला कोण मेसेज करू शकते किंवा त्यांच्या स्टोरी कोण पाहू शकते ते पाहणे
त्यांच्या किशोरवयीनाने ब्लॉक केलेले लोक आणि पेज पाहणे
तुमच्यासोबत तुमचे किशोरवयीन शेअर करते ती तक्रार केलेली खाती पाहणे
आमच्या ॲप्सचा गैरवापर रोखण्यासाठी Meta ने उपाययोजना करण्याची खात्री केली आहे आणि कशाला अनुमती आहे आणि कशाला नाही यासाठी मानके विकसित केली आहेत. सर्व खात्यांसाठी उपलब्ध सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
कमेंट व्यवस्थापन यामुळे तुम्हाला तुमच्या Facebook पोस्टवर कोण कमेंट करू शकते ते ठरवता येते
कंटेन्ट फिल्टर तुम्हाला तुमच्या Facebook पेज किंवा पोस्टवर आक्षेपार्ह वाटतात अशा कोणत्याही ईमोजी, शब्द किंवा वाक्ये फिल्टर करते
प्रेक्षक निवडकर्ता, यामुळे तुम्हाला तुमचे कमेंट करणारे प्रेक्षक ॲडजस्ट करता येतात आणि एखाद्या संभाषणावर नियंत्रण मिळवता येते
रिव्ह्यू टॅग यामुळे तुम्हाला ज्यात टॅग केले आहे त्या Facebook पोस्ट तुमच्या प्रोफाईलवर दिसण्यापूर्वी मंजूर करता येतात किंवा डिसमिस करता येतात
किशोरवयीन खाती यामध्ये संरक्षणाचे अतिरिक्त स्तर असतात. ही खाती:
आपोआप अधिक संवेदनशील आणि संभाव्य आक्षेपार्ह कंटेन्ट फिल्टर करतील, जेणेकरून तुम्हाला सर्वाधिक वयानुसार योग्य असलेला कंटेन्ट दिसेल
सक्षम केलेले सुपरव्हिजन याद्वारे, पालक आणि संरक्षक हे करू शकतात:
तुमच्या किशोरवयीनाचे मित्र आणि संपर्क कोण आहेत ते पाहणे
तुमच्या किशोरवयीनाने कोणाला आणि काय ब्लॉक केले आहे ते पाहणे
आम्ही किशोरवयीनांना त्यांच्या वापराबाबत मर्यादा निर्धारित करण्यात सक्षम करून त्यांना Facebook आणि Messenger वरील त्यांचा वेळ व्यवस्थापित करण्यासाठी प्रेरित करतो. त्यांना त्यांचा वेळ व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी, आम्ही यांसारखी वैशिष्ट्ये लागू केली आहेत:
तुमचा Facebook वरील वेळ तुम्हाला हे दाखवतो की तुम्ही Facebook वर दररोज सरासरी किती वेळ घालवता
जेव्हा ते Facebook वर 20 मिनिटे घालवतात तेव्हा ब्रेक घ्या नोटिफिकेशन
किशोरवयीन खात्यांमध्ये अतिरिक्त डीफॉल्ट सेटिंग्ज असतात, ज्यांमध्ये यांचा समावेश असतो:
किशोरवयीनांना दररोज 60 मिनिटांनंतर Facebook बंद करण्यास सांगणारे नोटिफिकेशन
स्लीप मोड आपोआप रात्री 10 ते सकाळी 7 यादरम्यान चालू होतो, ज्यामुळे रात्रभर नोटिफिकेशन म्यूट केली जातील आणि Facebook बंद करण्यासाठी रिमाइंडर प्रदर्शित केले जाईल
सक्षम केलेल्या सुपरव्हिजनद्वारे, पालक आणि संरक्षक हे करू शकतात:
प्रत्येक ॲपवर किशोरवयीनांच्या वापराबाबत इन्साईट पाहणे
दैनिक वापरावर अशा मर्यादा सेट करा जिथे किशोरवयीन ॲप ॲक्सेस करू शकत नाहीत
असे शेड्यूल केलेले ब्रेक किंवा कालावधी तयार करा जिथे किशोरवयीन ॲप ॲक्सेस करू शकत नाहीत