मोकळेपणाला उत्तेजन देणे वि. गुप्तता
मला समजते. मी किशोरवयीन असताना, मी माझ्या आईपासून गोष्टी लपवत असे कारण मला जजमेंट किंवा शिक्षा होण्याची भीती वाटत असे. हेच सर्व माझ्या किशोरवयीनांसोबत व्हावे असे मला वाटत नाही. म्हणूनच मी असे वातावरण तयार करण्यासाठी मेहनत करते जिथे त्यांना माझ्यासोबत — अगदी क्लिष्ट विषयांबद्दलदेखील बोलणे सोयीस्कर वाटेल, जसे की सोशल मीडिया, गोपनीयता आणि ऑनलाईन सुरक्षा.
उदाहरणार्थ, माझ्या किशोरवयीनाला एका नवीन ॲपसाठी साइन अप करावेसे वाटले, तेव्हा आम्ही एकत्र बसून सेटिंग्ज पाहिली. मी त्यांना गोपनीयता नियंत्रणे समायोजित करण्यासाठी आणि ते ॲप कसे वापरणार आहेत समजावण्यासाठी पुढाकार घेऊ दिला. इनपुटशिवाय नियम बनवण्याऐवजी, मी विचारले, “तुमच्यामते सर्वात मोठ्या जोखमी कोणत्या आहेत? तुम्ही संरक्षित आहात याची खात्री आपण कशी करू शकतो?” यामुळे संभाषणाची दिशा बदलून ते “आईचे नियंत्रण माझ्या आयुष्यावर आहे” असे न राहता ते “याबाबत आम्ही एकत्रित आहोत” असे झाले.
वय महत्त्वपूर्ण का आहे
किशोरवयीन वर्षे ही पूर्णपणे वाढीची आणि बदल घडण्याची असतात. एक दिवस, ते ॲनिमेट केलेले चित्रपट पाहत असतात, तर दुसर्या दिवशी ते ऑनलाईन सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करत असतात. डिजिटल जागांनी ती वाढती परिपक्वता — कंटेन्टचा ॲक्सेस, वैशिष्ट्ये ऑफर करून आणि त्यांच्या वयानुसार इंटरॅक्शन करून विकासाची अवस्था निर्माण करून दर्शवली पाहिजे.
Meta ने यासाठी वयाची हमी देणार्या उपाययोजना डिझाईन केल्या आहेत:
- त्यांच्या वयोगटानुसार योग्य नसलेल्या कंटेन्टपासून तरुण युजरचे संरक्षण करणे.
- योग्य गोपनीयता सेटिंग्ज आणि उपाययोजनांसह, किशोरवयीनांना त्यांच्या वयाच्या गरजेनुसार बनवलेला कंटेन्ट मिळतो याची खात्री करणे.
- पालकांना त्यांच्या किशोरवयीनांच्या स्वातंत्र्याला ठेच न पोहोचू देता त्यांच्या डिजिटल इंटरॅक्शनबद्दल माहिती असण्यात मदत करणे.
पण येथे एक आव्हान आहे: किशोरवयीनांना त्यांचे वय विचारले जाणे महत्त्वाचे वाटत नसावे. त्यांचे पालक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत असे गृहीत धरून, त्यांना कदाचित असे वाटू शकते की हा आणखी एक अडथळा किंवा ही त्रासदायक बाब आहे. म्हणूनच आपण संभाषणाची रचना कशी करतो ते महत्त्वपूर्ण आहे.
तुमच्या किशोरवयीनाशी त्यांचे वास्तविक वय प्रदान करण्याबद्दल कसे बोलावे
आपल्या सर्वांचा अनुभव हाच आहे - आपल्या किशोरवयीनाशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करताना, आपल्याला डोळे फिरवणे, उसासे किंवा "मला आधीपासून माहीत आहे, आई/बाबा" असे प्रतिसाद मिळतात. ही संभाषणे आणखी सकारात्मक बनवण्यासाठी, या काही पालकत्वाच्या योजना दिल्या आहेत ज्यामुळे काम सोपे होते:
1. सहानुभूती दाखवा, अधिकार नाही
"तुम्हाला हे करावे लागेल कारण हे सुरक्षित आहे," अशी सुरुवात करण्याऐवजी असे म्हणून पहा:
"तुम्ही कनेक्ट केलेले कसे राहता याचा सर्वात मोठा भाग हा सोशल मीडिया आहे हे मला माहीत आहे. मला फक्त खात्री करायची आहे, की तुम्हाला सर्वोत्तम अनुभव मिळत आहे — जो प्रत्यक्षात तुमच्या वयाच्या लोकांसाठी डिझाईन केलेला आहे."
यामुळे नियम आणि नियंत्रण लादण्यावर लक्ष केंद्रित न होता ते सपोर्ट करणे आणि भागीदारीची भावना निर्माण होणे यावर केंद्रित होईल.
2. त्यांच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करा
किशोरवयीनांना योग्यता आणि स्वायत्तता महत्त्वाची असते. तुम्ही हे समजावून सांगू शकता:
"प्लॅटफॉर्मना तुमचे वास्तविक वय माहीत असते, तेव्हा ते खात्री करू शकतात की तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेला कंटेन्ट पाहात आहात. याचा अर्थ असा, की कमी विचित्र जाहिराती, तुम्हाला फॉलो करण्याचा प्रयत्न करणारे कमी रँडम अनोळखी लोक आणि तुम्हाला कोण मेसेज करू शकते त्यावर आणखी नियंत्रण मिळणे हा होय."
वयाची पडताळणी केल्यामुळे त्यांना कसा लाभ होतो यास हे हायलाईट करते.
3. त्यांचा दृष्टीकोन ऐकून घ्या
किशोरवयीन हुशार असतात. "पण लोक तरीही त्यांच्या वयाबाबत खोटे बोलतात," अशी त्यांनी प्रतिक्रिया दिल्यास, मुख्य मुद्दा पुन्हा समजावून सांगण्यापूर्वी त्यांचा मुद्दा तुम्हाला समजला आहे हे त्यांना सांगा:
"तुमचे म्हणणे बरोबर आहे — काही लोक तसे करतात. पण Meta सारख्या कंपनी जागा सुरक्षित ठेवण्यासाठी खोटे वय सांगणाऱ्या लोकांना पकडण्याकरिता त्यांची तंत्रज्ञाने सुधारित करत आहेत. हे सोशल मीडिया केवळ एकाच व्यक्तीसाठी नाही, तर प्रत्येकजणासाठी अधिक चांगला बनवण्याबद्दल आहे."
किशोरवयीनांना जेव्हा हे जाणवते की त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे, तेव्हा ते गप्प बसण्याऐवजी एंगेज होण्याची शक्यता अधिक असते
पालक म्हणून तुमची भूमिका — कोणताही ताण न घेता
तुमचे किशोरवयीन क्लिक करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही निरीक्षण करणे गरजेचे नाही. पण सतत लक्ष न ठेवता त्यांच्या डिजिटल जगात एंगेज राहणे कालांतराने परिणाम दाखवते. येथे सामील होण्याचे कमी प्रयत्न असलेले मार्ग आहेत:
-
तुम्हाला मार्गदर्शन करण्यात मदत करणारी आणि तुमच्या किशोरवयीनाच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी टूल एक्सप्लोर करण्यासाठी कुटुंब केंद्र वापरा.
- सतत संभाषणे करत रहा — फक्त एक मोठी "तंत्रज्ञानाविषयक चर्चा" नाही, तर नियमित चेक-इन आवश्यक आहेत.
-
तुम्ही सोशल मीडिया जबाबदारीने कसा नॅव्हिगेट करता ते दर्शवून सकारात्मक डिजिटल सवयींचे मॉडेल बना.
-
तुमच्या किशोरवयीनाचे खरे वय दर्शवण्यासाठी खात्यांकरिता नोंदणी करण्याकरिता किंवा त्यांची खाती अपडेट करण्यासाठी तुमच्या किशोरवयीनाला प्रोत्साहन द्या.
Meta आणखी सुरक्षित डिजिटल जागांसाठी वचनबद्ध आहे, याचाच अर्थ आपण पालक म्हणून, एकट्याने याचे निराकरण करण्याची गरज नाही. मनमोकळी संभाषणे करून आणि आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या टूलचा वापर करून, आपण कोणतेही ओझे असल्याची भावना न बाळगता — आपल्या किशोरवयीन मुलांना अधिक सुरक्षित, वयानुसार योग्य असलेल्या ऑनलाईन अनुभवाचा आनंद मिळतो याची खात्री करू शकतो.
वैयक्तिक माहिती: डॉ. ॲन-लुईस लॉकहार्ट या बोर्डद्वारे प्रमाणित असलेल्या 20 वर्षांचा अनुभव असलेल्या बालरोगतज्ञ, पालक प्रशिक्षक आणि वक्ता आहेत. डॉ. लॉकहार्ट या जुळ्या मुलांच्या आणि किशोरवयीनांच्या भांबावलेल्या पालकांना संघर्षात्मक परिस्थितीमधून एकमेकांशी कनेक्ट होण्याच्या परिस्थितीत रूपांतरित मदत करण्यासाठी समर्पित आहेत. प्रत्यक्ष योजना, करूणात्मक मार्गदर्शन आणि मनमोकळ्या संभाषणावर लक्ष केंद्रित करून, त्या पालकांना त्यांच्या किशोरवयीनांसोबत सतत होणारे विवाद टाळून — त्यांच्यासोबत सुदृढ नातेसंबंध तयार करण्यात सक्षम करतात. डॉ. लॉकहार्ट यांच्याबद्दल www.anewdaysa.com. येथे अधिक जाणून घ्या
तुमचे किशोरवयीन Meta कडील ॲपवरील जन्मतारीख फक्त काही पायऱ्या पूर्ण करून तपासू किंवा अपडेट करू शकते. त्यांचे वय अचूक आहे याची खात्री करण्यात त्यांना मदत करण्यासाठी खालील गाईड फॉलो करा.
Instagram
- तुमच्या प्रोफाईलवर
जाण्यासाठी तळाशी उजवीकडील तुमची प्रोफाईल किंवा प्रोफाइल फोटो वर टॅप करा. - सर्वात वर
उजव्या बाजूला मेनू वर टॅप करा. - खाती केंद्र वर टॅप करा, त्यानंतर वैयक्तिक तपशील वर टॅप करा.
- वाढदिवस किंवा जन्मतारीख वर टॅप करा, त्यानंतर तुमच्या वाढदिवसाची माहिती बदलण्यासाठी संपादित करा वर टॅप करा.
Facebook आणि Messenger
- Facebook च्या सर्वात वर उजवीकडे असलेल्या तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- सेटिंग्ज आणि गोपनीयता वर टॅप करा, त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा
- खाती केंद्र वर टॅप करा, त्यानंतर वैयक्तिक तपशील वर टॅप करा.
- वाढदिवस वर टॅप करा.
- संपादित करा वर टॅप करा, त्यानंतर तुमचा वाढदिवस बदला.
- बदलाची पुष्टी करण्यासाठी सेव्ह करा वर टॅप करा.
Meta Horizon ॲप
- तुमच्या फोनवर, Meta Horizon ॲप उघडा.
- तुमच्या Horizon फीडच्या
सर्वात वर असलेल्या मेनू वर टॅप करा. - खाती केंद्र वर टॅप करा, त्यानंतर वर टॅप करा
वैयक्तिक तपशील. - वाढदिवस वर टॅप करा, त्यानंतर तुमच्या वाढदिवसापुढील संपादित करा वर टॅप करा.
- तुमचा वाढदिवस संपादित करा, त्यानंतर सेव्ह करा वर टॅप करा.
- पुष्टी करा वर टॅप करा