पालकांना त्यांच्या किशोरवयीनांना संरक्षित आणि सुरक्षित ठेवायचे असते. तर केवळ सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, आपण घरामधील मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या सक्षम आणि उत्पादनशील नातेसंबंध असण्याचा अर्थ काय याबद्दल अधिक व्यापकतेने विचार करण्याचा प्रयत्न केला तर? सरतेशेवटी, मागील दशकापासून आपल्या तंत्रज्ञानातील आणि माहिती सिस्टीममधील बदलांनी केवळ तरुणांनाच नव्हे तर आपल्या सर्वांना प्रभावित केले आहे. आपण सर्वच या गुंतागुंतीच्या जगात नॅव्हिगेट कसे करायचे हे शिकत आहोत आणि आपण एकत्रितपणे मार्ग शोधल्यास ते सोपे होईल.
आपण आपल्या घरामध्ये सुदृढ मीडिया वातावरण कसे तयार करायचे यावर लक्ष केंद्रित केल्यास, आपण केवळ आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यात मदत करू असे नाही, तर या अद्भूत तांत्रित प्रगतीसह आपल्याला उपलब्ध असलेल्या संधीचा लाभदेखील घेऊ शकतो.