इंटरनेट आणि सोशल मीडिया माहितीचे उत्तम सोर्स होऊ शकतात, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की त्यातील सर्व काही अचूक आणि विश्वसनीय आहे. वाईट गोष्टींमधून चांगली गोष्ट निवडण्यासाठी, पालकांना त्यांच्या किशोरवयीन मुलांची ऑनलाईन मीडिया साक्षरता विकसित करण्यात मदत करावी लागेल.
मीडिया किंवा इमेज चुकीच्या पद्धतींनी हाताळल्या जातात तेव्हा प्रौढांप्रमाणेच, किशोरवयीनांकरिता कोणती माहिती विश्वसनीय आहे आणि कोणती नाही हे समजण्याची कौशल्ये असणे आणि खऱ्या नसलेल्या गोष्टी किंवा पडताळणी केल्या जाऊ शकत नसलेल्या गोष्टी शेअर न करणे यांसारख्या चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे.