पुरावे गोळा करणे
काय घडले आणि त्यात कोण सामील होते याबद्दल शक्य तितकी जास्त माहिती संकलित करा. बर्याच केसमध्ये, जरी ते निनावी वातावरणात असले किंवा त्यात अपरिचित स्क्रीननाव असले, तरीदेखील तुमच्या किशोरवयीनाला कळेल (किंवा त्यांना माहीत आहे असे वाटते) की दादागिरी कोण करत आहे. अनेकदा गैरवर्तन शाळेत घडणार्या गोष्टींशी संबंधित असते. तसे असल्यास, तुमच्या प्रश्नांबाबत तेथील प्रशासकाशी संपर्क करा आणि शालेय धोरणाच्या आवश्यकतांनुसार घटनेची तक्रार केली आहे आणि तपास सुरू झाला याची खात्री करा. तुमच्या किशोरवयीन मुलासोबत सायबर दादागिरी होत आहे याचा पुरावा म्हणून उपयुक्त ठरू शकतील अशी संभाषणे, मेसेज, चित्रे, व्हिडिओ आणि अन्य कोणत्याही वस्तू यांचे स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग्ज घ्या आणि ते पुरावा म्हणून समबिट करा. तपास प्रक्रियेत सहाय्य करण्यासाठी सर्व घटनांचा एक रेकॉर्ड ठेवा. तसेच, घटना कुठे (शाळेत, विशिष्ट ॲपवर) आणि कधी घडली तसेच त्यात कोण सामील (आक्रमक किंवा साक्षीदार) होते यांसारख्या समर्पक तपशीलांच्या टिपा ठेवा.