आपली क्रिएटिव्हिटी वापरण्यासाठी आणि ती जगासोबत शेअर करण्यासाठी तंत्रज्ञान आपल्याला जे सामर्थ्य देऊ शकते ते खरोखरच अविश्वसनीय आहे. पण, हे प्रत्येकालाच माहीत आहे, सामर्थ्य जबाबदारीसह येते. आपण मीडिया नैतिकतेने आणि जबाबदारीने तयार करायला शिकणे महत्त्वाचे आहे. मीडिया तयार करणे इतके सोपे आहे की आपण तयार केलेल्या आणि जगासोबत शेअर केलेल्या मीडियाच्या प्रभावाबद्दल बरेचदा विचार करण्याचे विसरतो.