किशोरवयीनांचे पालकत्त्व नेहमीच सोपे नसते. किशोरवयीन दररोज बदलत असतात, त्यांचे स्वातंत्र्य शोधतात, मर्यादा पार करतात, ऑनलाईन अमर्यादित वेळ घालवतात आणि त्यांचे पालक काय म्हणतात याकडे कानाडोळा करतात. (चला प्रामाणिकपणे मान्य करू या, आपण किशोरवयीन असताना आपण देखील तेच केले होते!) पण आता जग बदलले आहे, बरोबर? आपण ज्या गोष्टींचा कधीही विचार केला नसेल त्याबद्दल आपण आपल्या किशोरवयीनांना जागरूक करणे गरजेचे आहे - जसे की ऑनलाईन चुकीची माहिती नॅव्हिगेट करणे किंवा सकारात्मक डिजिटल फुटप्रिंट बनवणे किंवा आपला वैयक्तिक डेटा वापरला जाण्याचे प्रकार समजून घेणे. जेव्हा आम्हाला ते आमचे म्हणणे ऐकत आहेत याचीदेखील खात्री नसते तेव्हा हे गुंतागुंतीचे मुद्दे नॅव्हिगेट करण्यात आपण त्यांना कशी मदत करू शकतो?
खरेतर, किशोरवयीन आपण काय बोलतो हे ऐकण्यापेक्षा आपण काय करतो हे पाहत असतात. तुमच्या किशोरवयीनांना गंभीरपणे विचार करणारे, तंत्रज्ञानाचे प्रभावी कम्युनिकेटर आणि जबाबदार युजर कसे व्हायचे हे शिकवायचे असेल, तर तुम्हाला त्यांना तसे दाखवावे लागेल. तुम्हाला सकारात्मक वर्तणुकींचे रोल मॉडेल बनण्याची गरज आहे जेणेकरून ते व्यवहारात पाहू शकतील. तुम्ही ऑनलाईन करत असलेली प्रत्येक गोष्ट तुमचे किशोरवयीन काय करतात यावर प्रभाव टाकते - तर मग त्यांना जबाबदार डिजिटल नागरिक कसे व्हायचे हे का नाही दाखवून द्यायचे? तुम्ही ज्या प्रकारे डिजिटल जगाशी इंटरॅक्ट करता त्या मीडिया साक्षरता वर्तणुकींचे मॉडेलिंग कसे करायचे?