Meta चा AI वापर
Meta तंत्रज्ञान विविध हेतूंसाठी AI चा वापर करते, जसे की कंटेन्टच्या शिफारशी करणे, लोकांना ज्या इव्हेंटमध्ये स्वारस्य असू शकते त्याबाबत त्यांना कळवणे आणि लोकांना तिच्या ॲपवर सुरक्षित ठेवणे.
आता, Meta तंत्रज्ञानांवर जनरेटिव्ह AI कोणाहीसाठी उपलब्ध आहे. Meta AI ॲपमुळे युजरना AI परिधान करण्यायोग्य डिव्हाईस व्यवस्थापित करता येतात, त्यांच्या स्वारस्यावर आधारित प्रॉम्प्ट शोधता येतात आणि AI साहाय्यकाकडून प्रवासाची योजना ते प्रशिक्षण अशा कोणत्याही बाबीबद्दल आणि बर्याच गोष्टींबाबत मदत मिळवता येते. AI मधील अलीकडील अपडेटने प्रगत आवाजाचे मॉडेल सादर केले आहे जे प्रत्येक युजरसाठी एक वैयक्तिकृत अनुभव प्रदान करते आणि त्यांना एकीकृत वैयक्तिक साहाय्यकासोबत केवळ बोलून टास्क पूर्ण करता येतो. Meta Llama 4 सह बनवलेला, AI साहाय्यक हा फोन, टॅब्लेट किंवा Meta Ray-Bans मध्ये युजरशी बोलू शकतो.तुम्ही AI सोबत एकास एक असे थेट संभाषण करू शकता किंवा “@MetaAI” आणि त्यानंतर प्रश्न किंवा विनंती टाईप करून त्याला ग्रुप चॅटमध्ये जोडू शकता. लोक Meta AI सोबत इंटरॅक्ट करताना "/imagine" असे टाईप करून मेसेजमध्ये इमेजदेखील जनरेट करू शकतात.नवीन जनरेटिव्ह AI चे आणखी एक उदाहरण म्हणजे Meta च्या तंत्रज्ञानांवर लोकप्रिय असलेली स्टिकर होय. आता, कोणीही संवाद साधण्यास आणि व्यक्त होण्यास मदत व्हावी म्हणून मजकुराद्वारे इमेजचे वर्णन करून AI-जनरेटेड स्टिकर वापरू शकते.AI द्वारे जनरेट झालेल्या फोटोसदृश्य इमेजबाबतीत त्या मानव निर्मित आहेत असे वाटून लोकांचा गोंधळ होऊ नये यासाठी Meta त्या इमेजमध्ये दिसू शकणारे निर्देशक समाविष्ट करते. या निर्देशकांच्या उदाहरणांमध्ये, Meta AI साहाय्यकामध्ये निर्मित इमेज जनरेटरकडील कंटेन्टवर दृश्यमान बर्न्ट-इन वॉटरमार्कचा आणि अन्य जनरेटिव्ह AI वैशिष्ट्यांमध्ये साजेसे प्रॉडक्टमधील उपाय यांचा समावेश होतो.Meta AI प्रत्येकजणासाठी उपलब्ध आहे आणि त्यात असे कंटेन्ट स्टँडर्ड आहेत जे जनरेटिव्ह AI मॉडेलला सांगू शकतात की ते काय निमार्ण करू शकते आणि काय निर्माण करू शकत नाही. सुरक्षित अनुभव प्रदान करण्यासाठी Meta कसे काम करते याबद्दल येथे जाणून घ्या. तुमच्या किशोरवयीनाशी जनरेटिव्ह AI बद्दल बोलणे
जनरेटिव्ह AI कंटेन्ट ओळखणे: एखादी गोष्ट जनरेटिव्ह AI चा वापर करून निर्माण केली आहे का हे नेहमी ओळखता येणे सोपे नाही. सर्व सोशल मीडियाप्रमाणेच, कोणीही कंटेन्ट तयार, पेस्ट किंवा अपलोड करू शकते आणि अशी शक्यता आहे की त्यांना जनरेटिव्ह AI म्हणून लेबल केलेले नसू शकते. Meta तंत्रज्ञानांवर असलेल्या काही जनरेटिव्ह AI प्रमाणे काही, दृश्यमान मार्किंग जोडतील ज्यामुळे तुम्ही AI-जनरेटेड इमेज ओळखू शकता - परंतु असे नेहमीच होत नाही.
Meta लोकांना कंटेन्ट अपलोड करण्याची अनुमती देते आणि एखाद्याने जनरेटिव्ह AI द्वारे तयार केलेले परंतु तसे योग्यरीत्या लेबल न केलेले काहीतरी अपलोड करणे शक्य आहे. Meta चे नसलेले टूल वापरून तयार केलेली AI इमेज अपलोड करणेदेखील शक्य आहे.माहिती व्हेरिफाय करा: जनरेटिव्ह AI चुकीची माहिती जनरेट करण्याची शक्यता असते, ज्याला काही वेळा “भ्रम” असे म्हटले जाते. जनरेटिव्ह AI कडील माहितीवर विश्वास ठेवण्याआधी किंवा ती शेअर करण्याआधी, प्रतिष्ठित सोर्सकडून ती व्हेरिफाय करणे आणि घोटाळेबाज व्यक्ती तुमच्या किशोरवयीनाला फसवण्याचा किंवा त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी जनरेटिव्ह AI चा वापर करू शकतात हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.जबाबदारीने केलेला वापर: तुमच्या किशोरवयीनाला जनरेटिव्ह AI चा वापर करताना प्रामाणिक असण्याच्या व काळजी घेण्याच्या, त्यांच्या सोर्सचा संदर्भ देण्याच्या, शाळेच्या विशिष्ट नियमांचे पालन करण्याच्या जबाबदारीची आठवण करून द्या आणि जाणीव ठेवण्यास सांगा की त्यांच्या कामाच्या अचूकतेसाठी आणि प्रामाणिकपणासाठी ते जबाबदार आहेत. पालकांनी याचीदेखील चर्चा करावी, की AI-जनरेटेड कंटेन्टचा वापर सकारात्मक उद्देशांसाठी करायला हवा, हानीकारक उद्देशांसाठी नव्हे.गोपनीयता आणि सुरक्षा: तुमच्या किशोरवयीनाला कोणतेही जनरेटिव्ह AI वापरताना त्यांची गोपनीयता व सुरक्षा यांचे रक्षण करण्याची आठवण करून द्या. जनरेटिव्ह AI प्रॉडक्ट तुम्ही प्रदान करत असलेल्या माहितीचा वापर त्याचे जनरेटिव्ह AI सुधारण्यासाठी करू शकते. महत्त्वाचे म्हणजे तुमचा सोशल सिक्युरिटी नंबर, क्रेडिट कार्ड नंबर यासारखी किंवा तुम्ही इतरांसोबत शेअर करू इच्छित नसलेली संवेदनशील माहिती एंटर करू नये. तुमच्या किशोरवयीनासोबत AI-जनरेटेड घोटाळ्यांमधील धोक्याविषयी चर्चा करा.