तुमच्या मुलास प्रतिसाद देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी 5 पायऱ्या.
अनेक मुलांच्या आयुष्यात डिजिटल तंत्रज्ञान मोठी भूमिका निभावत असते. याद्वारे शिक्षणाचे, कनेक्शनचे आणि मनोरंजनाचे एक जग उघडले जाते. परंतु ऑनलाईन असल्याचा धोकादेखील आहे. मुलांना ऑनलाईन दादागिरी, छळवणूक यास तोंड द्यावे लागू शकते, ते अनुचित कंटेन्ट पाहू शकतात किंवा नाराज, अस्वस्थ करणारे किंवा घाबरावणारे असे इतर अनुभव त्यांना येऊ शकतात. तुमच्या मुलास हा ऑनलाईन अनुभव आल्यास, त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही याही पाच पायर्या पूर्ण करू शकता.