लोक समोरासमोर-बोलतात, तेव्हा ते एकमेकांना समजून घेण्यासाठी सामाजिक संकेत वापरतात, जसे की त्यांचा बोलण्याचा टोन किंवा चेहर्याचे हावभाव बदलणे. लोक ऑनलाईन एकमेकांशी इंटरॅक्ट करतात, तेव्हा हे संकेत काहीवेळा दिसत नाहीत, ज्यामुळे लोक एकमेकांचा गैरसमज करून घेतात त्यावेळी मानसिक अस्वस्थतेची किंवा दुखावले गेल्याची भावना निर्माण होऊ शकते.
म्हणूनच प्रत्येकजण - आणि विशेषतः तरुण लोक - यांना काहीवेळा ऑनलाईन जटीलता असलेले इंटरॅक्शनचे जे जग दिसते त्यामधून नॅव्हिगेट करण्यासाठी मार्गदर्शन हवे असते. किशोरवयीन इंटरनेट किंवा सोशल मीडिया वापरतात, तेव्हा पालक त्यांना चांगले परिणाम मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यात मदत करू शकतात. ते त्यांना आनंदाची भावना निर्माण करण्यातदेखील मदत करू शकतात - जेणेकरून त्यांनी भूतकाळात नकारात्मक इंटरॅक्शन (कदाचित अपरिहार्यपणे) अनुभवल्या असल्यास, त्यामधून ती मुले बाहेर पडू शकतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या किशोरवयीनांसोबत मोकळेपणाने बोला. ते तुमच्याकडे येऊ शकतात आणि मदत मागू शकतात हे त्यांना कळणे आवश्यक आहे. आणि ते जेव्हा हे करतील, तेव्हा तुम्ही त्यांना अनेक प्रकारे मदत करू शकता. त्याचा प्रारंभ ऐकण्याने होतो आणि तेथून: त्यांना संदर्भ समजण्यात मदत करणे होते.
मोकळेपणाने संवाद सुरू ठेवून, तुम्ही तुमच्या किशोरवयीनाला हे समजण्यात मदत करू शकता की ऑनलाईन किंवा ऑफलाईन, हा मूलभूत नियम अद्यापही लागू होतो: तुम्हाला जशी वर्तणूक मिळावी असे तुम्ही इच्छिता तशीच वर्तणूक इतरांना द्या.
तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता किंवा त्यांना DM करता, त्यांना पत्र लिहिता किंवा त्यांच्या पेजवर कमेंट पोस्ट करता, तेव्हा भावनिक हित नेहमी सारखेच असते. तुम्ही छान कमेंट देऊन एखाद्या व्यक्तीचा दिवस चांगला घालवू शकता किंवा त्यांचा अपमान करून त्यांना दुखावू शकता.
येथे पालकांची विशेष जबाबदारी असते. तुमच्या मुलाचे ऑनलाईन नकारात्मक किंवा विवादात्मक इंटरॅक्शन झाल्यास, तुम्ही त्यांना काय घडले याबाबत योग्य वागण्यात आणि त्यातून मार्ग काढण्यात मदत करू शकता. तुम्ही त्यांच्या अनुभवाबद्दल शक्य असेल ते जाणून घ्या, त्यांच्या भावनांना स्वीकारून त्या समजल्याने त्यांना सांगा आणि चांगला परिणाम मिळवून देईल अशा प्रतिसादाद्वारे ते बोलू इच्छितात की नाही ते पहा.
आनंदी वृत्ती ठेवण्याचे कौशल्य म्हणजेच – वाईट घटना घडतात तेव्हा त्यामधून बाहेर पडण्याची क्षमता कशी राखावी हे शिकण्याचा हा सर्व भाग आहे.
किशोरवयीन आणि तरुणांना ऑनलाईन सकारात्मक इंटरॅक्शन वाढवण्यात मदत करणे ही दीर्घ प्रक्रिया असू शकते जिच्यात कालांतराने पुष्कळ संभाषणे समाविष्ट होऊ शकतात. तुम्हाला काही संभाषण प्रारंभकर्ते हवे असल्यास, यासारखे विषय पहा: