सूचना #2 – तुमच्या किशोरवयीनांना त्यांच्या डिजिटल फूटप्रिंटचे रक्षण करण्यात मदत करा.
तुमच्या किशोरवयीनाशी ऑनलाईन काय शेअर करावे आणि काय करू नये याबद्दल बोलणे महत्त्वाचे आहे, विशेषतः सेक्सटिंगच्या संबंधाने. किशोरवयीन इतर किशोरवयीनांशी अनुचित नातेसंबंधात गुंतून पडू शकते व त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक इमेज किंवा माहिती मिळवणाऱ्या शिकाऱ्यांचे बळीदेखील होऊ शकतात. बळी पडलेल्या किशोरवयीनांना त्यांच्या आयुष्यात काळजी घेणाऱ्या प्रौढ व्यक्तींच्या व तसेच मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या सपोर्टची गरज भासू शकते. “किशोरवयीनांशी सेक्सटिंगबद्दल बोलणे” यामध्ये तरुणांसोबत ही संभाषणे कशी करावी याबद्दल माहिती आहे आणि Netsmartz कुटुंबांना मदत करू शकतात अशी संसाधने ऑफर करते.सूचना #3 – तुमच्या किशोरवयीनाशी ते ऑनलाईन शेअर करत असलेली ओळख, लोकेशन आणि इतर वैयक्तिक माहिती याबद्दल बोला.
किशोरवयीनांनी त्यांची गोपनीयता सेटिंग्ज आणि गेमिंग ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज होताना ऑनलाईन सहकारी किंवा प्रतिस्पर्ध्यांशी कोणती माहिती शेअर करत आहेत याबद्दल सजग राहिले पाहिजे. महामारीच्या काळात, ऑनलाईन प्रलोभन यामध्ये जवळजवळ 100% वाढ झाली होती. तरुणांशी गेमिंग, सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममार्फत संपर्क साधला जातो तेव्हा असे होते. तरुणांना भूमिका वठवण्यास सांगून, संभाषण किंवा नातेसंबंध निर्माण करणे याद्वारे “तयार केले” जाऊ शकते किंवा स्पष्ट फोटो/इमेज पाठवण्यास प्रोत्साहन दिले जाते, जे ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा विक्री/व्यापार यासाठी वापरले जाऊ शकते. LGBTQ+ तरुणांना याव्यतिरिक्त आणखी धोका आहे, कारण ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी त्यांची लैंगिक अभिमुखता शेअर करण्यास तयार नसल्यामुळे अनेकदा विविध संसाधनांकडून माहिती किंवा सपोर्ट घेत असतात. HRC.org कडील LGBTQ+ सहयोगी असणे यांसारखी संसाधने या स्थितीमधील LGBTQ+ तरुणांना सपोर्ट करण्याची इच्छा असणाऱ्यांना मदत करू शकतात.सूचना #4 – तुमच्या किशोरवयीनांशी हे शेअर करा, की ऑनलाईन “छेडछाड” याचे रूपांतर फक्त एका क्लिकमध्ये सायबर दादागिरीमध्ये होऊ शकते.
तुमचे किशोरवयीन दादागिरीला बळी पडत असो किंवा अन्य कोणावर दादागिरी करत असो, ऑनलाईन शेअर केलेली कोणतीही बाब खरे तर नष्ट होत नाही. 48.7% LGBTQ विद्यार्थी यांना एका वर्षात सायबर दादागिरीचा अनुभव येतो. अगदी एखाद्याला दुखावण्याच्या हेतूने असलेली एखादी ऑनलाईन गोष्ट शेअर करणे किंवा “लाईक करणे” देखील दादागिरीला प्रमोट करते. Stopbullying.gov सायबर दादागिरी परिभाषित करते आणि त्याबद्दल तक्रार कशी करावी याबाबत माहिती देते. तुम्हाला येथे दिलेल्या परिस्थितींमध्ये तुमच्या किशोरवयीनास सपोर्ट करण्याचे मार्ग येथे सापडतील.सूचना #5 – तुमचे किशोरवयीन त्यांचे मित्र कोण आहेत हे जाणून आहे याची खात्री करा.
किशोरवयीनाच्या सोशल मीडिया पेजवर नवीन मित्रांची व फॉलोअरची पुष्टी करणे आणि ते मिळवणे उत्साहवर्धक असू शकते. मित्राच्या मित्राकडील फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे निर्धोक असू शकते आणि यामुळे नवीन आणि सकारात्मक नातेसंबंध निर्माण होऊ शकतात, परंतु किशोरवयीनांनी काळजी घेतली पाहिजे. ऑनलाईन व्हिडिओ गेम हा ऑनलाईन संवादाचा दुसरा सोर्स आहे, ज्याचे निरीक्षण करण्याची गरज आहे असे प्रौढांना वाटत नाही, परंतु हे विचारात घेतले पाहिजे. अनेक किशोरवयीनांसाठी व्हिडिओ गेम हा एक लोकप्रिय सामाजिक आऊटलेट आहे (जेव्हा ते त्यांच्या फोनवर नसतात) आणि अर्ध्याहून अधिक तरुण म्हणतात की खेळत असताना त्यांनी नवीन ऑनलाईन मित्र बनवला आहे. ऑनलाईन गेमिंगमध्ये LGBTQ+ तरुणांना कम्युनिटी बनवून, नवीन मित्र आणि प्रतिनिधित्व शोधून फायदा होण्याची संभावना असते परंतु किशोरवयीन गेम खेळताना सुरक्षित राहतातयाची खात्री करणेदेखील महत्त्वाचे आहे.तुमच्या किशोरवयीनास नवीन मित्र किंवा फॉलोअर यांच्या पोस्टचे निरीक्षण करण्याची आठवण देणे महत्त्वाचे आहे. खाती हॅक केली जाऊ शकतात आणि आपली खाती सुरक्षित ठेवण्याबाबत सावध असणारे किशोरवयीन फक्त स्वतःचेच नव्हे तर त्यांच्या खऱ्या मित्रांचे आणि फॉलोअरचे संरक्षण करण्यातदेखील मदत करतात. तुमच्या किशोरवयीनास वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची धोरणे आणि मानदंडांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींची खाती – फक्त दुर्लक्षित करण्यास नव्हे – तर ती ब्लॉक करण्यास व तक्रार करण्यासदेखील प्रोत्साहन द्या.सूचना #6 – तुमच्या किशोरवयीनासोबतची अवघड किंवा अस्वस्थ करणारी संभाषणे प्रतिक्रियात्मक असण्याऐवजी प्रतिबंधात्मक असतील तर ती कमी होऊ शकतात.
ऑनलाईन परिस्थितींमध्ये स्वतःची मदत कशी करावी याबाबत LGBTQ+ तरुण अशिक्षित राहिल्यास ते विशेषतः असुरक्षित ठरू शकतात. LGBTQ+ किशोरवयीनाच्या आयुष्यातील एक विश्वासू प्रौढ व्यक्ती या नात्याने डिजिटल वापर जबाबदारीने करण्याबाबत सल्ला देणे अतिशय महत्त्वाचे आहे. ऑनलाईन सुरक्षा आणि गोपनीयतेशी संबंधित LGBTQ+ समस्यांबाबत चर्चा करणे असुविधाजनक आहे म्हणून या संभाषणांकडे दुर्लक्ष करू नका; त्याऐवजी ही जबाबदारी कशी व्यवस्थापित करावी यासंबंधी शिक्षण देऊन तुमच्या किशोरवयीनास सपोर्ट करा, विशेषतः कारण शून्य सहनशीलता धोरणाचा उलट परिणाम होऊ शकतो. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असलेल्या विषयांसाठी खालील संसाधनांंची सहाय्यता घ्या आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या आयुष्यातील किशोरवयीनांना कळू द्या की तुम्हाला त्यांची व त्यांंच्या डिजिटल कल्याणाबद्दल काळजी आहे.