वैयक्तिक ब्रँडिंग
संशोधन1 दर्शवते की सोशल मीडिया महत्त्वाच्या व्यावसायिक उद्देशांसाठी उपयुक्त ठरू शकते, जसे की वैयक्तिक ब्रँडिंग, स्वतःचा प्रचार आणि इंप्रेशन व्यवस्थापन. खरे तर, आम्ही त्याचा जाणूनबुजून सकारात्मक वापर करण्यास प्रोत्साहन देतो. सगळ्या युवा वर्गाने शाळेत आणि त्यांच्या कम्युनिटीत उत्तम कामगिरी करण्यासाठी कठोर मेहनत (उदा. नैपुण्य मिळवणे, स्वयंसेवा करणे, अभ्यासेतर उपक्रम इ.) करणे महत्त्वाचे आहे, केवळ वैयक्तिक विकासासाठी नव्हे तर इतरांनी त्यांचा ऑनलाईन शोध घेतल्यास त्यांची कठोर मेहनत, प्रामाणिकपणा आणि नागरी मानसिकता यांचा पुरावा सापडावा यासाठी.
याचबरोबर, तुमच्या किशोरवयीनास वैयक्तिक वेबसाईट तयार करण्यास प्रोत्साहन देणे (किंवा मदत करणे) विवेकपूर्ण ठरू शकते. येथे ते शैक्षणिक, क्रीडा विषयक, व्यावसायिक किंवा सेवा-आधारित कर्तृत्व, प्रशंसापत्रे आणि त्यांची प्रशंसा करणाऱ्या इतरांकडून मिळालेल्या शिफारसी, तसेच परिपक्वता, चारित्र्य, क्षमता आणि स्नेहभाव दर्शवणारे योग्य ते फोटो आणि व्हिडिओ अपलोड करू शकतात. किशोरवयीन मुलाने भूतकाळात चुकीने काहीतरी अनुचित ऑनलाईन पोस्ट केलेले असल्यास हे अधिकच महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास, त्यांनी त्यांच्याबद्दल सकारात्मक कंटेन्टचे प्रमाण हायलाईट करायला आणि ते वाढवायला हवे, यामुळे नकारात्मक कंटेन्ट दिसणे आणि त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. एकूणच, किशोरवयीनांनी त्यांचा ऑनलाईन सहभाग अशा दृष्टीकोनातून सतत विचारात घेतला पाहिजे की त्यांच्याबद्दल जे काही पोस्ट झाले आहे त्याचे चुकीचे परिणाम होण्याऐवजी त्यांना त्याचा उपयोग कसा होईल. पालकांनो, तुमच्या किशोरवयीनाला मिळणार्या संधींसाठी त्यांची डिजिटल प्रतिष्ठा राखण्याकरिता त्यांचे भागीदार बना – आणि अशा प्रकारे त्यांच्या यशस्वी होण्याच्या शक्यता ऑप्टिमाइझ करा.
1 — "चेन. Y, Rui, H., & Whinston, A. (2021). ट्वीट टॉपवर? सोशल मीडिया वैयक्तिक ब्रँडिंग आणि करिअर परिणाम. MIS त्रैमासिक, 45(2)."