डीफफेक कसे ओळखायचे
तंत्रज्ञानात जसजशी सुधारणा होते तसतसे डीपफेक अधिकाधिक वास्तविक होत आहेत, ते ओळखण्यासाठी फोटो किंवा व्हिडिओ कंटेन्टमधील काही विशिष्ट माहितीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे (नैसर्गिकपणे डोळ्यांची उघडझाप न होणे). झूम इन करून तोंड, गळा/कॉलर किंवा छातीभोवती अनैसर्गिक किंवा अस्पष्ट कडा आहेत का हे पाहणे अतिशय उपयुक्त ठरते. या ठिकाणी बरेचदा मूळ कंटेन्ट आणि सुपरइम्पोज केलेला कंटेन्ट यामधील एकीकरण किंवा ताळमेळ झालेला नसतो असे आढळून येते.
व्हिडिओवर, तुम्ही क्लिप हळू करू शकता आणि ओठांच्या हालचाली जुळणे किंवा थरथरणे यांसारख्या व्हिजुअल विसंगती आढळतात का हे पाहू शकता. याशिवाय, अशा क्षणचित्रांवर लक्ष ठेवा ज्यामध्ये, जे काही बोलले जात आहे त्यानुसार त्या पात्राच्या भावना प्रदर्शित होत आहेत की नाही, शब्द उच्चारणात चूक आहे का किंवा ते अन्य कुठल्याही विचित्र विसंगतीचा भाग आहे का. सरतेशेवटी, फोटोंवर (किंवा व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉटवर) उलट प्रतिमा शोध घेतल्यास, फेरफार करण्याआधीच्या मूळ व्हिडिओचा इशारा मिळू शकतो. त्या वेळी, कंटेन्टच्या दोन भागांची काळजीपूर्वक तुलना करा व कोणत्या भागात फेरफार करण्यात आले आहेत ते निर्धारित करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या ज्ञानेंद्रियांवर विश्वास ठेवा; आपणे जेव्हा कंटेन्ट पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी त्याचा वेग कमी करतो तेव्हा आपल्याला सामान्यतः जाणवते की काहीतरी चूक आहे.