तुमच्या मुलाला येणाऱ्या नकारात्मक ऑनलाईन अनुभवादरम्यान सपोर्ट कसा करावा

UNICEF

20 नोव्हेंबर 2024

तुमच्या मुलास प्रतिसाद देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी 5 पायऱ्या.

अनेक मुलांच्या आयुष्यात डिजिटल तंत्रज्ञान मोठी भूमिका निभावत असते. याद्वारे शिक्षणाचे, कनेक्शनचे आणि मनोरंजनाचे एक जग उघडले जाते. परंतु ऑनलाईन असल्याचा धोकादेखील आहे. मुलांना ऑनलाईन दादागिरी, छळवणूक यास तोंड द्यावे लागू शकते, ते अनुचित कंटेन्ट पाहू शकतात किंवा नाराज, अस्वस्थ करणारे किंवा घाबरावणारे असे इतर अनुभव त्यांना येऊ शकतात. तुमच्या मुलास याचा ऑनलाईन अनुभव आल्यास, त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही ही पाच पाऊले उचलू शकता.

1. काहीतरी चुकीचे झाले आहे हे ओळखणे

काहीतरी चुकीचे झाल्यास, प्रत्येक मूल थेट त्यांच्या काळजीवाहू व्यक्तीकडे जातेच असे नाही. काही पालकांना त्यांच्या मुलास ऑनलाईन संभवतः नकारात्मक अनुभव आला आहे हे बहुधा पहिल्यांदा एखाद्या शिक्षकाकडून किंवा दुसऱ्या पालकाकडून समजते. इतर पालकांना कदाचित त्यांच्या मुलाच्या डिव्हाईसवर विचित्र किंवा अनुचित मेसेज, कमेंट किंवा इमेज असल्याचे लक्षात येऊ शकते. तुमचे मूल याबाबतीत सरळ तुमच्याकडे न आल्यास, नाराज होऊ नका किंवा रागावू नका. त्यांना कदाचित जे घडले ते लाजिरवाणे किंवा त्याबाबत भीती वाटत असू शकते किंवा तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल याची त्यांना काळजी वाटत असू शकते.

तुमचे मूल एखाद्या गोष्टीबाबत चिंतीत किंवा नाराज असू शकण्याच्या खुणा ओळखण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मुलास तुम्हीच उत्तमपणे ओळखता व त्यामुळे काहीतरी असाधारण होत आहे हे तुम्हाला कळू शकते, परंतु याच्या सामान्य खुणा पुढीलप्रमाणे आहेत:

  • डोकेदुखी किंवा पोटदुखी
  • झोपेसंबंधित समस्या
  • भूकेसंबंधित बदल
  • स्पष्टीकरण नसलेली उदासी, चिडचिड, अस्वस्थता, निराशा
  • ऑनलाईन वेळ घालवल्यानंतर मनस्ताप होणे
  • त्यांच्या डिव्हाईसपासून दूर राहणे किंवा ते ऑनलाईन काय करत आहेत याबद्दल असामान्य गुप्तता बाळगणे
  • शाळेत जाण्याची भीती वाटणे किंवा लोकांसोबत मिसळणे टाळणे

UNICEF: मुलांमधील मनस्तापाच्या खुणा कशा ओळखाव्यात

काहीतरी झाले आहे अशी तुम्हाला शंका असल्यास, तुमच्या मुलाला आठवण करून द्या की ते तुमच्याशी किंवा अन्य विश्वासू प्रौढ व्यक्तीशी कधीही बोलू शकतात आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही त्यांना सपोर्ट कराल.

2. तुमच्या मुलास धीर देणे

पालक म्हणून, तुमच्या मुलाने ऑनलाईन अनुचित किंवा अस्वस्थ करणारे काहीतरी अनुभवले आहे हे जाणून घेणे अत्यंत कठीण असू शकते. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही शांतपणे तुमच्या मुलाचे बोलणे ऐकून घेत आहात व सपोर्ट करत आहात हे त्यांना जाणवून दिल्यास, ते आता आणि भविष्यातही तुमच्याशी मोकळपणाने बोलण्याची अधिक शक्यता असते.

शांत रहा: प्रतिसाद देण्यापूर्वी एक श्वास घ्या. तुमचे मूल तुमच्या प्रतिक्रिया पाहत असेल, त्यामुळे तुम्हाला धक्का बसला असेल, राग आला असेल किंवा अस्वस्थ झाला असाल तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा.

तुमचा पहिला विचार कदाचित तुमच्या मुलास सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे डिव्हाईस किंवा इंटरनेट ॲक्सेस काढून घेण्याचा असू शकतो, परंतु अशा प्रतिसादामुळे त्यांना तुम्ही शिक्षा करत आहात असे वाटू शकते आणि भविष्यात ते तुमच्याशी बोलण्याची शक्यता कमी होईल.

ऐका: तुमच्या मुलाकडे पूर्ण लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका आणि काय झाले आहे हे त्यांना स्पष्ट करू द्या. तुमच्या मुलाच्या चिंतांचा गंभीरपणे विचार करा, मध्येमध्ये बोलणे टाळा आणि कोणताही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करू नका.

तुमच्या मुलाने तुम्हाला एखाद्या अ‍ॅपबद्दल, गेमबद्दल सांगितले किंवा तुम्हाला परिचित नसलेला एखादे वाक्य/शब्द वापरल्यास, त्यांना ते स्पष्ट करण्यास किंवा तुम्हाला ते दाखवण्यास सांगा. त्यांना सांगा, की तुम्हाला योग्यप्रकारे समजून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्ही त्ची सर्वतोपरी मदत करू शकाल.

त्यांना स्पष्टीकरण देता येईल असे खालीलप्रमाणे प्रश्न विचारा: "काय झाले ते तू मला दाखवशील का?", “यामुळे तुला काय वाटले?”.

धीर द्या: तुमच्या मुलाने तुमच्याकडे येऊन योग्य केले आणि ते संकटात नाहीत हे त्यांना समजावून सांगा. त्यांना धीर देऊन सांगा, की तुम्ही त्यांची सर्वतोपरी मदत कराल.

उदाहरणार्थ: "तू हे मला सांगितल्याचा आनंद आहे. यात तुझी काहीही चूक नाही आणि मी यात तुझी मदत करणार आहे. आपण दोघे मिळून यावर उपाय काढू."

3. कृती करणे

परिस्थितीनुसार, तुमच्या मुलास फक्त त्याचे म्हणणे ऐकून घेणारे कोणीतरी हवे आहे असे असू शकते. मात्र काही गंभीर घटना घडली असल्यास, ती ज्या अ‍ॅपवर घडली त्यावर, तुमच्या मुलाची शाळा किंवा पोलीस यांच्याकडे तुम्ही त्या घटनेची तक्रार करणे गरजेचे असू शकते.

म्यूट करायचे, ब्लॉक करायचे की तक्रार करायची? या परिस्थितीत कोणत्या कृतीची मदत होईल असे तुमच्या मुलास वाटते याबद्दल त्यांच्याशी बोला. उदाहरणार्थ, त्यांनी एखाद्या व्यक्तीस म्यूट करावे, ब्लॉक करावे की तक्रार करावी.

बहुतांश सोशल मीडिया अ‍ॅप्स, गेम आणि अ‍ॅप्समध्ये चुकीच्या गोष्टी घडल्यास, मदतीसाठी अनेक सुरक्षा आणि तक्रार करण्याची फीचर असतात. मुले (आणि प्रौढ) यांना कोणती फीचर उपलब्ध आहेत आणि ती कशी काम करतात याबद्दल खात्री नसू शकते, त्यामुळे एकत्रितपणे वेगवेगळे पर्याय एक्सप्लोर करा आणि प्रत्येकामध्ये कशाचा समावेश असेल याची चर्चा करा.

तुमच्या मुलास हेदेखील माहीत असणे महत्त्वाचे आहे, की ते वापरत असलेल्या ॲप्सवर व त्यांनी डाऊनलोड केलेल्या कोणत्याही नवीन ॲप्सवर भविष्यात युजर आणि कंटेन्टची तक्रार कशी करावी, म्यूट कसे करावे किंवा ब्लॉक कसे करावे.

दस्तऐवज पुरावा: तुमचा पहिला विचार कदाचित तुमच्या मुलाच्या नकारात्मक अनुभवाशी संबंधित कोणतीही गोष्ट हटवणे हा असू शकतो, परंतु तुम्ही घटनेची तक्रार करण्याचा विचार करत असल्यास, काय झाले हे दर्शवण्यात मदत करणारे कोणतेही मेसेज, इमेज किंवा पोस्ट सेव्ह करणे किंवा त्यांचा स्क्रीनशॉट घेणे महत्त्वाचे आहे.

संसाधने: ही Meta ॲप्सवरील काही तक्रार करण्याची किंवा सुरक्षा संसाधने आहेत.

कोणत्याही अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेज काढण्याच्या मार्गांबद्दल Take it Down ही वेबसाईट मार्गदर्शन प्रदान करते.

तुम्ही एखाद्या कंपनीकडे समस्येची तक्रार केल्यास आणि प्रतिसाद न मिळाल्यास किंवा समस्येचे निराकरण झाले आहे असे न वाटल्यास, तक्रार वरच्या स्तरावर करण्याचा विचार करा. Facebook आणि Instagram वर, तुम्ही तुमच्या तक्रारीचे स्टेटस तपासू शकता आणि लागू असेल तिथे निर्णयाच्या अतिरिक्त रिव्ह्यूची विनंती करू शकता. लक्षात ठेवा, या कंपन्यांवर मुलांची सुरक्षा गंभीरपणे घेण्याची जबाबदारी असते.

शाळा: घटनेमध्ये तुमच्या मुलाच्या शाळेमधील विद्यार्थ्यांचा समावेश असल्यास, तुम्हाला कदाचित शाळेतील अधिकाऱ्यांशी बोलावे लागेल. तुम्ही जमा केलेला कोणताही पुरावा शेअर करा आणि तुमच्या मुलासाठी परिस्थिती आणखी बिकट होणार नाही हे लक्षात घेऊन ते यावर कसा प्रतिसाद देतील यासंबंधित शाळेच्या अधिकाऱ्यांशी बोला. कोणतीही शिस्त अहिंसक असावी आणि वर्तणूक सुधारण्यावर भर देणारी असावी (अपमान किंवा शिक्षा नको).

तुमच्या मुलाच्या शाळेमध्ये समुपदेशक असल्यास, तुमच्या मुलाला सर्वोत्तम सपोर्ट कसा द्यावा हे निर्धारित करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाच्या अनुभवाबद्दल त्यांच्याशीदेखील बोलू शकता.

पोलीस किंवा आपत्कालीन सेवा: तुम्हाला तुमच्या मुलाच्या सुरक्षेबद्दल कोणतीही चिंता असल्यास, अधिकाऱ्यांशी किंवा त्वरित सपोर्ट प्रदान करू शकतील अशा स्थानिक बाल संरक्षण संस्थेशी संपर्क साधण्यास संकोच करू नका.

4. व्यावसायिक सपोर्ट कधी घ्यावा

एखाद्या अनुचित किंवा अपायकारक गोष्टीचा अनुभव येणे अत्यंत अस्वस्थ करणारे असू शकते.

तुमच्या मुलास काय वाटते आहे याबद्दल सतत त्यांच्याशी बोलत रहा, थेट घटनेबद्दल न बोलता त्यांची विचारपूस करत रहा. त्यांना सोशल मीडिया वापराच्या व्यतिरिक्त अन्य सकारात्मक अ‍ॅक्टिव्हिटी शोधण्यास सपोर्ट करा, जसे की मित्रांसोबत वेळ घालवणे, वाचन, खेळ खेळणे किंवा एखादे संगीत वाद्य शिकणे.

तुम्हाला तुमच्या मुलाच्या वर्तनामध्ये किंवा मूडमध्ये काही काळ टिकणारे बदल दिसून आल्यास, तुम्ही प्राथमिक आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घ्यावा.

अनेक देशांमध्ये विशेष हेल्पलाईनदेखील असते, ज्यावर तुमचे मूल विनामूल्य कॉल करू शकते आणि एखाद्या व्यक्तीशी निनावी बोलू शकते. तुमच्या देशामध्ये मदत शोधण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन इंटरनॅशनल किंवा युनायटेड फॉर ग्लोबल मेंटल हेल्थ ला भेट द्या.

UNICEF: तुमच्या मुलास मानसिक आरोग्यासंबंधित सपोर्ट शोधण्यात कधी मदत करावी

5. भविष्यात तुमच्या मुलाची सुरक्षा करण्यात मदत कशी करावी

डिजिटल काळात मुलांना मोठे करणे सोपे नाही आणि ऑनलाईन नकारात्मक अनुभवामुळे तुम्हास व तुमच्या मुलास धास्ती बसू शकते. जे घडले त्याचा उपयोग ऑनलाईन एकत्रितपणे सुरक्षित राहण्याचे मार्ग शोधण्याची एक संधी म्हणून करण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही आव्‍हानामधून मार्ग काढण्यात मदत करण्यासाठी तुम्ही नेहमी हजर आहात हे तुमच्या मुलास पुन्हा सांगण्यासाठी करा.

तुमच्या कुटुंबाचे नियम पुन्हा एकदा पहा: तुमच्या मुलास ते कोणाशी व कसे कम्युनिकेट करतात, ते ऑनलाईन जे पोस्ट करतात ते कोण पाहू शकते आणि ते कोणते प्‍लॅटफॉर्म किंवा कंटेन्ट ॲक्सेस करू शकतात याबद्दल बोला. त्यांची सुरक्षा आणि कल्याण तुमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे आणि कोणतेही प्रश्न किंवा चिंता असल्यास, ते तुमच्याशी किंवा दुसऱ्या विश्वासू प्रौढ व्यक्तीशी कधीही बोलू शकतात याची त्यांना आठवण करून देत रहा.

लहान मुलांसाठी: अ‍ॅप्स आणि गेम तुमच्या मुलाच्या वयाच्या व विकासाच्या दृष्टीने योग्य आहेत याची खात्री करा. अनुचित कंटेन्ट ब्लॉक करण्यासाठी आणि काही ॲप्स किंवा वेबसाईटचा ॲक्सेस मर्यादित करण्यासाठी तुमच्या इंटरनेट प्रदात्याकडील आणि डिव्हाईसवरील पालक नियंत्रणे आणि सेटिंग्ज तपासा.

किशोरवयीन मुलांसाठी: त्यांच्या फेव्हरेट प्‍लॅटफॉर्म, अ‍ॅप्स आणि गेमवरील सुरक्षा सेटिंग्ज एकत्रितपणे एक्सप्लोर करा. तुम्हाला असलेल्या कोणत्याही चिंतांबद्दल मोकळेपणाने बोला आणि त्यांना काय म्हणायचे आहे ते ऐका.

UNICEF: तुमच्या कुटुंबासाठी आरोग्यपूर्ण डिजिटल सवयी तयार करण्याचे 10 मार्ग

कुटुंब केंद्र यावरFacebook आणि Instagram वरील सुपरव्हिजन, सुरक्षा आणि कल्याण याबद्दल अधिक जाणून घ्या.

गोपनीयता सेटिंग्ज तपासा: कोणत्याही डिव्हाईसवरील, सोशल मीडियावरील, गेमवरील आणि तुमचे मूल ॲक्सेस करत असलेल्या अन्य कोणत्याही ऑनलाईन खात्यांवरील गोपनीयता सेटिंग्जचा रिव्ह्यू करा. गोपनीयता सेटिंग्ज ही डेटा कलेक्शन कमीत कमी होईल अशी सेट केलेली असावीत आणि डिव्हाईस नवीनतम सॉफ्टवेअरसह अप टू डेट केलेली असावीत.

लहान मुलांसाठी: त्यांच्याशी केवळ मित्र आणि कुटुंब ऑनलाईन कम्युनिकेट करू शकतात हे तपासा.

किशोरवयीन मुलांसाठी: त्यांच्या फेव्हरेट प्‍लॅटफॉर्मवर कोणती गोपनीयता सेटिंग्ज उपलब्ध आहेत हे एकत्रितपणे पहा. त्यांचा नियमितपणे रिव्ह्यू करण्यास आणि आवश्यकतेनुसार ॲडजस्ट करण्यास त्यांना प्रोत्साहन द्या.

UNICEF: पालकांसाठी गोपनीयता चेकलिस्ट

Facebook, Instagram आणि Meta Horizonवरील गोपनीयता सेटिंग्जबद्दल अधिक जाणून घ्या आणि Facebook वरगोपनीयता तपासणी सारखी टूल वापरून पहा.

विश्लेषणात्मक विचारास सपोर्ट करा: तुमच्या मुलाशी संशयास्पद किंवा अपायकारक ऑनलाईन वर्तन ओळखण्याबद्दल बोला. प्रत्येकजणास प्रतिष्ठेची व आदराची वागणूक मिळण्याचा अधिकार आहे आणि भेदभाव करणारे किंवा अनुचित वर्तन कधीही स्वीकार्य नाही हे त्यांना कळते याची खात्री करा.

लहान मुलांसाठी: ऑनलाईन असलेला प्रत्‍येकजण विश्वासार्ह नसतो आणि आपण कोणाशी कम्युनिकेट करतो आणि कशावर क्लिक करतो याबद्दल आपण सावध असले पाहिजे हे समजावून सांगा. काहीतरी “चुकीचे” आहे असे त्यांना कधीही वाटल्यास तुमच्याशी बोलण्याची त्यांना आठवण करून द्या, म्हणजे तुम्ही एकत्रितपणे ते समजून घेऊ शकाल.

किशोरवयीन मुलांसाठी: त्यांच्या वाढत्या स्वावलंबनाला आणि चांगले निर्णय घेण्याच्या त्यांच्या क्षमतेला सपोर्ट करण्यासाठीचे मार्ग शोधा. ते ऑनलाईन काय पाहतात आणि शेअर करतात याबद्दल विचार करण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्या अनुभवांबद्दल विचारा – त्यांना कधीही वैयक्तिक माहिती ऑनलाईन शेअर करण्यासाठी दबाव आणला गेल्याचे जाणवले आहे का किंवा असे केलेली एखादी व्यक्ती माहीत आहे का? त्यांना ऑनलाईन समस्यापूर्ण वर्तन अनुभवास आले तर ते काय करतील?

सहभागी व्हा: तंत्रज्ञान सतत बदलत असते आणि तुमच्या मुलाची जसजशी वाढ होते तशा त्यांच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीदेखील बदलतील. कुटुंब म्हणून नवीन प्‍लॅटफॉर्म, गेम आणि अ‍ॅप्स एकत्रितपणे एक्सप्लोर करा. प्रत्येक गोष्टींमध्ये कशाचा समावेश आहे हे एकत्रितपणे शोधा, समर्पक समस्यांवर चर्चा करा, नवीन गोष्टी शिका आणि मजा करा.

तुमच्या मुलाच्या ऑनलाईन आयुष्याचा सक्रिय भाग झाल्याने त्यांना भविष्यातील आव्हानांमधून मार्ग काढण्यात मदत होण्यासह प्रत्येक संधीचा जास्तीत जास्त फायदाही घेता येतो.

हा लेख UNICEF सोबत एकत्रितपणे तयार करण्यात आला आहे. तज्ञांकडील अधिक पालकत्वासंबंधित टिपा आणि मार्गदर्शनासाठी, UNICEF पालकत्व ला भेट द्या.

UNICEF कोणत्याही कंपनी, ब्रँड, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसला समर्थन देत नाही.

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला